অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कांदाचाळ बांधणी

कांदाचाळ बांधणी

  • शास्त्रोक्त पद्धतीच्या कांदाचाळीची उभारणी करून कांदासाठवण केल्यास साठवणगृहातील तापमान व आर्द्रता यांचा समतोल राहून कोंब येणे, कांदा सडणे, वजनात घट येणे, श्‍वसन दर, कांदासडीचा प्रादुर्भाव आणि साठविलेल्या कांद्याचा दर्जा नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • कांदाचाळीसाठी जागेची निवड करताना शक्‍यतो उंच जागेची निवड करावी. पाणथळ किंवा उसाच्या शेताजवळ जेथे अति आर्द्रता असते, अशा जागेची निवड करू नये.
  • जमिनीच्या प्रकारानुसार आवश्‍यक तेवढा पाया खोदून आराखड्यानुसार पायासाठी सिमेंट कॉंक्रीटचे पिलर/ कॉलम उभारावेत.
  • तळाशी एक फूट माती काढून त्यामध्ये वाळू भरावी. नंतरच कांदाचाळीची उभारणी करावी. कांदासाठवणुकीची जागा दीड ते दोन फूट उंच असावी. त्यामुळे खालच्या मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत शिरेल व गरम झालेली हवा चाळीच्या त्रिकोणी भागातून बाहेर निघेल. अशा रीतीने उत्तम वायुविजन होईल.
  • पाया/ आरसीसी खांब/ पिलर/ कॉलम, वरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारा चाळीचा संपूर्ण सांगाडा तयार करावा.
  • एक पाखी कांदाचाळीची उभारणी दक्षिण-उत्तर, तर दुपाखी कांदाचाळीची उभारणी पूर्व-पश्‍चिम करावी.
  • चाळीच्या छतासाठी सिमेंट पत्रे अथवा मंगळुरी कौलांचा वापर करावा. बाजूच्या भिंती व तळ यासाठी बांबू किंवा लाकडी पट्ट्यांचा वापर करावा. टीन पत्र्याचा वापर केलेला असल्यास आतील बाजूस पांढरा रंग द्यावा. उन्हाळ्यात चाळीचे छप्पर शक्‍यतो उसाच्या पाचटाने किंवा ज्वारीचा कडबा किंवा गवताने आच्छादावे. यामुळे चाळीच्या आतील उष्णता वाढणार नाही. तसेच चाळीत थंड वातावरणनिर्मिती होईल.
  • चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या एक मीटर बाहेर असावे. त्यामुळे पावसाचे आरुंडे कांद्यापर्यंत पोचणार नाहीत व कांदे जास्त आर्द्रतेने खराब होणार नाहीत.
  • कांद्याचा सूर्यप्रकाशाशी प्रत्यक्ष संबंध येऊ देऊ नये. असे झाल्यास पाण्याचे उत्सर्जन व कांद्याचा रंग उतरतो. त्यामुळे कांद्याचा दर्जा कमी होतो. यासाठी कांदा साठवणगृहास शेडनेटचा वापर हितकारक ठरतो.
  • 25 मे. टन क्षमतेच्या दुपाखी कांदाचाळीचे बांधकाम करताना लांबी 12 मीटर, एकूण रुंदी 3.9 मीटर, दोन ओळींतील मोकळी जागा 1.5 मीटर (पहिला कप्पा 1.2 मीटर + मधली मोकळी जागा 1.5 मीटर + दुसरा कप्पा 1.2 मीटर), बाजूची उंची 2.4 मीटर व मधली उंची 3.4 मीटर अशा रीतीने मोजमापे घ्यावीत. चाळीच्या एका कप्प्याची आतील रुंदी ही 1.2 मीटर असावी.
  • कांद्याची साठवणूक ही जास्तीत जास्त पाच फूट उंचीपर्यंत करावी.

संपर्क - 020 - 24261190, 24268297
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे

---------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate