Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 13:54:1.392300 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 13:54:1.398238 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 13:54:1.432736 GMT+0530

कमी पाणी भात जाती

नेपाळमधील पीक उत्पादनवाढीसाठी नेपाळ कृषी संशोधन परिषद ही संस्था काम करते. या संशोधन केंद्राने आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राच्या सहकार्याने पाण्याचा ताण सहन करणाऱ्या भाताच्या तीन जाती विकसित केल्या आहेत.

नेपाळमधील पीक उत्पादनवाढीसाठी नेपाळ कृषी संशोधन परिषद ही संस्था काम करते. या संशोधन केंद्राने आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राच्या सहकार्याने पाण्याचा ताण सहन करणाऱ्या भाताच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. या जातींच्या प्रसारणासाठी नेपाळमधील बियाणे प्रसारण समितीने नुकतीच मान्यता दिली. सुखा धान -१, सुखा धान -२ आणि सुखा धान -३ अशा या जाती आहेत. या जातींचे उत्पादन पारंपरिक जातींपेक्षा प्रति हेक्‍टरी एक टनाने जास्त आहे. या जातींमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती असल्याने पाऊस कमी झाला तरी त्याचा परिणाम उत्पादनावर होत नाही. या जातींबद्दल माहिती देताना आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील बियाणे पैदासकार डॉ. अरविंद कुमार म्हणाले, की आम्ही हर्दीनाथ, नेपाळगंज, लामगंज भागातील शेतकऱ्यांच्या शेतावर सुखा धान - १, सुखा धान - २ आणि सुखा धान - ३ या जातींच्या लागवडीच्या चाचण्या घेतल्या आहेत.

कमी पावसाच्या काळातही या जातींनी इतर जातींपेक्षा चांगले उत्पादन दिले आहे. या जाती कमी पावसाच्या भागातही लागवडीसाठी चांगल्या आहेत. नेपाळचा विचार करता तराई भागात जवळपास ७१ टक्के क्षेत्रावर भात लागवड केली जाते. या क्षेत्रापैकी ४५ टक्के क्षेत्रामध्ये पाऊसमान कमी आहे, त्यामुळे या भागातील भात उत्पादनवाढीसाठी या जाती निश्‍चितच फायदेशीर ठरणार आहेत. नेपाळमध्ये दरवर्षी २.९२ दशलक्ष टन तांदळाची मागणी आहे. त्यामध्ये दरवर्षी ३.५ टक्‍क्‍यांनी वाढ होत आहे. भविष्यातील भाताची वाढती मागणी लक्षात घेता या नवीन जातींच्या लागवडीमुळे उत्पादनात वाढ होणार आहे. या जाती भारत तसेच बांगलादेशातील भात उत्पादकांच्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

स्त्रोत: अग्रोवन

3.04285714286
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 13:54:1.886076 GMT+0530

T24 2019/10/18 13:54:1.902674 GMT+0530
Back to top

T12019/10/18 13:54:1.317274 GMT+0530

T612019/10/18 13:54:1.340965 GMT+0530

T622019/10/18 13:54:1.380889 GMT+0530

T632019/10/18 13:54:1.381829 GMT+0530