Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:55:46.668237 GMT+0530
मुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / तृणधान्य / रुंद वरंबा सरी पद्धतीने करा हरभरा लागवड
शेअर करा

T3 2019/10/18 14:55:46.673887 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:55:46.703496 GMT+0530

रुंद वरंबा सरी पद्धतीने करा हरभरा लागवड

वेळी एक किंवा दोन सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास उशिरात उशिरा 10 डिसेंबरपर्यंत हरभरा पिकांची पेरणी करता येते.

या वर्षी मराठवाडा विभागात जेमतेम 50-55% पाऊस झाला असून, रब्बी पिकांची पेरणी कमी झाली आहे. अशा वेळी एक किंवा दोन सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास उशिरात उशिरा 10 डिसेंबरपर्यंत हरभरा पिकांची पेरणी करता येते. 
वास्तविक हरभरा पिकाची वेळेवर पेरणी 20 नोव्हेंबरपर्यंत करण्याची शिफारस आहे; परंतु या वर्षीची परिस्थिती, गेल्या काही दिवसांत झालेला पाऊस, इतर पिकांचा पर्याय नसेल व केवळ 1-2 सिंचनाची उपलब्धता असेल, तर उशिरात उशिरा 10 डिसेंबरपर्यंत (बागायती) हरभरा पिकाची पेरणी करता येते; परंतु यामध्ये 20 ते 50 टक्के घट येऊ शकते.

उशिरा पेरणीसाठी विजय, दिग्विजय हे वाण वापरावेत. उशिरा पेरणीमुळे 7 ते 23% तसेच 50% पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. मात्र, अन्य पिकाचा पर्याय कमी झाल्याने सद्यस्थितीत हरभरा पीक घेता येईल.

रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी

रब्बी हंगामामध्ये हरभरा हे पिकही रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये पेरणी करता येते; तसेच उन्हाळी भुईमूग हे पिकही रुंद वरंबा सरी पद्धतीने घेता येतो. 
हरभरा पिकांमध्ये रुंद वरंबा तयार करून, त्यावर हरभरा पिकाच्या 3 किंवा 4 ओळी 30 सेंमी अंतरावर पेरणी करावी. यामध्ये 4 ओळी घ्यावयाच्या असतील, तर पाच फुटावर सऱ्या पाडाव्यात. 4 फुटांचा रुंद वरंबा (120 सेंमी) मिळतो. त्यावर 30 सेंमी दोन ओळींतील अंतर ठेवावे. 
हरभरा पिकाच्या चार ओळी घ्यावयाच्या तेव्हा 4 फुटांवर (120 सेंमी) सऱ्या पाडाव्यात. 3 फुटांचा (90 सेंमी) रुंद वरंबा मिळतो. त्यावर 30 सेंमी अंतरावर हरभरा पिकाच्या तीन ओळी घ्याव्यात.

 • पेरणीसाठी विजय या वाणाचे बियाणे 60 ते 65 किलो/ हेक्‍टरी तर दिग्विजय या वाणाचे बियाणे 100 किलो/ हेक्‍टरी वापरावे.
 • पेरणी करताना बीजप्रक्रिया - 3 ग्रॅम थायरम किंवा 1.5 ग्रॅम कार्बेन्डाझीम + 1.5 ग्रॅम थायरम या प्रमाणात प्रति किलो बियाण्यास लावावे. त्याबरोबरच 25 ग्रॅम पीएसबीची व रायझोबीयम जिवाणुसंवर्धकांची प्रतिकिलो बियाणे व टायकोडर्मा विरीडी या मित्र बुरशी संवर्धनाची चार ग्रॅम प्रतिकिलो बियाणे बीज प्रक्रिया करावी.
 • हरभऱ्याची पेरणी 30 ते 45 सेंमी एवढे अंतर ठेवून करावी.
 • तण नियंत्रणासाठी - पेंडीमिथॅलीन हे तणनाशक (30 ईसी 0.75 कि. क्रियाशील घटक) 2.5 लिटर प्रति हेक्‍टरी या प्रमाणात पेरणीनंतर; परंतु पीक उगवणीपूर्वी फवारावे. फवारणी करताना जमिनीत ओल असावी.
 • हरभऱ्यासाठी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी जमिनीत पेरून द्यावे.
 • बागायती हरभऱ्याची पेरणी केल्यानंतर पाणी देण्यासाठी सारा यंत्राच्या साह्याने सारे पाडावेत. तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. हलकी कोळपणी करून जमिनीच्या भेगा बुजवाव्यात. पिकाला मातीची भर लावावी. फुले लागताना व घाटे भरताना संरक्षित पाणी द्यावे.
 • रोग व कीड नियंत्रण

  • मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 30 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लि. पाण्यात मिसळून ड्रेचिंग करावे.
  • हरभरा पिकावर घाटे आळीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्विनॉलफॉस (25 टक्के) 20 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • तसेच एकरी दोन या प्रमाणात घाटे अळीचे कामगंध सापळे व 10 इंग्रजी टी आकाराचे पक्षी थांबे लावावेत.
  • डॉ. आनंद गोरे, 02452 - 229000
  • (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

  स्त्रोत: अग्रोवन

  3.05797101449
  आपल्या सूचना पोस्ट करा

  (वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

  Enter the word
  नेवीगेशन

  T5 2019/10/18 14:55:47.267237 GMT+0530

  T24 2019/10/18 14:55:47.274862 GMT+0530
  Back to top

  T12019/10/18 14:55:46.600416 GMT+0530

  T612019/10/18 14:55:46.618488 GMT+0530

  T622019/10/18 14:55:46.657602 GMT+0530

  T632019/10/18 14:55:46.658465 GMT+0530