Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/27 01:17:2.703825 GMT+0530
मुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / तृणधान्य / साडेतीन मिनिटात शिजणारा गहू दलिया !
शेअर करा

T3 2019/06/27 01:17:2.709050 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/27 01:17:2.738083 GMT+0530

साडेतीन मिनिटात शिजणारा गहू दलिया !

त्वरित शिजणाऱ्या दलियाच्या पिठाची निर्मिती लुधियाना येथील केंद्रीय काढणीपश्‍चात तंत्रज्ञान संस्थेने (सिफेट) येथील संशोधकांनी केली आहे.

लुधियाना येथील सिफेट संस्थेचे संशोधन

शहरी जीवनशैली वेगवान झाल्याने तयार किंवा स्वयंपाकासाठी त्वरित तयार होणाऱ्या पदार्थांच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे त्वरित शिजणाऱ्या दलियाच्या पिठाची निर्मिती लुधियाना येथील केंद्रीय काढणीपश्‍चात तंत्रज्ञान संस्थेने (सिफेट) येथील संशोधकांनी केली आहे. त्यासाठी मोड आलेल्या गव्हाचा वापर केला आहे. त्यामुळे केवळ साडेतीन मिनिटांमध्ये शिजणारा अत्यंत पोषक असा गहू दलिया तयार करण्यात यश आले आहे. 

गहू (Triticum aestivum) हे उत्तर- मध्य भारतातील लोकांचे मुख्य खाद्य आहे. तसेच जगातील मोठ्या लोकांचे खाद्य असलेल्या या पिकामध्ये तंतुमय पदार्थ, पोषक अन्नद्रव्ये आणि आवश्‍यक अमिनो आम्लांनी परिपूर्ण आहे. या गव्हाला अंकुर आल्यानंतर या पोषक घटकांमध्ये वाढ होते. तसेच मोड आल्यानंतर अनेक घटकांची उपलब्धता, प्रथिनांची पाचकता वाढण्यास व अपोषक घटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सिफेट या संशोधकांनी दलिया तयार करण्यासाठी प्रमाणित आकाराचे मोड आलेल्या गव्हाचा वापर केला आहे.


दलियाची प्रक्रिया आणि त्याची वैशिष्ट्ये

  • या पद्धतीमध्ये गव्हाला प्रमाणित आकाराचे कोंब आणले जातात. त्यानंतर हे कोंब आलेले गहू वाळवून त्याचे पीठ तयार केले जाते. या पिठातील कणांचा आकार 1.41 ते 2 मिलिमीटर असा ठेवला जातो. या दलियाला शिजण्यासाठी फक्त 3.5 मिनिटे लागतात.
  • या दलियामध्ये 10.32 टक्के प्रथिने,1.33 टक्के मेद, 1.48 टक्के तंतुमय पदार्थ, 3.33 टक्के कॅलरी, 359 किलोकॅलरी ऊर्जा, लोह 1.18 मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅम आणि कॅल्शिअम 44.67 मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅम असतात.
  • साध्या दलियासारखी याची चव असून, सामान्य तापमानाला 90 दिवसांपर्यंत चांगली राहू शकते.

 

माहिती संदर्भ : अग्रोवन

2.97701149425
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/27 01:17:2.946079 GMT+0530

T24 2019/06/27 01:17:2.952175 GMT+0530
Back to top

T12019/06/27 01:17:2.641005 GMT+0530

T612019/06/27 01:17:2.659990 GMT+0530

T622019/06/27 01:17:2.693981 GMT+0530

T632019/06/27 01:17:2.694784 GMT+0530