অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मक्याचे उपयोग

प्रस्तावना

तृणधान्यात सगळ्यात जास्त उत्पादन देणारे आणि जास्त उपयुक्त अस मक्याचं पीक आहे. मका हे आपल्या आहारात आनाधान्य जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य आणि औषधी क्षेत्रात बहुउपयोगी अशा तीन प्रकारे उपयोगी पडते. याच्यात व्यापारीदृष्ट्या महत्वाची रसायने आहे. ७० ते ७५% स्टार्च, ८ ते १० %प्रथिने, ४ ते ५%, स्निग्ध पदार्थ (तेल) असतात. मक्याच्या दान्यामध्ये १२% हा भाग अंकुराचा असतो. या अंकुरापासून तेल मिळते. विविध प्रकारच्या प्रक्रिया करून असे अनेक प्रक्रिया पदार्थ आणि औषधी उत्पादने करता येतात.

मक्यावर प्रामुख्याने दोन प्रकारे प्रक्रिया

मक्यावर प्रामुख्याने दोन प्रकारे प्रक्रिया (मिलिंग) करता येते. कोरडी प्रक्रिया आणि ओली प्रक्रिया. कोरड्या प्रकारात अंकुरविरहित प्रक्रिया करून मक्याची कणी,रवा,पीठ, पोहे, तेल आणि पशुखाद्य तयार करता येते. जास्त दिवस ठेवल्यास खवटपणा येतो.

  1. मक्यावर ओली प्रक्रिया करून स्टार्च, साखर, तेल काढण्यासाठी सल्फर डाय ऑक्साएड मिश्रित पाण्यात मका ३०-३५ तास भिजत ठेवल्याने दाने मऊ बनतात. आणि त्यापासून स्टार्च अंकुर आणि पेंड सहजरीत्या वेगळी करता येतात. या ओल्या प्रक्रिया पद्धतीने मिळालेला स्टार्च साखर-तेल-पेंड यांचा वापर कापड-कागद-औषधे-बेकरी या व्यवसायात केला जातो.
  2. मक्याचे पीठ इतर ज्वारी-बाजरीच्या पिठात ३० ते ५०% मिसळल्यास उत्तम प्रतीचे चपाती-भाकरी मिळते. स्वतंत्रपणे मक्याची भाकरी करता येते.
  3. बेकरी व्यवसायात पाव बनवण्यासाठी १०% मक्याचे पीठ मिसळल्यास पावाची प्रत कायम राहून किंमत कमी करता येते.
  4. मक्याच्या रव्यापासून उपमा, केशरी हलवा,इडलीसारखे खाद्यपदार्थ तयार करता येतात.
  5. बेसन पिठामध्ये ५०% मक्याचे पीठ मिसळून उत्तम प्रकारची तळलेली शेव, वडा, भजी, पकोडे, लाडू-पापडी, वेफर्स असे पदार्थ तयार करता येतात.
  6. तेल, चीज, स्वाद, मीठ-मसाला, उत्तम चवीचे कोर्नकर्ल तयार करता येतात.
  7. मका पिठापासून सूप-सॉस-कस्टरड पावडर तयार करता येते.
  8. साध्या लाह्या तसेच मसालेदार लाह्या मक्यापासून बनवता येतात.
  9. शक्ती-१ या जास्त प्रथिनयुक्त जातीपासून लहान मुलांसाठी प्रथिनयुक्त आहार चांगल्या प्रकारे करता येतो.
  10. सोयाबीन-भुईमुग आणि मका पीठ अगर कनिपासून मुलांना पौष्टीक बाल आहार तयार करता येतो.
  11. साधा मका अगर माधुकतेची कोवळे दाणे असणारी कणंस भाजून अगर उकडून खाण्यासाठी मोठा वापर केला जातो. बेबीकोर्नचे सूप, सलाड, वडा, भजी,भाजी इ.साठी उपयोग होतो. अंकुर काढून मका-तांदूळ तयार करतात. मानवी आहारात या पद्धतीचा वापर केला जातो.

औद्योगिक उपयोग

  1. कागद-कापडासाठी मक्यापासून बनवलेला स्टार्च हर उपयुक्त ठरतो. मॉडीफाइड स्टार्चचा उपयोग प्लास्टिक, अक्रीलक, अडेसिव्ह, कास्टिंग, मोल्ड, असिड, इ. साठी केला जातो.
  2. मकासाखर औषधांमध्ये तसेच बेकरी व्यवसायामध्ये वापरली जातात.
  3. डेकस्त्रीन स्टार्चचा उपयोग ड्रिलिंग आणि फौड्री व्यवसायामध्ये केला जातो.
  4. जाम-जेलीमध्ये मक्यावर ओली प्रक्रिया करून हायप्रेक्टोस ग्लुकोज हि द्रवरूप साखर वापरतात.
  5. मका जेल आइसक्रीम आणि बेकरी व्यवसायात वापरतात.
  6. मक्याच्या अंकुरापासून तेल काढतात. याच्यात क्लोरेस्टेरॉलचे प्रमाण खूप कमी असल्याने हृदयरोगावरती उपयुक्त आहे.
  7. मद्यार्क कणीपासून अल्कोहोल, बिअर, विस्की, इ. तयार करतात. त्याचप्रमाणे इथेनॉल तयार करता येते. (१०० किलो मक्यापासून ४० लिटर इथेनॉल मिळते.)
  8. मक्याच्या अंकुरातून तेल काढल्यानंतर राहिलेल्या पेंडीपासून जनावरांचे खाद्य तयार केलं जात. तसाच कोरडया प्रक्रियेतून निघालेला कोंडा पशुखाद्यात वापरला जातो.
  9. पिवळ्या मक्यात अ जीवनसत्व आणि झातोकिळ हे रंगद्रव्य असल्याने कोंबडीखाद्यासाठी जास्त उपयुक्त आहे.
  10. मक्याची हिरवी वैरण प्रथिनयुक्त आणि सकस तसच हैड्रोसायनिक आम्लविरहित असल्यानं जनावरं आवडीनं खातात. दुभत्या जनावरांसाठी जास्त उपयुक्त. ओल्या मक्यापासून उत्तम प्रतीचा मुरधास करून उन्हाळ्यात त्याचा वापर करता येतो.
  11. मक्याच्या वाळलेल्या कडब्यात ४% प्रथिने (ज्वारीपेक्षा जास्त) असून पचनियता चांगली आहे. म्हणून मक्याच्या वाळलेल्या कडब्याची कुट्टी जनावरांना खाऊ घालावी.

अशा प्रकारे मका हे तृणधान्य बहुउपयोगी असून सर्वात जास्त उत्पादन देणारे पीक आहे. कमी मुदतीत येत असल्यानं बहुविध पीकपद्धतीत फेरपलटीचे पीक म्हणून पेरता येतं. आणि त्याचा उपयोग विविध उत्पादने करण्यासाठी केला जातो.

स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव

अंतिम सुधारित : 8/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate