Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

Government of India

MeitY LogoVikaspedia
mr
mr

  • Ratings (3.07)

हरभरा लागवडीचे नियोजन

उघडा

Contributor  : अॅग्रोवन07/10/2020

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

1. हरभऱ्यासाठी मध्यम व भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. बागायत हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान पूर्ण करावी. पेरणी वाफशावर करावी.

2. जातीनुसार बियाण्याचे प्रमाण वापरावे. विकास आणि फुले जी- 12 या वाणासाठी हेक्‍टरी 70 किलो, विश्‍वास आणि विजयासाठी 85 किलो तसेच दिग्विजय, विशाल व विराट या वाणासाठी हेक्‍टरी 100 किलो बियाणे वापरावे.

3) पेरणीसाठी प्रमाणित अगर खात्रीचे बियाणे वापरावे. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केलेली नसल्यास प्रतिकिलो बियाण्यास 2 ते 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा 2 ते 2.5 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धक व 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड पाण्यातून बीजप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरावे.

4) पेरणी 30 x 10 सें.मी. अंतरावर करून झाडांची संख्या हेक्‍टरी 3,33,333 ठेवावी.

5) घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात पक्षी थांबे करण्यासाठी हेक्‍टरी वापरावयाच्या हरभरा बियाण्यात 200 ग्रॅम ज्वारी मिसळून पेरणी करावी.

6) बागायती पिकाला 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 32 किलो पालाश (56 किलो युरिया, 312 किलो सुपर फॉस्फेट व 50 किलो मुरेट ऑफ पोटॅश) किंवा 125 किलो डाय अमोनिअम फॉस्फेट प्रतिहेक्‍टरी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावी. दोन चाडी पाभरीने पेरणी करावी.

7) हरभरा पिकास साधारणपणे 12 सें.मी. पाण्याची गरज असते. पेरणी वापशावर करावी. जमिनीतील ओल पाहून पहिले पाणी 30 ते 35 दिवसांनी फांद्या फुटताना द्यावे आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी घाटे भरताना द्यावे. प्रत्येक वेळी पाणी योग्य प्रमाणात द्यावे. जास्त पाणी दिले गेल्यास पीक उभळण्याचा धोका असतो. 8) हरभरा-करडई आंतरपीक (6-3) पद्धतीचा वापर करा.

9) आंतरमशागत- पेरणीनंतर 21 दिवसांनी कोळपणी आणि एक खुरपणी करावी. आवश्‍यकता भासल्यास दुसरी खुरपणी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी करावी.

माहिती संदर्भ - अॅग्रोवन

Related Articles
शेती
हरभरा लागवडी बाबत माहिती

हरभऱ्यासाठी मध्यम व भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.

शेती
हरभरा लागवडी विषयी माहिती

हरभरा पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असे पीक आहे. हरभरा पिकाला साधारणपणे २५ सेमी पाणी लागते.

शेती
रब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन

रब्बी ज्वारी पेरणीसाठी सुधारित व शिफारस केलेल्या जातींची निवड करावी.

शेती
प्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची

भोसे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील नरहरी निवृत्ती कुंभार यांनी उपलब्ध पाच एकर शेतीचे योग्य नियोजन करून ऊस आणि हरभरा पिकाचे चांगले उत्पादन मिळविले आहे.

शेती
कलिंगडाची शेती केली यशस्वी

सौंदळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील शेतकरी जाकीर मुल्ला हे स्वतःची शेती करतानाच गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक शेती भाड्याने घेऊन त्यात कलिंगडाची लागवड करत आहेत.

शेती
पालेभाज्या लागवडीचे नियोजन

पालक, कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांची नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत लागवड करावी. कमी कालावधीत या पिकांपासून चांगले उत्पन्न मिळते. र

A

Akshay patange

1/20/2020, 4:50:28 AM

Harbhra jaltth ahe

कोरडे

12/22/2019, 7:45:22 AM

45 दिवस चा हरबारा झाला स्पे मधुन खते कोणते द्यावे

वासुदेव मिर्जापूरे

10/10/2019, 1:27:54 AM

हरभरा पिकात आंतरपीक संभार घेऊ शकतो का ६ तास हरभरा १ तास संभार घेतला तर चालेल का आणि हरभरा पट्टा पद्धतीने पेरणी करावी का .

G

Gajanan Kalyankar

9/13/2019, 7:19:26 AM

केळी मध्ये आंतरपीक हरभरा घेता येईल का

मारोती देवरे

10/3/2017, 2:30:51 AM

हरबरा पिकासाठी पाणी तुषार सिंचणाने देणे कधीही चांगले आहे. मोकाट पाणी सोडू नये, त्यामुळे मुळकुजव्या येऊ शकतो.

हरभरा लागवडीचे नियोजन

Contributor : अॅग्रोवन07/10/2020

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

Related Articles
शेती
हरभरा लागवडी बाबत माहिती

हरभऱ्यासाठी मध्यम व भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.

शेती
हरभरा लागवडी विषयी माहिती

हरभरा पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असे पीक आहे. हरभरा पिकाला साधारणपणे २५ सेमी पाणी लागते.

शेती
रब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन

रब्बी ज्वारी पेरणीसाठी सुधारित व शिफारस केलेल्या जातींची निवड करावी.

शेती
प्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची

भोसे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील नरहरी निवृत्ती कुंभार यांनी उपलब्ध पाच एकर शेतीचे योग्य नियोजन करून ऊस आणि हरभरा पिकाचे चांगले उत्पादन मिळविले आहे.

शेती
कलिंगडाची शेती केली यशस्वी

सौंदळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील शेतकरी जाकीर मुल्ला हे स्वतःची शेती करतानाच गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक शेती भाड्याने घेऊन त्यात कलिंगडाची लागवड करत आहेत.

शेती
पालेभाज्या लागवडीचे नियोजन

पालक, कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांची नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत लागवड करावी. कमी कालावधीत या पिकांपासून चांगले उत्पन्न मिळते. र

Lets Connect
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi