Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/16 12:27:9.801609 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/16 12:27:9.807076 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/16 12:27:9.836525 GMT+0530

आंतरपीक पद्धतीचे नियोजन

ज्वारीचे पीक 110 ते 115 दिवसांत निघून गेल्यावर ज्वारीच्या पाटातील ओलावा, अन्नद्रव्ये तुरीला उपलब्ध होतात. मोकळी हवा, सूर्यप्रकाश उपलब्ध होतो.

ज्वारी + तूर -


1) ज्वारी + तूर ही आंतरपीक पद्धती 3ः3 किंवा 4ः2 अशा ओळींच्या प्रमाणात लागवड करावी.
2) ज्वारीचे पीक 110 ते 115 दिवसांत निघून गेल्यावर ज्वारीच्या पाटातील ओलावा, अन्नद्रव्ये तुरीला उपलब्ध होतात. मोकळी हवा, सूर्यप्रकाश उपलब्ध होतो. मोकळी हवा, सूर्यप्रकाश यामुळे तुरीच्या सलग पिकापेक्षाही आंतरपीक पद्धतीतील तुरीचे पीक अधिक जोमदार येऊन उत्पादन चांगले मिळते.
3) तूर व ज्वारी यांच्यावर येणाऱ्या कीड व रोगांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होते.
4) ज्वारी + तूर ही एक स्वयंचलित फेरपालट होणारी आंतरपीक पद्धती आहे. एकाच शेताच्या तुकड्यावर गरज पडल्यास 2 ते 3 वर्षे ही पीक पद्धती घेता येते. असे करताना दुसऱ्या वर्षी ज्वारीच्या ओळींच्या क्षेत्रावर तुरीच्या ओळी पेरल्या जातील, याची काळजी घेणे जरुरीचे आहे.

बाजरी + तूर (3-3)


  • कमी पावसाचा भाग, मध्यम जमिनीची तथा उशिरा पेरणीसाठी या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

 

कापूस + सोयाबीन (1-1)


  • भारी जमिनीमध्ये आणि ज्या ठिकाणी थोडा सखोल भाग आहे अशा भागात कापूस + सोयाबीन ही आंतर पीक पद्धती उपयुक्त आहे.
  • सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या जातीची (एम.ए.यू.एस. 71) निवड करावी. उशिराने तयार होणाऱ्या जातींची निवड आंतरपिकासाठी करू नये.
  • सोयाबीन जलद वाढणारे आणि जास्त खतमात्रा लागणारे पीक आहे, त्यामुळे खताच्या नियोजनात शिफारसीत केलेली 80 टक्के खताची मात्रा कापसाचा ओळीत द्यावी. यामुळे सोयाबीन पिकाच्या जलद वाढीचा कापसाच्या वाढीवर विपरीत परिणाम न होता, कापसाची वाढही चांगल्या प्रकारे होते.

कापूस +तूर (6-1 किंवा 8-1)

  • ही एक पारंपरिक पट्टापद्धती असून, वेगवेगळ्या भागांत कापसाच्या विशिष्ट ओळीनंतर तुरीच्या एक किंवा दोन ओळी पेरतात.

सोयाबीन + तूर (4-2)

  • मुख्य पीक आणि आंतरपीक दोन्ही कडधान्यवर्गीय असून, हमखास उत्पन्न देणारी आंतरपीक पद्धती आहे.
  • मध्यम जमिनीत हमखास पावसाच्या प्रदेशात तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आंतरपीक पद्धती.

मका + सोयाबीन (2-2)

  • मक्‍याची पट्टापद्धतीने (75 - 45 सें.मी.) लागवड करताना दोन पट्ट्यांतील अंतरामध्ये (75 सें.मी.) सोयाबीनच्या दोन ओळी पेराव्यात.


संपर्क - 02452- 225843
अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
-------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अॅग्रोवन

 

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/16 12:27:10.097563 GMT+0530

T24 2019/06/16 12:27:10.104403 GMT+0530
Back to top

T12019/06/16 12:27:9.737866 GMT+0530

T612019/06/16 12:27:9.756082 GMT+0530

T622019/06/16 12:27:9.791064 GMT+0530

T632019/06/16 12:27:9.791898 GMT+0530