অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भरडधान्य : संशोधनाचा मागोवा , सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल

भल्लंड ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, सावा कोद्धा, राळा इ. पिके देशात तसेच राज्यात कोरडवाहू क्षेत्रात डोंगराच्या उतारावर तसेच वर्कस जमिनीत घेतली जातात. काही राज्यात उदा. कर्नाटकात भारी जमिनीतही घेतात.

ही पिके अन्नधान्याबरोबर उत्कृष्ट प्रतींच्या चाच्यासाठी प्रसिद्ध आहेत. मुख्यत्वे या धान्यातील उपलब्ध पोषक घटकामुळे कुपोषण टाळण्यासाठी आहारात समावेश गरजेचा आहे. आपल्या देशात गव्ह्याच्या, भाताच्या तसेच ज्वारी, बाजरी या पिंकांचे अधिक उत्पन्न देणारे सुधारित वाण आणि संकरित वाण तसेच सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे हरितक्रांती होऊन या अन्नधान्य पिकांचे उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात वाढले.

सरकारी पातळीवर धोरणात्मक निर्णय होऊन विशेषतः गहू व तांदूळ यांची खरेदी करून सार्वजनेिक वितरण व्यवस्थेमार्फत संपूर्ण देशभर वाटप करण्यात आले. त्यामुळे लोकांचा कल फक्त गहू व भात याकडे वळला. परिणामी विविध राज्यात विविधतापूर्ण इतर धान्याच्या विशेषतः भरडधान्यांचा आहारात वापर अत्यंत कमी झाला. त्यामुळे शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून सर्व भरडधान्याखालील क्षेत्र कमी झाले. त्याचप्रमाणे खालील बाबींसुद्धा त्यासाठी कारणीभूत आहेत.

  1. गहू, तांदुळाची सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून स्वस्तदरात उपलब्धता.
  2. दरडोई उत्पन्न वाढून क्रयशक्ती वाढल्याने आहारातील घटकांचा अग्रक्रम बदलला म्हणून तृणधान्याकडे दुर्लक्ष.
  3. ज्वारी, बाजरी, नाचणी इ. पासून खाद्यपदार्थ उदा. भाकरी तयार करणे कष्ट्दायक व वेळ खाऊ असल्याने गृहिणीकडून या धान्यांना नापसंती.
  4. जनतेमध्ये या धान्यातील पोषक तत्त्वाबाबतचे अज्ञान मात्र असे असले तरी हवामान बदलातून निर्माण झालेल्या विविध समस्या तसेच गहू व तांदूळ या दोनच धान्याच्या आहारातील समावेशाने निर्माण झालेला आरोग्य समस्यांचा विंचार करता भरडधान्यातील पोषक घटक व इतर महत्वाच्या गुणधर्मामुळे येणा-या काळात त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांचा समावेश जास्तीतजास्त प्रमाणात शेतीत व आहारात करणे क्रमप्राप्त आहे.

हवामान बदलामुळे मुख्यत्वे तपमानवाढ, वारंवार येणारे अवर्षण तसेच कर्बद्वीप्रणाली वायूचे वाढते प्रमाण या समस्यांना आपण सामोरे जात आहोत. ज्वारी, बाजरी, नाचणी इ. पिंकात असणा-या नैसर्गिक गुणामुळे ते अधिक तपमान व अवर्षणप्रतिकार क्षमतेमुळे अशा हवामानात तग धरतात. त्याचप्रमाणे ही पिके -४ या वर्गात असल्याने जास्त कर्बद्वीप्रणाली वायू वापरून अधिक उत्पज्ञ देतात. या महत्वाच्या गुणधर्मामुळे हवामानाच्या बदलात ही पिके समर्थ पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.

आहारातील महत्व

सर्वसाधारणपणे ज्वारी, बाजरी, नाचणी इ. धान्यात खालील महत्वाचे गुणधर्म आहेत (तक्ता क्र. १).

  1. सर्वाधिक तंतुमय पदार्थ.
  2. कॅल्शियम व लोहाचे प्रमाण जास्त.
  3. सूक्ष्म अन्नद्रव्याची अधिक उपलब्धता
  4. प्लूट्रेनमुक्त धान्य.
  5. कर्बोदकांची शरीरात सावकाश उपलब्धता.
  6. कमीं ग्लायर्सेर्मिक इंडेक्स.

तक्ता क्र. १ : भरडधान्यातील पोषणमुल्ये  व इतर धन्याशी तुलना (प्रती १०० ग्रॅम )

धान्य कर्बोदके प्रथिने स्निग्धांश तंतुमय पदार्थ खनिज द्रव्ये कॅल्शीयम (मी.गॅ) फॉस्फरस   (मी.गॅ) लोह (मी.गॅ)
नाचणी ७२.० ७.३ १.३ ३.६ २.७ ३४४ २८३ ३.९
कोद्रा ६५.९ ८.३ १.४ ९.० २.६ २७

 

१८८

०.५
वरी ७०.४ १२.५ १.१ २.२ १.९ १४ २०६ ०.८
राळा ६०.९ १२.३ ४.३ ८.० ३.३ ३१ २९० २.८
सावा ६७.० ७.७ ४.७ ७.६ १.५ १७

 

२२०

९.३
बर्टी ६५.५ ६.२ २.२ ९.८ ४.४ २० २८० ५.०
ज्वारी ७२.६ १०.४ १.९ १.६ १.६ २५ २२२ ४.१
बाजरी ६७.५ ११.६ ५.० १.२ २.३ ४२ २९६ ८.०
गहु ७१.२ ११.८ १.५

१.२

 

१.५ ४१ ३०६ ५.३
तांदूळ ७८.२ ६.८ ०.५ ०.२ ०.६ १० १६० ०.७

वरील सर्व गुणधर्मामुळे ही धान्य आहाराच्या दृष्टीने आदर्शवत आहेत . ज्या राज्यात भाताचा आहारात अतिरेकी  वापर होतो

उदा. आंध्र, तेलगंणा तेथे मधुमेहाची गाणी' फार मोठी समस्या निर्माण झाली आहे, म्हणून  उल्लेख केला जातो, तो अतिशय धोक्याचा इशारा  मुलामध्ये ब-याच समस्या उत्पन्न झाल्या आहेत. सिलीयाक डीसीज नावाच्या या समस्येमुळे लहान मुलात अन्नाची वासना कमी होते व मुले कुपोषित राहतात, म्हणून या समस्यांवर भरडधान्यांचा आहारातील समावेश हा समर्थ पर्याय ठरतो. भरडधान्यांची सध्यस्थिती साधारण सन १९६० नंतर ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी या पिकाखाली फार मोठे क्षेत्र होते. नव-नवीन वाणामुळे उत्पादकता वाढल्याचे दिसून येते.

ज्वारी सीएसएच-१, सीएसएच-२, ३,४,५ ते आत्तापर्यंत प्रसारित केलेल्या सीएसएच-३१ पर्यंत अधिक उत्पादनक्षम (३0-४५ क्रॅि./हेक्टर) संकरित वाण कमी कालावधीत तयार होऊन (१o५-११० दिवस) कोरडवाहू क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळण्याचा हमखास पर्याय उपलब्ध झाल्याने राज्याचे खरीप ज्वारीचे उत्पादन मराठवाडा, विदर्भ व खानदेशात फार मोठ्या प्रमाणात वाढले. त्याचबरोबर चाराही उपलब्ध झाला.

रब्बी हंगामासाठीसुद्धा स्वाती, फुले यशोदा, फुले वसुधा, अनुराधा, सुचित्रा, रेवती, परभणी मोती पीकेव्ही क्रांती या सरळ वाणांमुळे उत्कृष्ट प्रतीच्या धान्याचे उत्पादन दुप्पट झाले व चारासुद्धा उपलब्ध झाला. याचबरोबर गोड ज्वारी व चा-यासाठी, पापडासाठी, लाह्यासाठी विविध वाण उपलब्ध झाले. कंपन्या यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे राज्याच्या ज्वारी, बाजरी व इतर भरडधान्यच्या उत्पादनात वाढ झालेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशात फार मोठे क्षेत्र ज्वारीखाली आहे.

तक्ता क्र २ : भारतातील विविध भरडधान्याखालील क्षेत्र (दशलक्ष हेक्टर) व उत्पादकता (किलो/हेक्टर)

पिक सन १९५५-५६ सन २०१२-१३
ज्वारी क्षेत्र १७.३६ ६.१८
उत्पादकता ३८७ ८६३
बाजरी क्षेत्र ११.३४ ७.२
उत्पादकता ३०२ १२१४
नाचणी क्षेत्र २.३ १.११
उत्पादकता ८०० १४२८
इतर तृणधान्य क्षेत्र ५.३४ ०.७५
उत्पादकता ३८८ ५७१

 

या पिकात सुध्दा संकरित वाण उपलब्ध असल्याने व पिकोत्पादन तंत्रज्ञान विद्यापीठांनी विकसित केल्याने उत्पादनात फार मोठी वाढ दिसून  आली. मात्र ज्वारी व बाजरी या पिकाखालील क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात घटले. सध्या राजस्थानात बाजरी हे पीक फार मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राज्यात नाचणी हे पीक मुख्यत्वे नाशिक, नंदुरबार, धुळे व कोल्हापूर या जिल्ह्यात घेतले जाते. विविध सरळवाण उपलब्ध झाल्याने उत्पादकता वाढलेली आहे मात्र क्षेत्र फार कमी झाले आहे. वरी, कोद्रा, बर्टी इ. पिके महाराष्ट्र राज्यात फारच थोड्या प्रमाणात आंध्रप्रदेश, झारखंड, उत्तराखंड इ. राज्यात ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. या पिकात मुख्यत्वे सरळवाण उपलब्ध आहेत. भरडधान्यात उपलब्ध असलेल्या विविध महत्वाच्या पोषकतत्वामुळे वाढवणे गरजेचे आहे.

मात्र पारंपरिक पदार्थ भाकरी इ. तयार करण्यास येणा-या अडचणी, गृहिणींचा वेळ, मुलांमध्ये या धान्याची आवड विचार करता या सर्व धान्याचे प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. याद्वारे प्रक्रिया करून बिस्कोट, शेवई, मिश्रधान्य पीठ, रवा इडली, खिचडी, उपमापास्ता, पोहे इ. बरेच पदार्थ तयार करता येतात. त्याचे तंत्रज्ञान सध्या हैदराबाद येथील भारतीय कदन्त्र संशोधन संस्थेत उपलब्ध आहे. या पदार्थाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून ग्राहकांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून पौष्टिक आहार उपलब्ध होऊन आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या आहारविषयक शारीरिक समस्यांवर मात करता येईल. म्हणजेच भरडधान्ये ही हवामान बदलास तसेच कोरडवाहू शेतीत धान्य व चान्यासाठी समर्थ पर्याय आहेत. त्याचप्रमाणे शारीरिक व्याधीवरसुद्धा उत्तम इलाज ठरतील. त्याकरिता खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे.

  1. कोरडवाहू शेतीत भरडधान्यांना एक संरक्षित पाणी दिल्यास उत्पादन दुप्पट
  2. शालेय मुलांच्या दुपारच्या पोषण आहारात भरडधान्याच्या प्रक्रियायुक्त पदार्थाचा समावेश करणे गरजेचे आहे.
  3. या धान्यांच्या उत्पादन वाढीकरिता प्रमाणित बीजोत्पादन कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर राबवणे.
  4. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून जे धान्य ज्या विभागात आहारात घेतात तिथे प्रामुख्याने वितरण करणे.
  5. देशात विविध राज्यात हवामानानुसार विविध भरडधान्यपिकांचे उत्पादन क्षेत्र (Production hub) निर्माण करून त्या भागातच प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबतचे धोरण आखणे.
  6. नागरिकांच्या आरोग्याशी ही सर्व भरडधान्य निगडीत असल्याने, जे शेतकरी या धान्याचे उत्पादन करतात त्यांच्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना आखून या पिकासाठी गटशेतीचा प्रयोग केल्यास उद्योग उभारणीसाठी कच्च्यामालाची उपलब्धता खात्रीशीर होऊन शेतक-यांनासुद्धा मालाला चांगला भाव मिळेल.
  7. भरडधान्य पिकापासून मिळणारा चारा हा उत्तम प्रतीचा असल्याने चान्यातसुद्धा मूल्यवर्धन करणे शक्य आहे. जेणेकरून इतर पिकापासूनच्या चा-यात हा मिसळल्यास जनावरांना सकस चारा मिळेल.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate