Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:08:16.349645 GMT+0530
मुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / तृणधान्य / चारसूत्री पद्धतीने भात लागवड
शेअर करा

T3 2019/10/17 18:08:16.355498 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:08:16.384948 GMT+0530

चारसूत्री पद्धतीने भात लागवड

चारसूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने रोपांची चांगली वाढ होते. पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते. त्याचबरोबरीने चांगले उत्पादन मिळते.

चारसूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने रोपांची चांगली वाढ होते. पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते. त्याचबरोबरीने चांगले उत्पादन मिळते. डॉ. नरेंद्र काशीद, डॉ. खुशाल बऱ्हाटे, रावसाहेब सूर्यवंशी
भाताचे सुधारित, संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडूनच खरेदी करावे. लावणी पद्धतीसाठी 40 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे. संकरित जातींसाठी हेक्‍टरी 20 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा थायरम बुरशीनाशक चोळावे. त्यानंतर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धक व 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक प्रति 10 किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन

अ) सेंद्रिय खतांची मात्रा -
हेक्‍टरी 10 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा. 
ब) रासायनिक खतांची मात्रा - हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. संकरित जातीकरिता हेक्‍टरी 120 किलो नत्र, 50किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. यापैकी लागणीच्या वेळी 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले 25 टक्के नत्र लागणीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि उर्वरित 25 टक्के नत्र लागणीनंतर 55 ते 60 दिवसांनी द्यावे. 
क) जैविक खतांची मात्रा
ऍझोला (चार ते पाच क्विंटल प्रति हेक्‍टर) चिखलणीच्यावेळी शेतात मिसळावे. निळे- हिरवे शैवाल प्रति हेक्‍टरी 20 किलो लागणीनंतर आठ ते 10 दिवसांनी शेतात मिसळावे.
* रोपांना जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया - लागवडीपूर्वी रोपे जिवाणू संवर्धकांच्या द्रावणात बुडवावीत. हे द्रावण तयार करण्यासाठी 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर आणि 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक 10 लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात रोपे 20 मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यानंतर पुनर्लागवड करावी

चारसूत्री लावणी तंत्रज्ञान


सूत्र 1 -
भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळावी. पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्‍टरी अंदाजे दोन टन भाताचा पेंढा लावणीपूर्वी शेतात गाडावा. त्यामुळे पालाश 20-25 किलो आणि सिलिका 120 किलो उपलब्ध होते. रोपे कणखर होऊन खोडकिडीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.
सूत्र 2 -
प्रति गुंठा गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) झाडाची 30 किलो पाने चिखलणीपूर्वी सात ते आठ दिवस अगोदर पसरावीत. भात रोपांना सेंद्रिय नत्र हेक्‍टरी 10 ते 15 किलो उपलब्ध होते. तसेच उंदरांचा प्रादुर्भाव कमी होतो.
सूत्र - 3 - नियंत्रित लावणी -
- नियंत्रित लावणी करावयाच्या सुधारित दोरीवर 25 सें.मी. व 15 सें.मी. आलटून (-25-15-25-15-सें.मी.) अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर 15 सें.मी. अंतरावर असलेल्या (प्रत्येक दोन ते तीन रोपे/चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. त्यानंतर अंदाजाने 15 सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. त्यानंतर मार्गदर्शक वापरून 40 सें.मी. दोरी मागे सरकवावी. पुन्हा जोड-ओळ पद्धत (चार चूड) वापरून खाचरातील नियंत्रित लावणी पूर्ण करावी. खाचरात 15 x 15 सें.मी. चुडांचे चौकोन व 25 सें.मी. चालण्याचे रस्ते तयार होतात. 
- लावणी करताना प्रत्येक चुडात दोन ते तीन रोपे सरळ व उथळ (दोन ते चार सें.मी. खोलीवर) लावावीत. संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे.
सूत्र 4 - युरिया-डीएपी ब्रिकेटचा वापर -
नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी 2.7 ग्रॅम वजनाची (युरिया-डीएपी) एक ब्रिकेट (खताची गोळी) हाताने सात-10 सें.मी. खोल खोचावी. एक गुंठे क्षेत्रासाठी 625 ब्रिकेट (1.75 कि.ग्रॅ.) लागतात.

पाणी व्यवस्थापन

1) रोप लागणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत एक ते दोन सें.मी. 
2) रोपांच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत दोन ते तीन सें.मी. 
3) अधिक फुटवे येण्याच्या अवस्थेत तीन ते पाच सें.मी. 
4) भात पोटरीच्या अवस्थेत पाच ते 10 सें.मी. 
5) फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत 10 सें.मी. 
6) कापणीपूर्वी 10 दिवस अगोदर पाण्याचा निचरा करावा.
नरेंद्र काशीद, 9881590745 
संपर्क - 02114-235229
(लेखक कृषी संशोधन केंद्र, वडगाव (मावळ), जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

2.98550724638
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:08:16.605510 GMT+0530

T24 2019/10/17 18:08:16.612274 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:08:16.256597 GMT+0530

T612019/10/17 18:08:16.275764 GMT+0530

T622019/10/17 18:08:16.338131 GMT+0530

T632019/10/17 18:08:16.339120 GMT+0530