অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुधी भोपळा आणि काकडी लागवड

दुधी भोपळा आणि काकडी लागवड

काकडी लागवड


  • काकडी लागवड जून-जुलै आणि जानेवारी- फेब्रुवारी महिन्यांत करावी.
  • जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे.
  • लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे, अर्धे नत्र (50 किलो) लागवडीनंतर दोन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावे.
  • लागवडीसाठी हिमांगी, फुले शुभांगी या जातींची निवड करावी.
  • एक हेक्‍टर लागवडीसाठी दीड किलो बियाणे लागते.
  • लागवडीपूर्वी शिफारशीत बुरशीनाशकाची लागवड 1 मीटर x 0.5 मीटर अंतराने करावी.
  • या पिकावर रस शोषणारी कीड, फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो. तसेच केवडा व भुरी रोगांचा प्रादुर्भाव होतो. हे लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने कीड, रोगनियंत्रण करावे.

दुधी भोपळा लागवड


  • दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
  • जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे. लागवड जून-जुलै आणि जानेवारी- फेब्रुवारी महिन्यांत करावी.
  • मंडप पद्धतीने 3 मीटर x 1 मीटर अंतराने लागवड करावी.
  • पारंपरिक पद्धतीने लागवड करायची झाल्यास 5 मीटर x 1 मीटर अंतराने लागवड करावी. लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
  • लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र द्यावे.
  • प्रति हेक्‍टरी 2.5 किलो बियाणे लागते. लागवडीसाठी सम्राट ही जात निवडावी.
  • या पिकावर केवडा, काळा करपा, पानावरील ठिपके हे रोग दिसून येतात.
  • तसेच नागअळी, फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
  • हे लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने कीड, रोगनियंत्रण करावे.


संपर्क - 02426-243242 
भाजीपाला सुधार योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate