Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/20 12:56:44.646600 GMT+0530
मुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / तृणधान्य / विकसित होताहेत गव्हाच्या जाती
शेअर करा

T3 2019/06/20 12:56:44.651884 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/20 12:56:44.681158 GMT+0530

विकसित होताहेत गव्हाच्या जाती

गुजरातमधील जुनागढ कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राने प्रक्रिया उद्योगाच्यादृष्टीने गव्हाच्या जाती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

गुजरातमधील जुनागढ कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राने प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने गव्हाच्या जाती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या या संशोधन केंद्रामध्ये वाढत्या तापमानाचा ताण सहन करणाऱ्या जातींच्या निर्मितीबाबत संशोधन सुरू आहे. या केंद्रातील संशोधनाबाबत अधिक माहिती देताना गहू तज्ज्ञ बी. ए. कुनादिया म्हणाले, की येत्या दोन वर्षांत आम्ही प्रक्रिया उद्योगाची मागणी लक्षात घेऊन ब्रेड, चपाती, मॅकारोनी आणि बिस्कीट निर्मितीसाठी जाती विकसित करणार आहोत.

गुजरातमधील सौराष्ट्र विभागात थंडीचा कालावधी इतर भागांपेक्षा कमी आहे, त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाळा संपताच लगेच गव्हाच्या लागवडीस सुरवात करतात, त्यामुळे इतर भागांपेक्षा येथे ३० टक्‍क्‍यांनी उत्पादन कमी येते. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कमी थंडीतही चांगले उत्पादन देणाऱ्या जातींच्या निर्मितीवर आम्ही भर दिला आहे. आमच्या संशोधन केंद्राने यापूर्वी तांबेरा प्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केलेल्या आहेत.

क्षारप्रतिकारक गहू

ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी गव्हाची क्षार सहनशील सुधारित जात यापूर्वी विकसित केली आहे. ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक ऍण्ड रिसर्च ऑर्गनायझेशन (सीएसआयआरओ) या संस्थेतील प्लांट इंडस्ट्री रिसर्च विभागातील शास्त्रज्ञांचे हे संशोधन आहे. ट्रिटिकम मोनोकॉकम या जातीच्या गव्हातील क्षार सहनशीलतेसाठी कारणीभूत असलेली एनएएक्‍स १ आणि एनएएक्‍स २ ही दोन जनुके या प्रयोगात वेगळी करण्यात आली.

ड्युरम जातीच्या गव्हामध्ये ती टाकण्यात आली. मॉलिक्‍युलर मार्कर पद्धतीचा वापर त्यात करण्यात आला. या जनुकांमुळे सोडिअम या विषारी क्षाराच्या मुळापासून शेंड्याकडे होणाऱ्या वहनाला अडथळा आणला जातो. क्षारपड जमिनींमध्ये ही जात सध्याच्या जातींच्या तुलनेत २५ टक्के अधिक उत्पादन देते, असे आढळले आहे.

स्त्रोत: अग्रोवन

3.1125
सरिता राज . चिंधालोरे Jan 31, 2017 07:10 PM

86*****49

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/20 12:56:44.897652 GMT+0530

T24 2019/06/20 12:56:44.903663 GMT+0530
Back to top

T12019/06/20 12:56:44.557011 GMT+0530

T612019/06/20 12:56:44.575427 GMT+0530

T622019/06/20 12:56:44.636112 GMT+0530

T632019/06/20 12:56:44.637042 GMT+0530