Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:22:43.089679 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 06:22:43.095331 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:22:43.126524 GMT+0530

भातावरील करपा रोगाची कारणे

ज्या भागात हा रोग दिसून आला त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरलेल्या व रोगास बळी पडलेल्या भात बियाण्याची तपासणी करता त्यात करपा रोगास कारणीभूत बीजे असल्याचे दिसून आले

भातावरील करपा रोगाची कारणे

डॉ. व्ही. एस. पांडे, डॉ. एम. एस. जोशी

सध्याच्या काळात कोकणातील चारही जिल्ह्यांत भात पिकावर कमी-अधिक प्रमाणात बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. वास्तविक पाहता खरीप हंगामात भात पिकावर कोकणात बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव सहसा आढळून येत नाही. परंतु या वर्षी बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. याची कारणे आणि पेरलेल्या बियाण्यांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यातून असे दिसून आले, की रोगट बियाण्यातून रोगकारक बुरशीचा प्राथमिक प्रसार झाला. रोगास बळी पडणाऱ्या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड झाली, त्याचबरोबरीने शेतकऱ्यांनी नत्र खताचा अतिरिक्त वापर केला होता. या रोगाच्या नियंत्रणासाठी तातडीने तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात. 1) रोगट बियाण्यातून रोगकारक बुरशीचा प्राथमिक प्रसार :
ज्या भागात हा रोग दिसून आला त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरलेल्या व रोगास बळी पडलेल्या भात बियाण्याची तपासणी करता त्यात करपा रोगास कारणीभूत बीजे असल्याचे दिसून आले. ही बीजे जिवंत आणि रोगकारकक्षम स्वरूपात असल्याचे दिसून आले. विविध ठिकाणांहून गोळा केलेल्या बीज नमुन्यातून असा प्रकार पाहायला मिळाला.या भागातून बुरशीजन्य करपा रोगाची प्राथमिक लागण ही रोगट बियाण्यांमार्फत झाली होती.
2) रोगास बळी पडणाऱ्या जातींची मोठ्या क्षेत्रावर लागवड
रोगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या भागाची पाहणी करता असेही आढळून आले, की शेतकऱ्यांनी सुवर्णा, गुजरात-4, गुजरात-11, गुजरात-17, रूपाली, कोमल इत्यादी रोगास बळी पडणाऱ्या जातींची लागवड मोठ्या क्षेत्रावर केली आहे. या जातींची कृषी विद्यापीठाने लागवडीसाठी शिफारस केलेली नाही. या भागातूनच रोगाचा प्राथमिक उद्रेक होऊन रोगप्रसार झपाट्याने झाला. ही लागवड मोठ्या क्षेत्रावर असल्याने या क्षेत्रावर रोगाची लागण पाहावयास मिळाली. प्रत्यक्ष पाहणीत असे आढळून आले, की कोकणातील चारही जिल्ह्यांत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या सुधारित आणि संकरित वाणांवर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला नाही.
3) रोगप्रसारास अनुकूल हवामान
या वर्षी ऑगस्ट महिन्यात असणारे हवामान कधी ऊन तर कधी पाऊस, सलग नसणारा पाऊस, त्यामुळे हवेत असणारी 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अशी आर्द्रता; पावसात असणारा वारा, तापमान (19 ते 28 अंश से.) हे सर्व घटक रोगाच्या बुरशीच्या वाढीस आणि प्रसारास अत्यंत उपयुक्त व पोषक आहे. सध्या असे वातावरण असल्याने रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः डोंगरपायथ्याजवळील भागातून भात पिकावर दिसून आला. हा प्रादुर्भाव रोगास बळी पडणाऱ्या जाती मोठ्या क्षेत्रावर असल्याने वेगाने पसरला.
4) नत्र खतांचा अवाजवी वापर :
ज्या भागात बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता तेथील शेतांमध्ये नत्र खतांचा भरपूर वापर झालेला आहे. शिफारशीनुसार स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचा वापर करण्यात आलेला नाही. अन्नद्रव्यांच्या असंतुलनामुळे पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होऊन त्याऐवजी पीक रोगास बळी पडले. नत्र खतांचा अतिरेकी वापर हा भात पिकामध्ये बुरशीजन्य करपा रोगाच्या वाढीस अत्यंत अनुकूल व पोषक असल्याने रोगाची निर्मिती झपाट्याने झाली.

रोग व्यवस्थापनासाठी उपाययोजना


जेथे या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे, त्या भागातील शेतकऱ्यांनी यापुढेही सतर्क राहण्याची गरज आहे. कारण भात पिकावर यापुढे पीकवाढीच्या अवस्थेत "पेरावरील करपा', तर हळव्या भात जातींवर लोंबी बाहेर पडण्याच्या अवस्थेत "मानमोडी' या प्रकारची "करपा' रोगाची लागण होण्याची शक्‍यता आहे. त्याकरिता आता नत्र खते शेतात देताना ती अधिक प्रमाणात न देता कमी प्रमाणात आणि अधिक विभागून देणे गरजेचे आहे, तसेच रोगाची लक्षणे शेतात दिसताच बुरशीनाशकाच्या फवारण्या घेणे आवश्‍यक आहे.

बुरशीनाशकाची फवारणी


25 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड किंवा 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा सहा ग्रॅम ट्रायसायक्‍लोझोल किंवा 25 ग्रॅम मॅन्कोझेब यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी. बुरशीनाशकाच्या द्रावणात 20 मि.लि. चिकट द्राव (स्टिकर) वापरावा. रोगाच्या तीव्रतेनुसार दोन ते तीन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.
संपर्क : डॉ. जोशी : 9420639320 
वनस्पती रोगशास्त्र विभाग 
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

3.11267605634
pravin v bhasme Aug 17, 2016 11:23 AM

mi bhat lavla aahe. tyavr burshi navacha rog aala aahe.ya aadi fwarani keli.. pn tyachi wad thabli aahe

प्रविण खोब्रागडे Oct 01, 2015 09:37 AM

मी भात लावला अाहे व त्यावर लाल अाणि पाढरा रोग अाहे .तर मला त्यालाल औषधी(किटकनाशक) सागावे हि विॆंनती.
प्रविण खोब्रागडे
रा.करंजी
ता.गोंडपिपरी
जि.चंद्रपूर
मो.नं. 70*****24

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:22:43.365613 GMT+0530

T24 2019/10/14 06:22:43.371625 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:22:43.020462 GMT+0530

T612019/10/14 06:22:43.040140 GMT+0530

T622019/10/14 06:22:43.076548 GMT+0530

T632019/10/14 06:22:43.077380 GMT+0530