Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/24 17:05:47.893766 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/24 17:05:47.899854 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/24 17:05:47.940699 GMT+0530

मका लागवड

मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची जमीन आवश्‍यक असते. नदीकाठची गाळाची जमीन असल्यास अधिक चांगले. योग्य मशागत करून प्रतिहेक्‍टरी 20 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे.

प्रस्तावना

मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची जमीन आवश्‍यक असते. नदीकाठची गाळाची जमीन असल्यास अधिक चांगले. योग्य मशागत करून प्रतिहेक्‍टरी 20 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे.
1) जून ते जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागवड करावी. पेरणी टोकण पद्धतीने करावी. उशिरा व मध्यम कालावधीचे वाण असल्यास 75 x 20 ते 25 सें.मी., तर कमी कालावधीचे वाण असल्यास 60 x 20 सें.मी. अंतरावर पेरणी करावी. हेक्‍टरी 15 ते 20 किलो बियाणे वापरावे.
2) प्रतिकिलो बियाण्यास दोन ते अडीच ग्रॅम थायरम पेरणीपूर्वी लावावे, तसेच पेरणीपूर्वी 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर प्रति 10 किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. लागवडीसाठी शिफारशीत वाणांची निवड करावी.
3) खरीप हंगामात मक्‍यामध्ये उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, भुईमूग, तूर या आंतरपिकांची लागवड करावी.
4) पेरणीच्या वेळी प्रतिहेक्‍टरी 40 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे; तसेच पेरणीनंतर 30 दिवसांनी 40 किलो नत्र, तर पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी 40 किलो नत्र द्यावे. माती परीक्षणानुसार जमिनीत झिंकची कमतरता असल्यास हेक्‍टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट द्यावे.
5) मक्‍यामध्ये वाढीची अवस्था (20 ते 40 दिवस), फुलोरा अवस्था (40 ते 60 दिवस) आणि दाणे भरण्याची अवस्था (70 ते 80 दिवस) या संवेदनशील अवस्था असतात. यापैकी कोणत्याही अवस्थेत पाण्याची गरज भासल्यास पाणी द्यावे.

संपर्क - 0231 - 2601115

मका सुधार प्रकल्प, कसबा बावडा, कोल्हापूर -------------------------------------------------------------------------------------------------

 

स्त्रोत: अग्रोवन

मका लागवड

 

3.03370786517
हनुमंत चौधरी Sep 02, 2016 05:27 AM

मका प्रकल्प उभारण्यात आपण सहकार्य करावे हि नम्र विनंती आहे

वाल्मिक परबत वाघ Jul 31, 2016 08:55 PM

विवीध पिकांतील तणनाशकांचा वापर व त्यां
चे प्रमाण तसेच दुष्परीणाम या विषयी माहीती द्यावी

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/24 17:05:48.369475 GMT+0530

T24 2019/06/24 17:05:48.376190 GMT+0530
Back to top

T12019/06/24 17:05:47.516839 GMT+0530

T612019/06/24 17:05:47.806346 GMT+0530

T622019/06/24 17:05:47.870191 GMT+0530

T632019/06/24 17:05:47.871207 GMT+0530