Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 17:55:12.406355 GMT+0530
मुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / तृणधान्य / गहू संशोधनाचा मागोवा ,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल
शेअर करा

T3 2019/10/17 17:55:12.412487 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 17:55:12.445622 GMT+0530

गहू संशोधनाचा मागोवा ,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल

हरितक्रांती घडवून आणण्यामध्ये गहू पिकांचा सिंहाचा वाटा आहे. सन १९६० नंतर भारतातील हरितक्रांतीला सुरूवात झाली.

हरितक्रांती  घडवून आणण्यामध्ये गहू पिकांचा सिंहाचा वाटा आहे. सन १९६० नंतर भारतातील हरितक्रांतीला सुरूवात झाली.गहू, तांदुळ, बाजरी आणि ज्वारी यांच्या सुधारलेल्या बुटक्या जाती आणि संकरित वाणांनी देशातील अज्ञधान्य उत्पादनाचे चित्र एकदम बदलले. अज्ञाधान्याचे उत्पादन अतिशय झपाट्याने वाढत गेले. पूर्वी भारतातील गव्हाच्या जाती उंच वाढ्णा-या, कमी फुटवे असणा-या,रासायनिक खतांना कमी प्रतिसाद देणा-या आणि गैरवा रोगास मोठ्या प्रमाणावर बळी पडणा-या होत्या. कृषि क्षेत्रातील भारतीय शास्त्रज्ञांनी गहू पिकाची प्रत सुधारण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले. त्यामुळे गैरव्याच्या अनेक जाती व प्रजाती यांना प्रतिकारक्षम असणा-या जाती उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी गैरव्याच्या नुकसानीपासून निर्धास्त झाले आहेत.

गव्हाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता

वर्ष भारत महाराष्ट्र
क्षेत्र (द.ल.हे.) उत्पादन (द.ल.ट) उत्पादकता (कि/हे.) क्षेत्र (लाख हे.) उत्पादन (ला.ट.) उत्पादकता (कि/हे.)
१९६०-६१ १२.९३ ११. ८५१ ८.६८ ३.७७ ४३४
१९७०-७१ १८.२४ २३.८३ १३०७ ८.१२ ४.४० ५४२
१९८०-८१- २२.२८ २३.८३ १३०७ ८.१२ ४.४० ५४२
१९९०-९१ २४.१७ ५५.१४ २२८१ ८.७५ १०.९३ १२५०
२०००-०१ २५.०७ ६८.७६ २७४३ ७.५४ ९.७४ १२५६
२०१०-११ २९.२५ ८५.९३ २९३८ १३.२५ २२.९५ १७३२
२०१३-१४ ३१.३४ ९५.९१ ३०६१ १०.९७ १६.६९ १५२१

महाराष्ट्रात गहू हे रब्बी हंगामातील ज्वारी नंतरचे सर्वात महत्वाचे पीक आहे. महाराष्ट्रातील गव्हाचे क्षेत्र १g.९ लाख हेक्टर असून उत्पादन १६.६ लाख टन इतके आहे. आपल्या भारत देशात गव्ह्याखाली ११.३ दशलक्ष हेक्टर क्षेत्र असून उत्पादन १५.९१ दशलक्ष टन आहे. भारतातील गव्हाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ३g.६१ किंटल इतकी असून महाराष्ट्रात १५.२१ क्रॅिटल इतकी आहे.

महाराष्ट्रातील गव्हाची उत्पादनक्षमता ही देशाच्या उत्पादन क्षमतेपेक्षा खूप कमी आहे. महाराष्ट्रातील उत्पादकता कमी असण्याची बरीच कारणे आहेत. पूर्वी महाराष्ट्रात गव्हाचे बागायती क्षेत्र खूप कमी होते. परंतु आता बागायती क्षेत्र बरेच वाढलेले आहे. गव्हाच्या पिंकाखालील बागायती क्षेत्रात जसजर्सी वाढ होत गेली तसतसे एकूण उत्पादन आणि सरासरी उत्पादकता वाढलेली आढळून आली आहे. यामध्ये अधिक उत्पादन देणा-या गव्हाच्या वाणांचा प्रमुख वाटा आहे.

महाराष्ट्रातील गव्हाच्या कमी उत्पादकतेची कारणे

 1. हुलक्या तें मध्यम जर्मनीत गव्हाचीं लागवड़
 2. गहू पिकासाठी शिफारशीत पाण्याच्या पाळ्यांचा अभाव
 3. पाण्याची उपलब्धता असल्यास इतर पीके घेण्याचा कल
 4. शिफारशीत वाणाची लागवड न करणे
 5. गहूपीक वाढीच्या सुरूवातीच्या, दाणे भरण्याच्या व पक्र होण्याच्या अवस्थेत धनास्ट्रत तापमान
 6. हवामानातील वेळोवेळीं होणारे बदल
 7. शिफारशींपेक्षा कमी खतांचा वापर
 8. किंड व रोगाचा प्रादुर्भाव
 9. १५ डिसेंबरनतर गव्हाची पेरणीं
 10. नवीन प्रसारित वाणांच्या योग्य प्रतेिच्या बिंयाण्याची उपलब्धता न होणे

गहू संशोधनातील टप्पे

महाराष्ट्रात सर्वप्रथम परभणी येथे सन १९१० मध्ये गहू पिकावरील संशोधन सुरु झाले. पुढे सन १९५१ मध्ये ते बदनापूर येथे हलविण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रात सन १९१८ मध्ये प्रथम नाशिक येथे व सन १९१९ पासून गणेशखिंड, पुणे येथे गहू संशोधन सुरू झाले. त्याच वर्षी मोतीया व गुलाब हे वाण निवडण्यात आले. सन १९३२ पासून हे संशोधन निफाड येथे चालू आहे. बदनापूर येथील गहू संशोधन योजना सन १९६४ मध्ये निफाड येथे हलविण्यात आली. निफाड येथे सन १९३४ मध्ये 'जय' व सन १९३९ मध्ये 'विजय' हे बन्सी वाण कोरडवाहू लागवडीसाठी निवडण्यात आले. सन १९४२ मध्ये 'निफाड-४' हा वाष्ण संकर पध्दतीने निर्माण करण्यात आला.

बागायतीसाठी बक्षी २८८- १८ हा वाण सन १९५२ मध्ये प्रसारित करण्यात आला. परंतु, या सर्व जाती तांबेरा रोगास बळी पडत असत. म्हणून नियोजनपूर्व व पध्दतशीररित्या तांबेरा प्रतिबंधक जाती शोधून काढण्याचे काम सन १९४२ पासून महाबळेश्वर व निफाड येथे सुरू करण्यात आले. सन १९७१ पासून गहूसंशोधनावर अखिल भारतीय समन्वित योजना सुरू होऊन संशोधन कार्यात गती आली. तसेच व्दिकल्प विभागाचे (महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्य) संशोधन कार्याचे समन्वय व त्यावर देखरेख ठेवण्याचे काम या केंद्रामार्फत होत असे.

संकरित कार्यक्रम निफाड

येथे तांबेरा प्रतिकारक वाण निर्माण करण्यासाठी संकर कार्यक्रम घेण्यात आला. त्याकाळी तांबेरा प्रतिकारक वाणाची संकर कार्यासाठी उपलब्धता नसल्यामुळे, प्रामुख्याने खपली गव्हाचा वापर करण्यात आला. संकर कार्यक्रमातून खालील वाण प्रसारित करण्यात आले.

 1. सन १९३४ : जय (बन्सी)
 2. सन १९३९ : विजय (बन्सी)
 3. सन १९४२ : निफाड-४ (सरबती) महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीखाली असणा-या ड्युरम गव्हास बन्सी आणि बागायती क्षेत्रात असणा-या डयुरम गव्हास बक्षी संबोधले जाते. चपातीसाठी असलेल्या गव्हास सरबती गहू म्हणतात.

देशी विदेशी वाणांचा संकर

संकर कार्यक्रमासाठी केनिया, आस्ट्रेलिया, चीन व आफ्रिका या देशांकडून प्राप्त झालेले केनिया-३-१४४, के.सी.-१०८५४, थेंचर, होफेड-१, चार्टर, कॅबो, डारवीन असे विविध गुणधर्म असलेले वाण संकर कार्यक्रमासाठी वापरण्यात आले. या संकर कार्याक्रमातून खालील वाण प्रसारित करण्यात आले. १) सन १९५४ : एन.३४५ व एन.आय. - १७९ २) सन १९६१ : केनफाड-२५ व केनफाड-३९

संशोधन केंद्र

मराठवाडा : या विभागात परभणी येथे सन १९२९ मध्ये गहू संशोधनास सुरूवात झाली. सन १९५१ मध्ये गहू विशेषज्ञ हे पद बदनापूर येथे निर्माण करण्यात आले. सुरूवातीच्या कालखंडात परभणी येथून शुध्द ओळ

चाचणीव्दारे पी.डब्लू-३, पी.डब्लू-५ व पीडब्लू-७ हे वाण प्रसारित करण्यात आले. सन १९८० च्या दशकानंतर पुढील वाण व्रसारित करण्यात आले.

 1. सन १९८१ : अजंठा
 2. सन १९८९ : कैलाश (पी.बी.एन.-१४२)
 3. सन १९९२ : पी.बी.एन-५१ विदर्भ: या विभागात सुरुवातीस नागपूर येथे गहूसंशोधनास सुरुवात झाली. कालांतराने सन १९६३-६४ मध्ये वाशिम येथे उपकेंद्राची स्थापना करण्यात आली. सध्या अकोला आणि वाशिम येथे गहूसंशोधनाचे काम कार्यरत आहे.

या विभागातून खालील वाण प्रसारित करण्यात आले.

 1. सन २oo५ : शरद (ए.के.डब्लू-२९९७-१६)
 2. सन २oo५ : विमल (ए.के.डब्लू-३७२२)
 3. सन २00९ : ए.के.डब्लू-४६२७
 4. सन २०१o : पी.डी.के.व्ही. वाशिम
 5. सन २०१५ : सरदार (ए.के.डब्लू४२१o-६) आघारकर संशोधन संस्था : पुणे येथील आघारकर संशोधन संस्था गहू संशोधनावर कार्य करित आहे.

या संस्थेकडून पुढील वाण प्रसारित

 1. सन १९७८ : एम.ए.सी.ए. १९६७
 2. सन १९९0 : एम.ए.सी.ए. २४९६
 3. सन १९९५ : एम.ए.सी.ए.२६९४
 4. सन १९९६ : एम.ए.सी.ए. २८४६
 5. सन २oo३ : एम.ए.सी.ए. ३१२५
 6. सन २०१o : एम.ए.सी.ए.६२२२
 7. सन २0१४ : एम.ए.सी.ए.६४७८

गहू संशोधन केंद्र, निफाड : सन १९३२ पासून या संशोधन केंद्राने आतापर्यंत २७ गव्हाचे वाण प्रसारित केले आहेत.

 1. सन १९६२ : एन.आय. १४६ व एन- ५९
 2. सन १९६५ : एन. आय. ७४७-१९
 3. सन १९७२ : एन. आय. ५४३९ ४) सन १९७३ : एन. आय. ५६४३
 4. सन १९७५ : एन. आय. ५७४९
 5. सन १९८५ : विनता (एन ८२२३)
 6. सन १९९५ : कादवा (एन ९९४७) व एन. आय. डब्लू ३४
 7. सन २oo१ : त्र्यंबक (एन. आय. डब्लू. ३०१)
 8. सन २00२ : पंचवटी (एन.आय.डी.डब्लू १८)
 9. सन २00५ ; गोदावरी (एन.आय डी डब्लू. ३९५)
 10. सन २oo५ : तपोवन (एन.आय.डब्लू९१७)
 11. सन २०१० : नेत्रावती (एन.आय डब्लू १४१५)
 12. सन २0१४ : फुलेसमाधान (एन.आय.डब्लू १९९४)

बुटक्या वाणांची ओळख

बुटक्या वाणांच्या निर्मितीसाठी सन १९६३ मध्ये सिमीट मेक्सिको येथून कल्याणसोना व सोनालिका हे वाण महाराष्ट्रातून प्रसारित करण्यात आले व ते अतिशय लोकप्रिय झाले. त्यानंतर मध्यम उंची असणारे अनेक वाण प्रसारित करण्यात आले.

अखिल भारतीय समन्वित योजना

या योजनेच्या माध्यमातून अनेक वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात

वाणाचे नाव वैशिष्ट्ये
कोरडवाहू लागवड
पंचवटी (एन.आय.डी.डब्लू-१५) १) जिरायत पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण २) दाणे टपोरे ,चमकदार आणि आकर्षक ३)प्रथिनांचे प्रमाण १२ टक्के  ४) ताबेरा रोगास प्रतिकारक ५)रवा, शेवया , कुरड्या यासाठी उत्तम   ६) पिक १०५-११० दिवसात कापणीस तयार    ७)उत्पादन १२ ते १५ क्विंटल प्रतीहेक्टर
नेत्रावती (एन.आय.डब्लू.१४१५) १) द्वीपकल्प विभागातील जीरायातीत किंवा एका ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी    २)ताबेरा रोगास प्रतिकारक    ३) प्रथिने १२ टक्केपेक्षा जास्त    ४) चपातीसाठी उत्तम    ५) लोह ४३ पीपीएम ,जस्त ५५.५ पीपीएम     ६) उत्पादन - जिरायत १८ ते २० क्विंटल प्रतिहेक्टर  एक सिंचन - २२ ते २५ क्विंटल प्रतिहेक्टर
बागायती वेळेवर पेरणी
त्रंबक (एन.आय.डब्लू.-३०१) १)बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण                 २) दाणे टपोरे आणि आकर्षक ३)प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक    ४) ताबेरा रोगास प्रतिकारक ५) चापातीसाठी उत्तम वाण ६) पिक ११०-११५ दिवसात कापणीस तयार ७) उत्पादन ४५ ते ५० क्विंटल प्रतिहेक्टर
तपोवन (एन.आय.डब्लू.-९१७) १)बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण                 २) दाणे मध्यम परंतु आंब्यांची संख्या जास्त ३) प्रथिनांचे प्रमाण १२.५ टक्के ४)तांबेरा रोगास प्रतिकारक ५)चापातीसाठीउत्तम वाण६) पिक ११५-१२० दिवसात कापणीस तयार ७) उत्पादन ४५ ते ५० क्विंटल प्रतीहेक्टर
गोदावरी (एन.आय.डब्लू-२९५) १)बागायत वेळेवर पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण २)दाने टपोरे , चमकदार आणि आकर्षक ३) प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक ४) तांबेरा रोगास प्रतिकारक ५)रवा, शेवया,कुरड्या यासाठी उत्तम ६) पिक ११५ -१२० दिवसात कापणीस तयार ७) उत्पादन ४५ ते ५० क्विंटल प्रतीहेक्टर
फुले समाधान (एन.आय.डब्लू-१९९४ १) महाराष्ट्र राज्यातील बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणीसाठी योग्य २) तांबेरा रोगास प्रतिकारक ३) प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा जास्त ४) चापातीसाठी उत्तम वन ५) उत्पादन - वेळेवर पेरणी - ४५ ते ५० क्विंटल प्रतीहेक्टर
एम.सी.एस.६२२२ १) द्वीपकल्प विभागात बागायती वेळेवर पेरणीसाठी शिफारशी सरबती वान२) टपोरे दाणे३) प्रथिने १२.५ टक्केपेक्षा अधिक ४)तांबेरा रोगास प्रतिकारक ५) चापातीसाठी उत्तम वान ६) पिक ११५-120DIVSAT कापणीस तयार ७) उत्पादन ४५ ते ५० क्विंटल प्रतिहेक्टर
एम.सी.एस.-६४७८ १) द्वीपकल्प विभागात बागायतीत वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत सरबती वान २) टपोरे दाने ३) प्रथिने १४ टक्केपेक्षा अधिक ४) तांबेरा रोगास प्रतिकारक ५) चापातीसाठी उत्तम वाण ६) सूक्ष्म मूलद्रव्ये (उच्च पोषणमुल्ये )- लोह ४२.८ प्रद्भा , जस्त ४४.१ प्रदभा (प्रती दशलक्ष  भाग)७) पक्क होण्याचा कालावधी ११५ ते १२० दिवस ८) उत्पादनक्षमता  ४७ ते ५२ क्विंटल प्रतीहेक्टर

आले. त्यात प्रामुख्याने एच.डी. २१८९, एच. डी. २२७८, एच.डी.२३८o, एच.डी.२५o१, डी.डब्लू.आर. १६२ या वाणांचा समावेश आहे. एच.डी. २१८९ हा वाण अतिशय लोकप्रिय झाला. सन १९९५ नंतर यु.एस. ४१५, यु.एस. ४२८, यु.एस. ३0४, यु.एस. ४४६, एच.डी.२९८७, एच.डी. २९३२, एच.डी.२८८३, एच.आय. ८६६३, डी.बी.डब्लू ९३, डी.डब्लू.आर. १९५, पी.बी.डब्लू. ५९६, एच.डी.डब्लू५१o, के ९६४४ असे विविध वाण विविध परिस्थितीच्या लागवडीसाठी प्रसारित करण्यात आले. प्रचलित वाण : सद्यस्थितीत महाराष्ट्रात विविध प्रकारच्या लागवडीसाठी पुढील वाण प्रसारित करण्यात आले आहेत.

विविध विभागात कार्यरत असलेले गहू संशोधन

 1. कृषिविद्या विभाग : आशादायी जातीच्या निरनिराळया पेरणीच्या वेळा, रासायनिक खतांच्या मात्रा, पाण्याच्या पाळया, पाणी देण्याच्या पध्दती, हेक्टरी बियाणांचे प्रमाण, दोन ओळीतील अंतर इ. बाबीवर संशोधन करणे.
 2. गहूरोप पैदास : अधिक उत्पादन देणा-या, तांबेरा, करपा इ. रोगास प्रतिकारक, अवर्षण व उष्णता प्रतिरोधक असणा-या चांगल्या प्रतीच्या तसेच सर्व भागास उपयुक्त ठरणा-या गव्हाच्या जाती निर्माण करणे.
 3. गहू शरीरक्रियाशास्त्र : यामध्ये प्रामुख्याने उगवणक्षमता, मुळांचा अभ्यास, अवर्षण सहिष्णुता, जास्त तापमान, उष्णता प्रतिरोधकता या बाबीवर संशोधन केले जाते.
 4. वनस्पती विकृतीशास्त्र : यामध्ये प्रामुख्याने गहू पिकावर येणारे विविध रोग जसे-तांबेरा, करपा, काणी यांचा अभ्यास केला जातो. तसेच तांबेरासाठी महाबळेश्वर, तमिळनाडू राज्यातील वेलिंगटन व हिमाचल प्रदेशातील लाहुल रिपती या ठिकाणी चाचणी घेतली जाते.
 5. किटकशास्त्र : गहू पिकावर प्रामुख्याने मावा, तुडतुडे, खोडकिडा या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडींच्या नियंत्रणासाठी या विभागात अभ्यास केला जातो. या व्यतिरिक्त रसानशास्त्र, जैवतंत्रज्ञान या विभागामार्फत सुध्दा संशोधन कार्य केले जाते.

गहू संशोधनाची पुढील दिशा

 1. वान बदल
 2. अधिक उत्पादकता
 3. संकरित गहू निर्मिती
 4. जैवतंत्रज्ञानाचा वापर
 5. बिजोत्पादन कार्यक्रमात सुधारणा
 6. उष्णता प्रतिकारक व पाण्याचा तान सहन करणारे वाण  निर्मिती
 7. आधुनिक पाणी देण्याच्या पद्धती
 8. तन नियंत्रणासाठी संशोधन
 9. सुक्ष्म अन्नद्रव्यांची गरज
 10. खतांचा फवारणीव्दारे वापर इत्यादी संदर्भातील संशोधनास वाव असुन त्यानुसार नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 


3.17857142857
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 17:55:12.764150 GMT+0530

T24 2019/10/17 17:55:12.771489 GMT+0530
Back to top

T12019/10/17 17:55:12.312704 GMT+0530

T612019/10/17 17:55:12.343612 GMT+0530

T622019/10/17 17:55:12.393607 GMT+0530

T632019/10/17 17:55:12.394686 GMT+0530