Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/16 17:46:16.412629 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/16 17:46:16.418057 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/16 17:46:16.447979 GMT+0530

भात पिकाला योग्य खतमात्रा

सध्याच्या कालावधीत भात रोपांच्या पुनर्लागवडीचे काम पूर्ण झाले आहे. यानंतरच्या काळात पिकाला शिफारशीनुसार खतमात्रेचा दुसरा हप्ता देणे आणि आंतरमशागत करणे महत्त्वाचे आहे.

नत्रामुळे भात पिकाची वाढ जोमदार होते. स्फुरदामुळे मुळांची वाढ चांगली होऊन फुलोरा चांगला धरला जातो. पालाशमुळे कणखरपणा येऊन पीक लोळत नाही, तसेच तांदळातील पिष्टमय पदार्थ तयार होण्यास मदत होते

1.भात लागवडीसाठी हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस करण्यात आली आहे. ही खतमात्रा हळव्या जातींमध्ये लागणीच्या वेळी 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश या समतोल प्रमाणात आपण दिली असेल. आता त्यांनी उरलेले 25 टक्के नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि 25 टक्के नत्र 55 ते 60 दिवसांनी द्यावे.

2. निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लागणीच्या वेळी 40 टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाशची मात्रा दिली असेलच. आता लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी 40 टक्के नत्र आणि 20 टक्के नत्र लागवडीनंतर 55 ते 60 दिवसांनी द्यावे.
3. संकरित जातींकरिता हेक्‍टरी 120 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी खतमात्रा लागवडीवेळी 50 टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश या प्रमाणात दिली असेलच. त्यांनी आता उरलेले 25 टक्के नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि उर्वरित 25 टक्के नत्र लागवडीनंतर 55 ते 60 दिवसांनी द्यावे.
3) नत्रयुक्त खते देण्याच्या वरील वेळा पिकाच्या वाढीतील महत्त्वाच्या अवस्था व त्याची त्या त्या वेळची गरज लक्षात घेऊन ठरविल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या प्रदेशात पोषक द्रव्ये खताच्या स्वरूपात एकाच हप्त्यात द्यावीत.
4) खताचा दुसरा व तिसरा हप्ता देण्यासाठी भाताच्या रांगांमध्ये पानावर खत पडणार नाही अशा रीतीने ओळीतून द्यावे.

नत्रखते

1) नत्र हे पोषक द्रव्य अमोनिया किंवा नायट्रेट या स्वरूपात पिके शोषून घेतात. अमोनियायुक्त खतातील अमोनिया मातीच्या कणाच्या विशिष्ट गुणधर्मामुळे मातीच्या कणाभोवती धरून ठेवला जातो. त्यामुळे तो पाण्याबरोबर वाहून जात नाही किंवा निचऱ्यावाटे निघून जात नाही.
2) नायट्रेटयुक्त किंवा अमाईडयुक्त खतातील नत्र मातीच्या कणांभोवती धरून ठेवला जात नसल्याने पाण्याबरोबर वाहून जातो किंवा निचऱ्यावाटे निघून जातो.
3) निंबोळी पेंडीयुक्त युरिया भात खाचरात चिखलणीच्या वेळी सम प्रमाणात फोकून दिल्यास निचऱ्याद्वारी नत्र खत वाहून जात नाही.
4) भात खाचरात पाणी साठून राहिल्यास नायट्रेटयुक्त खतातील नायट्रेटचे विघटन होण्यासाठी धोका असतो. अमोनियायुक्त नत्र खतांचा वापर अधिक उपयुक्त ठरतो.

स्फुरद आणि पालाशयुक्त खते

1) जास्त पावसामुळे भात जमिनीतील चुना निचरून जातो. त्यामुळे मातीच्या कणांवरील ऍल्युमिनियमचे प्रमाण वाढते. तसेच लोह व ऍल्युमिनियम यांचे त्यांच्या योगाने हायड्रोलिसीस होते. त्यामुळे हायड्रोजन आयन्सचे प्रमाण वाढून त्याचा सामू खाली येतो.
3) अशा जमिनीत स्फुरद हे सुपर फॉस्फेटच्यिा रूपात वापरल्यास त्यांचा जमिनीतील लोह व ऍल्युमिनियमशी संयोग होऊन तो पिकास उपलब्ध होत नाही. म्हणून अशा जमिनीत स्फुरद हे रॉक फॉस्फेटच्या स्वरूपात वापरावे. पालाशयुक्त खताची अशी वैशिष्ट्ये नाहीत.
4) मिश्र खते किंवा संयुक्त खते भात शेतीसाठी खरेदी करताना त्यातील नत्र आणि स्फुरद कोणत्या स्वरूपात आहे याची माहिती घ्यावी. नत्र अमोनियाच्या स्वरूपात असावा, तर स्फुरद पाण्यात न विरघळणाऱ्या स्वरूपातील (स्फुरदाचे प्रमाण अधिक) असावा.

भात खाचरातील पाण्याची पातळी

1) रोप लागणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत 1 ते 2 सें. मी.
2) रोपांच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत 2 ते 3 सें. मी.
3) अधिक फुटवे येण्याच्या अवस्थेत 3 ते 5 सें. मी.
4) भात पोटरीच्या अवस्थेत 5 ते 10 सें. मी.
5) फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत 10 सें. मी.

आंतरमशागत

1) भाताच्या पुनर्लावणीनंतर 15 दिवसांनी पहिली बेणणी करून तण काढावे. शेताची स्थिती आणि तणांची तीव्रता यानुसार दर 15 दिवसांनी बेणणी अथवा कोळपणी पीक पोटरीत येईपर्यंत करावी.
2) लागवडीनंतर भात खाचरामध्ये सतत 5 ते 6 सें. मी. पर्यंत पाण्याची उंची ठेवल्यास तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होते.
संपर्क - 02114-235229

 

डॉ. नरेंद्र काशीद, डॉ. खुशाल बऱ्हाटे

(लेखक कृषि संशोधन केंद्र, वडगाव (मावळ), जि. पुणे येथे कार्यरत आहेत..)

स्त्रोत: अग्रोवन

2.91780821918
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/16 17:46:16.671164 GMT+0530

T24 2019/06/16 17:46:16.677773 GMT+0530
Back to top

T12019/06/16 17:46:16.344753 GMT+0530

T612019/06/16 17:46:16.364795 GMT+0530

T622019/06/16 17:46:16.402024 GMT+0530

T632019/06/16 17:46:16.402922 GMT+0530