Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:01:54.944736 GMT+0530
मुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / तृणधान्य / भात पिकातील स्वयंपूर्णतेसाठी
शेअर करा

T3 2019/10/18 04:01:54.950590 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:01:54.981291 GMT+0530

भात पिकातील स्वयंपूर्णतेसाठी

भात पिकात स्वयंपूर्णता मिळवण्याच्या फिलिपिन्समधील सुरू असलेल्या प्रकल्पाला आता भाताच्या नव्या जातींच्या उपलब्धतेमुळे बळकटी आली आहे.

भात पिकात स्वयंपूर्णता मिळवण्याच्या फिलिपिन्समधील सुरू असलेल्या प्रकल्पाला आता भाताच्या नव्या जातींच्या उपलब्धतेमुळे बळकटी आली आहे. याच देशात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेने (आयआरआरआय) शेतकऱ्यांसाठी नवे तंत्रज्ञान प्रात्यक्षिक भेट कार्यक्रम आयोजित करून त्यांना या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. संस्थेने शेतकऱ्यांसाठी नव्या जातीही उपलब्ध केल्या आहेत.

आयआरआरआय ही फिलिपिन्स येथे भात पिकात कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आहे. देशातील सुमारे 350 शेतकऱ्यांनी आयआरआरआय संस्थेच्या कार्यक्षेत्राला अलीकडेच भेट देऊन भाताच्या नव्या जातींची पाहणी केली. या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांना हवामान बदलाला सुसंगत असलेल्या तसेच विविध संकरित जाती पाहण्यास मिळतीलच शिवाय काढणीपश्‍चात तंत्रज्ञान तसेच भात-मका पीक पद्धतीची प्रात्यक्षिकेही अभ्यासता येत आहेत.

आयआरआरआयचे संचालक डॉ. रॉबर्ट झायग्लर आपल्या या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाले, की प्रचलित जातींच्या तुलनेत नव्या जाती शेतकऱ्यांसाठी अधिक किफायतशीर ठरणार आहेत. आमच्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांना हा अनुभव देण्यात आम्हाला आनंद होत आहे. नव्या जातींपैकी आयआरआरआय- 154 या जातीने राष्ट्रीय पातळीवरील चाचण्यां मध्ये हेक्‍टरी दहा टनांपर्यंत उत्पादन दिले असून सरासरी उत्पादन सहा टनांपर्यंत मिळाले आहे.

फिलिपिन्समधील सध्या अधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्य व लोकप्रिय असलेल्या पीएसबी ठल 82 या जातीपेक्षा या जातीची उत्पादनक्षमता कितीतरी पटीने अधिक आढळली आहे. या देशातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याला सुसंगत जाती विकसित केल्या जात आहेत. फिलिपिन्समध्ये भात पिकात स्वयंपूर्णता मिळवायची असेल तर पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करणे गरजेचे आहे यावर अधिक भर देण्यात आला आहे. दर्जेदार बियाणे व त्याला चांगल्या व्यवस्थापनाची जोड यातूनच शेतकरी आपले उत्पादन वाढवू शकतात असे डॉ. झायग्लर यांनी म्हटले आहे. संस्थेतर्फे शेतकऱ्यांना बियाणे वाटप केले जात आहे.

"आयआरआरआय'ने अलीकडील काळात शेतकऱ्यांसाठी काही उपक्रम राबवले ते असे

  • भात उत्पादकांना खतांचा वापर काटेकोर करता यावा यासाठी मोबाईलच्या माध्यमातून खत वापराविषयी सल्ला
  • उंदरांचा उपद्रव कमी व्हावा यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण
  • भाताच्या स्थानिक जातींचे संवर्धन
  • भाताच्या सर्वोत्कृष्ट शेती व्यवस्थापनासाठी देशपातळीवर कार्यशाळा
  • संकेतस्थळाच्या माध्यमातून ज्ञान व माहितीची उपलब्धता
  • पीक काढणीपश्‍चात नुकसान टाळण्यासाठी साठवणूक तंत्रज्ञानाचा प्रसार
  • सन 2010 मध्ये एक तर 2009 मध्ये तीन यासह 1966 पासून एकूण 88 जाती प्रसारित

------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

2.93243243243
pravin khobragade Sep 08, 2015 10:22 PM

भात पिकावरील विविध रोग व त्या वरील उपाय .तसेच भात पिकामध्ये असणारे विविध प्रकारचे तन (कचरा )मारण्यासती कोणती ओषधी (तन नाशक)याचे नाव सागावे हीच अपेशा. प्रवीण खोब्रागडे रा .करंजी त. गोंडपिपरी जी .चंद्रपूर

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:01:55.221353 GMT+0530

T24 2019/10/18 04:01:55.227750 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:01:54.874830 GMT+0530

T612019/10/18 04:01:54.894969 GMT+0530

T622019/10/18 04:01:54.933637 GMT+0530

T632019/10/18 04:01:54.934552 GMT+0530