Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:05:29.906462 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:05:29.912180 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:05:29.943620 GMT+0530

एसआरआय पद्धतीचे फायदे

भात रोपांचे वय आठ ते बारा दिवसांचे म्हणजे रोपे दोनच पानांवर असताना त्यांची पुनर्लागवड करावी.

"एसआरआय' पद्धतीचे सहा टप्पे व त्याचे फायदे

1) रोपांची लवकर पुनर्लागवड -
भात रोपांचे वय आठ ते बारा दिवसांचे म्हणजे रोपे दोनच पानांवर असताना त्यांची पुनर्लागवड करावी.यामुळे मुळांची अधिकाधिक वाढ होते, अधिक फुटवे फुटतात. 
2) अत्यंत काळजीपूर्वक रोपांची शेतात पुनर्लागवड - 
पुनर्लागवडीच्या वेळी रोपांना बसणारा धक्का टाळण्यासाठी ही काळजी घेतली जाते. रोपवाटिकेतून रोपे मुळापाशी असलेल्या मातीसकट उपटावीत व पुनर्लागवडीसाठी शेतीमध्ये न्यावीत, यामुळे फुटव्यांच्या संख्येत अधिक प्रमाणात वाढ होते. 
3) दोन रोपांतील अधिक अंतर - 
दोन रोपांतील व ओळींतील अंतर 25 सें.मी. इतके (25 सें.मी. x 25 सें.मी.) ठेवून पुनर्लागवड करावी, 
यामुळे मुळांची सुनियोजित अधिक वाढ व त्यामुळे अन्नद्रव्यांचा चांगल्या प्रकारे वापर होतो. 
4) योग्य पद्धतीने तण नियंत्रण - 
शेतात पाणी साठवत नसल्याने तणे वाढतात, कोनोविडर यंत्राने निंदणी करावी. तण नियंत्रणामुळे तणांची पिकाशी असलेली स्पर्धा कमी होते, योग्य प्रमाणात मूलद्रव्ये भात रोपांस मिळून भात उत्पादनात वाढ होते. 
5) पाणी व्यवस्थापन - 
रोपांच्या पुनर्लागवडीनंतर पाणी शेतात न साठविता पाणी शेतात घेऊन, ओलावून पुन्हा बाहेर काढून टाकावे, यामुळे मुळांची अधिक वाढ होते. या पद्धतीमुळे मुळे न कुजता ती अधिक जोमाने वाढून अन्नद्रव्ये अधिक प्रमाणात घेतात. 
6) भरखतांचा सुयोग्य वापर - 
वरखतांच्या जोडीलाच शेणखत अथवा कंपोस्ट खताची दहा टन प्रति हेक्‍टर इतकी मात्रा द्यावी, यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.

या पद्धतीचे फायदे

1) भाताच्या उत्पादनात वाढ होते. प्रकाशसंश्‍लेषणाची परिणामकारकरीत्या अभिक्रिया होऊन मुळांची वाढही चांगली होते. 
2) प्रत्येक रोपाची निरोगी वाढ होऊन कीड- रोग यांपासून संरक्षण होते, रोपे लोळत नाहीत. 
3) पाण्याचे प्रमाण कमी लागून 40 टक्के इतकी बचत होते, जमिनीची सुपीकता वाढते.
माहिती स्रोत - कृषी संशोधन केंद्र, वडगाव (मावळ), जि. पुणे 
संपर्क - 02114 - 235229

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

3.0487804878
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:05:30.167816 GMT+0530

T24 2019/10/18 04:05:30.174473 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:05:29.828941 GMT+0530

T612019/10/18 04:05:29.848672 GMT+0530

T622019/10/18 04:05:29.895439 GMT+0530

T632019/10/18 04:05:29.896340 GMT+0530