Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/17 02:33:55.876448 GMT+0530
मुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / तृणधान्य / आंतरमशागतीतून ओलावा साठवण रब्बी ज्वारीसाठी महत्त्वाची
शेअर करा

T3 2019/06/17 02:33:55.882279 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/17 02:33:55.913608 GMT+0530

आंतरमशागतीतून ओलावा साठवण रब्बी ज्वारीसाठी महत्त्वाची

बऱ्याच वेळा ओलाव्याची कमतरता व खोडमाशीचा प्रादुर्भाव यामुळे ज्वारीच्या पिकात कणसे न निसवणे, कणसांत दाणे न भरणे अशा अडचणी निर्माण होतात, उत्पादनात घट होते. त्यासाठी ज्वारी पिकात कोळपणी, तण नियंत्रण, कीडनियंत्रण करणे गरजेचे आहे.

बऱ्याच वेळा ओलाव्याची कमतरता व खोडमाशीचा प्रादुर्भाव यामुळे ज्वारीच्या पिकात कणसे न निसवणे, कणसांत दाणे न भरणे अशा अडचणी निर्माण होतात, उत्पादनात घट होते. त्यासाठी ज्वारी पिकात कोळपणी, तण नियंत्रण, कीडनियंत्रण करणे गरजेचे आहे. 
मराठवाड्यात रब्बी ज्वारीची पेरणी साधारणतः ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात झाली आहे. या वर्षी सोयाबीनची काढणी झालेल्या क्षेत्रावर जमिनीतील ओलाव्याचा अभाव व वाढलेले तापमान यामुळे रब्बी ज्वीरीची पेरणी कमी प्रमाणात झाली.

खोडमाशीचा प्रादुर्भावामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम

 • सध्या शेतावर एक महिन्याचे पीक जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी ओलाव्याची कमतरता व खोडमाशीचा प्रादुर्भाव यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
 • वाढीच्या आणि पुढील फुलोऱ्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत ओलाव्याची उपलब्धता आवश्‍यक असते. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागतीची आवश्‍यकता असते. हे लक्षात घेऊन ज्वारीमध्ये दोन ते तीन कोळपण्या केल्यास जमिनीला पडलेल्या भेगा बुजतात, जमीन भुसभुशीत होते, ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होऊन त्याचा कार्यक्षम वापर होतो.
 • पहिली कोळपणी पीक तीन आठवड्यांचे झाल्यानंतर तर दुसरी व तिसरी कोळपणी पीक क्रमशः 5 व 8 आठवड्यांचे झाल्यानंतर करावी. कोरडवाहू रब्बी ज्वारीमध्ये पीक 40 ते 50 दिवसांचे होईपर्यंत किमान 3 कोळपण्या कराव्यात. ज्यामुळे तणाचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच ओलावा टिकविण्यास मदत होते.
 • रब्बी ज्वारीचे पीक तीन ते पाच आठवड्याचे झाल्यानंतर दोन ओळींमध्ये सेंद्रिय पदार्थाचे (मूग, उडीद, सोयाबीन इत्यादीचे काड) आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा टिकविण्यास मदत होते.
 • पेरणीनंतर 65 ते 75 दिवसांनी म्युरेट ऑफ पोटॅश 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.

खोडमाशीचे व्यवस्थापन

 • पेरणीपूर्वी बियाण्यास थायामेथोक्‍झाम (70 टक्के) 3 ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे प्रक्रिया केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव कमी होतो.
 • मात्र, खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास व खोडमाशीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीवर असेल (10 टक्के पोंगेमर) तर खालील पैकी एका कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 1. अझाडिरेक्‍टीन घटकावर आधारीत किटकनाशकाची फवारणी सल्ल्यानुसार करावी. चे प्रमाण घ्यावे.
 2. सायपरमेथ्रीन (10 टक्के प्रवाही) 20 मि.लि.
 3. डेल्टामेथ्रीन (2.8 टक्के प्रवाही) 12.5 मि.लि.
 4. क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) 20 मि.लि.
 5. क्‍लोरपायरीफॉस (20 टक्के प्रवाही) 25 मि.लि.


संपर्क - 
डॉ. एच. व्ही. काळपांडे, 7588082163 
(लेखक ज्वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत : अग्रोवन

2.94444444444
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/17 02:33:56.144155 GMT+0530

T24 2019/06/17 02:33:56.157175 GMT+0530
Back to top

T12019/06/17 02:33:55.805928 GMT+0530

T612019/06/17 02:33:55.825223 GMT+0530

T622019/06/17 02:33:55.865068 GMT+0530

T632019/06/17 02:33:55.866051 GMT+0530