অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ब्रोकोली लागवड

ब्रोकोली लागवड

ब्रोकोली पिकास कोरडे व थंड हवामान मानवते. रेताड, मध्यम, काळी, निचऱ्याची जमीन या पिकास चांगली असते. अति हलकी, क्षारयुक्त, चोपण, पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये.

शेवटच्या पाळीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत पसरून जमिनीच्या उतारानुसार लागवडीसाठी सपाट वाफे तयार करावेत. लागवडीसाठी गणेश ब्रोकोली या जातीची निवड करावी. या जातीचा गड्डा आकर्षक, हिरव्या रंगाचा असून सरासरी वजन 180 ते 200 ग्रॅम असते. लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. लागवड करताना रोपांची मुळे ऍझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धकाच्या द्रावणात बुडवून लावावीत.

रोपांची लागवड सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यात करताना दोन ओळींमध्ये 60 सें.मी. आणि दोन रोपांत 45 सें.मी. अंतर ठेवावे. लागवडीनंतर लागलीच हलके पाणी द्यावे. लागवडीनंतर 15 दिवसांनी एक खुरपणी करून झाडांना मातीचा आधार द्यावा.

ब्रोकोली पिकाला प्रति हेक्‍टरी 65 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 30 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. लागवडीनंतर 30 दिवसांनी 65 किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे. पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. गणेश ब्रोकोली या जातीचा कालावधी 70 दिवसांचा आहे. या जातीचे प्रति हेक्‍टरी 65 ते 70 क्विंटल उत्पादन मिळते.


संपर्क - 020 - 25693750 
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate