Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:42:19.965023 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:42:19.970669 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:42:20.003451 GMT+0530

भात रोपवाटिका व्यवस्थापन

भात हे महाराष्ट्र राज्यातील दुस-या क्रमांकाचे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात भात पिकाखाली सुमारे १५.५१ लाख हेक्टर क्षेत्र असून भाताचे वार्षिक उत्पादन ४२.१२ लाख छन तर तांदळाचे वार्षिक उत्पादन २९.४६ लाख ट्न आहे.

भात हे महाराष्ट्र राज्यातील दुस-या क्रमांकाचे प्रमुख अन्नधान्य पीक  आहे. महाराष्ट्रात भात पिकाखाली सुमारे १५.५१ लाख हेक्टर क्षेत्र असून भाताचे वार्षिक उत्पादन ४२.१२ लाख छन तर तांदळाचे वार्षिक उत्पादन २९.४६ लाख ट्न आहे. महाराष्ट्राची भात उत्पादकता २७.१० क्रॅि./हे. आणि तांदळाची उत्पादकता १९.०० क्रॅि./हे. आहे. कोकणात भात मुख्य अन्नधान्य पीक असून ते ४.oo लाख हे. क्षेत्रावर घेतले जाते. कोकण विभागात भाताची सरासरी उत्पादकता ४० क्रॅि./हे. तर तांदळाची उत्पादकता २८.०६ क्वी/हे. इतकी आहे.

भात पीक अधिक किंफायतशीर होण्यासाठी भात पिकाच्या इतर व्यवस्थापनाबरोबरच रोपवाटिका व्यवस्थापन देखील महत्वाचे आहे.

भात रोपवाटिका तयार करण्याच्या पद्धती

गादीवाफा पद्धत

 1. रोपवाटिकेसाठी सुपीक व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
 2. एक हेक्टर लागवडीसाठी १o गुंढे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी.
 3. जमीन उभी आडवी नांगरून, छेकळे फोडून भुसभुशीत करावी.
 4. धसकटे आणि काडीकचरा वेचून घ्यावा.
 5. तळाशी १२० सें.मी. व पृष्ठभागी 90 सें.मी. संदीचे, ८ ते १0 सें.मी. उंचीचे आणि उतारानुसार योग्य लांबीचे गादीवाफे तयार करावेत.
 6. गादीवाफ्यावर गुंठ्याला १oo किलो कुजलेले शेणखत मातीत मिसळून द्यावे.
 7. भाताच्या तुसाची काळी राख गादीवाफ्यावर भाताचे बी पेरण्यापूर्वी प्रति चीं. मी. क्षेत्रास 0.५ ते १.00 केि. प्रमाणात ४ तें 10 से.मी. खॉलीवर मातीत मिसळावी. त्यामुळे रोपांना सिलिकॉन या उपयुक्त अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. रोपे निरोगी व कणखर होतात.
 8. वाफ्यांना १ गुंठा क्षेत्रासाठी १ किलो युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फुट आणि ८५o ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा ३.३३० किलो सुफला १५:१५:१५ या रासायनिक खतांची मात्रा पेरणी करताना मातीत मिसळून द्यावी.
 9. एक गुंठ्यासाठी जाड दाण्याच्या भात जातीचे ६ किलो, बारीकदाण्याच्या जातींचे ४ केि. तर संकरित वाणाचे २ केि. बेियाणे वापरावे. अशाप्रकारे हेक्टरी जाडभात दाण्याच्या जातीचे ६o किं. बारीक दाण्याच्या जातींचे ४o केि. तर संकरित वाणाचे २0 किं. बेियाणे लागते.
 10. शेतकरी स्वतः तयार केलेले बियाणे वापरत असल्यास ३00 ग्रॅम मीठ १o लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करावे. पेरणीपूर्वी बियाणे या द्रावणात ओतावे. नंतर द्रावण ढवळून स्थिर होऊ द्यावे. तरंगणारे पोचट, हलके, किंडकट, रोगट, इत्यादी बियाणे काढून टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे आणि सावलीत वाळवावे.
 11. प्रति क्लिो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम बुरशीनाशक चोळावे.
 12. वाफ्यावर रुंदीस समांतर ओळीमध्ये ७ ते ८ सें.मी. अंतरावर आणि २ ते ३ सें.मी. खोलीवर बियाणे पेरून मातीने झाकून घ्यावे.
 13. रोपवाटिकेतील तणांच्या नियंत्रणासाठी ऑक्झाडायरजील८o डब्ल्यू.पी. किंवा ब्युटाक्लोर ५o ई.सी. यापैकी एक तणनाशक वापरावे.
 14. तणनाशकाचा वापर करताना बियाणे पेरलेले वाफे ओले होताच, बियाणे उगवण्यापूर्वी एका गुंठ्यासाठी १.५० ग्रॅम ऑक्झाडायरुजील ८o डब्ल्यू.पी. किंवा ३0 मि.ली. ब्युटाक्लोर ५o ई.सी. तणनाशक ६ लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तणनाशक फवारणीसाठी फ्लॅट फॅन नोझल वापरावा.
 15. पेरणीनंतर १५ दिवसांनी तणे असल्यास ती काढून एक गुंठा रोपवाटिका क्षेत्रास १ किलो युरिया खताचा दुसरा हसा द्यावा.
 16. खरीप हंगामातील भाताच्या पुनर्लावणीसाठी निवडलेल्या भात जातीचा एकूण कालावधी लक्षात घेऊन कालावधीच्या एक पंचमांश इतक्या वयाची रोपे लावण्यासाठी वापरावीत.

चटई पद्धत

या रोपवाटिकेसाठी लागणारे वाफे, शेतामध्ये किंवा खळ्यावर तयार करावेत. चटई रोपवाटिकेसाठी १.२0 मीटर रुंदीचा व १oo गेजचा प्लॅस्टिकचा कागद वापरावा. एक गुंठा क्षेत्रावरती रोपवाटिका तयार करण्यासाठी साधारणपणे २.५ ते ३ केिलो कागद लागतो. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी प्लॅस्टिकला छिद्रे पाडावीत. सदर प्लॅस्टिक कागद या ठिकाणी आपल्याला रोपवाटिका तयार करावयाची आहे अशा ठिकाणी पसरवून कागदाच्या दोन्ही बाजू विद्य किंवा बांबूच्या सहाय्याने उचलून घ्याव्यात. अशा तयार झालेल्या वाफ्यांमध्ये माती व शेणखत ६g:४0 या प्रमाणात मिसळून ती एक मीटर लांब, अर्धा मीटर रुंद आणि १ इंच उंची असलेल्या लोखंडी फ्रेमच्या सहाय्याने ओतावी. माती व शेणखत फ्रेममध्ये टाकण्यापूर्वी ५ मि.मी. च्या चाळणीतून चाळून घ्यावी. त्यामुळे मातीमधील खडे वेगळे होतील. प्लॅस्टिक कागदावरती शेणखत मिश्रित माती टाकून झाल्यानंतर हाताने झारीने पाणी शिंपडून माती ओली करून घ्यावी व हलकासा दाब द्यावा. अशा वाफ्यावरती सुके किंवा रहू पद्धतीचे म्हणजेच २४ तास पाण्यात भिजवून नंतर २४ ते ३६ तास पोत्यामध्ये बियाणे ठेवून मोड आलेले बियाणे ५oo ग्रॅम प्रति चौ.मी. याप्रमाणे फेकून पेरावे व नंतर चाळलेल्या शेणखत मिश्रित मातीने हलकेसे झाकावे. सुरुवातील २ ते ४ दिवस हाताने किंवा गणेश पंपाच्या सहाय्याने पाणी फवारून द्यावे. रोपे थोडी मोठी झाल्यानंतर गरजेनुसार पाणी द्यावे. रोपांच्या जोमदार वाढीसाठी  चटई रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी प्रति चौ.मी. ला २० ग्रॅम डायअमोनियम फॉस्फेट द्यावे.

अशा पद्धतीने पेरणी आणि व्यवस्थापन केल्यामुळे रोपे साधारण १२ ते १५ दिवसात लावणीयोग्य होतात. रोपांची संख्या दाट असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव सहसा होत नाही आणि जर झालाच तर हाताने तणे उपटून घ्यावीत. तयार झालेली रोपे रोपवाटिकेतून प्लॅस्टिकरोल तयार करून किंवा हव्या त्या आकारामध्ये वाफे कापून मुख्य शेतावर जेथे लावणी करावयाची आहे अशा ठिकाणी आपण वाहून नेऊ शकतो. भाताची लावणी ही लावणी यंत्राच्या सहाय्याने करावयाची झाल्यास ८ इंच रुंदीच्या रोपवाटिकेच्या पट्ट्या कापून त्या लावणी यंत्रात वापरता येतात. अशा पद्धतीने एक चौरस मीटरवरती घेतलेल्या रोपवाटिकेतील रोपे एक गुंठा क्षेत्रासाठी पुरेशी होतात, म्हणजेच एक हेक्टर क्षेत्रासाठी १०० चौ.मी. क्षेत्र म्हणजेच एक गुंठा क्षेत्र रोपवाटिकेसाठी पुरेसे आहे.

राहू पद्धत

रब्बी-उन्हाळी हंगामातील दुबार भात पिकानंतर जमीन नांगरण्यासाठी वापसा स्थितीत येण्यास ब-याच वेळा पुरेसा कालावधी मिळत नाही. अशा करावयाच्या क्षेत्रातील तणे काढून घ्यावीत, चिखलणी करावी व फळी मारुन जमीन सपाट करून नंतर त्यावर ४८ ते ६o तास कालावधीत अंकुरलेले बी (रहू) पेरावे. या पद्धतीनेही रोपवाटिकेतील तणांवर परिणामकारक नियंत्रण ठेवता येते. रायगड जिल्ह्यातील काळ आणि राजनाला प्रकल्पांतर्गत क्षेत्रातील दुबार भात घेणारे काही शेतकरी सरांस या पद्धतीचा अवलंब वर्षानुवर्षे करीत आहेत. मात्र या पद्धतीची प्रमुख त्रुटी म्हणजे अशा पद्धतीने केलेल्या रोपवाटिकेतील रोपे उपटणे कठीण जाते व ब-याच रोपांची मुळे तुटतात. ही बाब विशेषतः चिकणमातीत आढळून येते म्हणून रोपवाटिका क्षेत्राच्या दुस-या नांगरणीच्या वेळी चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खताचा आणि उपलब्ध राखेचा सढळ हस्ते भरपूर वापर करावा. त्यामुळे असे रोप उपटणे सुलभ होते आणि रोपांची मुळे तुटत नाहीत. या पद्धतीत शिफारशीत रोपवाटिकेप्रमाणे जोमदार रोप होण्यासाठी नत्र, स्फुरद व पालाशयुक्त किंवा संयुक्त अगर मिश्रखतांचा वापर करावा. ज्या शेतक-यांना गादीवाफे तयार करणे सोयीचे नसेल, अशा शेतक-यांनी रहूपद्धतीचा अवलंब करावा.

तण व्यवस्थापन

भात रोपवाटिकेत प्रामुख्याने पाखड, धूर, बर्डी, नियंत्रणासाठी कोकणात राब (भाजावळ) या पारंपरिक पद्धतींचा अवलंब प्रचलित आहे. मात्र ही पद्धत अत्यंत वेळखाऊ, कष्टप्रद आणि खर्चीक असून पर्यावरणासाठी मारक आहे. शिवाय अशा कामांसाठी मजुरांचा नियंत्रणासाठी अलीकडे तणनाशकांचा वापरही परिणामकारकपणे करण्याचे किफायतशीर तंत्र विकसीत करण्यात आले आहे. साधारणपणे दहा गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिकेतील रोप एक हेक्टर क्षेत्रास पुनर्लावणीसाठी पुरेसे होते. दहा गुंठे रोपवाटिकेसाठी पुढील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे तणनाशके घेऊन ६० लिटर पाण्यात मिसळून फवारावीत. फवारणीसाठी नॅपरॉक पंप आणि खास तणनाशकांच्या फवारणीसाठी वापरल्या जाणा-या फवारणी तोट्यांचा (नोझल) वापर करावा. तणनाशकाची फवारणी मातीच्या ओलसर पृष्ठभागावर बी ओळीत २.५ सें.मी. खोलीवर पेरून ते मातीने झाकल्यानंतर करावी. म्हणजे तणनाशकाचा बियाण्याशी संपर्क येणार नाही व उगवणीवर अनिष्ट परिणाम टाळता येईल. कोरड्या मातीत (धूळवाफ) वरील पद्धतीने पेरणी करून जमीन पुरेशी ओली झाल्यानंतर तणनाशकांची फवारणी करावी. याशिवाय तणनाशकाची फवारणी पाठीमागे सरकत करावी आणि फवारणी झालेल्या क्षेत्रात जमिनीचा पृष्ठभाग हलविणे टाळावे. फोकून पेरलेल्या भात रोपवाटिकेवर तणनाशक फवारू नये.

भात रोपवाटिकेसाठी तणनाशके

तणनाशकाचे प्रमाण ऑक्झीडायरजिल ( ६ ई.सी.) ब्युटाक्लोर (५० ई.सी.) ऑक्झीडायरजिल(८० डब्लू .पी.)
क्रियाशील घटक वापराचे प्रमाण (कि.ग्रॅ./हे.) ०.१२० १.५ ०.१२०
प्रत्यक्ष तणनाशक वापराचे प्रमाण (लि./हे.) १५० ग्रॅम/हेक्टर
तणनाशक वापर प्रमाण (मि.लि./लि. पाणी) ३.३ ५.० ०.२५ ग्रॅम
तणनाशकाची गरज (मि.लि./गुंठा) २० ३० १.५० ग्रॅम
दहा गुंठे क्षेत्रासाठी लागणारे तणनाशक (मि.लि.) २०० ३०० १५ ग्रॅम
तणनाशक फवारणीची वेळ पेरनिनंतर जमीन ओली होताच अथवा दोन दिवसांपर्यंत

 

कीड व रोग व्यवस्थापन

 • खोडकिडा : भाताच्या रोपवाटिके प्रती चौ.मी. क्षेत्रात १ खोडकिडा पतंग किंवा १ अंडी पुंजका दिसताक्षणी कॉर्बोफ्युरॉन ३ टक्के किंवा फोरेट  १0 टक्के किंवा क्रिनॉलफॉस ५ टक्के यापैमध्येकी कोणतेही एक दाणेदार कीटकनाशक प्रती हेक्टरी अनुक्रमे १६.५ किलो किंवा १५ किलो द्यावे.
 • करपा : थायरम प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम चोळले असता, २० दिवसांपर्यंत रोग नियंत्रण होते. रोपवाटिकेत रोग दिसून आल्यास १ ग्रॅम  कार्बन्डॅझिम किंवा १ ग्रॅम ट्रायसायक्लॅझोल प्रती लिटर पाण्यातून फवारावे.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

3.0
akash Mar 13, 2018 03:56 PM

सर उन्हाळी भात पिकाची वाढ करण्यासाठी काय करावे

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:42:20.224018 GMT+0530

T24 2019/10/18 04:42:20.231994 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:42:19.892233 GMT+0530

T612019/10/18 04:42:19.913829 GMT+0530

T622019/10/18 04:42:19.954360 GMT+0530

T632019/10/18 04:42:19.955207 GMT+0530