অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बटाटा

प्रस्तावना

बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थाशिवाय अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो.

हवामान

बटाटा हे थंड हवामानातील पिक आहे. या पिकास सरासरी १६ ते २१ सेल्सिअस तापमान लागते. पिकाच्या सुरवातीच्या काळात २४ सेल्सिअस पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात २० सेल्सिअस तापमान अनुकूल असते. बटाटे लागवडीच्या वेळी उष्ण हवामान व बटाटे पोसण्याचे वेळी थंड हवामान या पिकास पोषक असते.

जमीन

मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या रीतीने करता येते. जमीन कसदार भुसभुशीत व उत्तम निचऱ्याची असावी. जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असावा.

पूर्वमशागत

जमीन नांगरानी २० ते २५ सेंमी नांगरावी. १ महिनाभर जमिनीस उन्हाची ताप द्यावी. पुन्हा १ आडवी नांगरणी करावी. ढेकळे फोडण्यासाठी व जमीन समपातळीत आणण्यासाठी कुळवाच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी, जमिनीत हेक्टरी ५० गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरावे.

लागवडीचा हंगाम

बटाट्याची लागवड खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात करतात व रब्बी हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात करतात.

वाण

कुफरी लवकर - ही ६५ ते ८० दिवसात तयार होणारी जात असून खरीप व रब्बी हंगामात घेतली जाते. या जातीचे बटाटे पांढरे शुभ्र आकर्षक वव मोठे असतात. या जातीचा बटाटा साठवणुकीत चांगला टिकतो. हेक्टरी उत्पादन २०० ते २५० क्विंटल असते.

कुफरी चंद्रमुखी - ही जात ९० ते १०० दिवसात तयार होते. या जातीचे बटाटे लांबट गोल व फिकट पांढरे असतात. साठवणुकीस ही जात उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन २५० क्विंटल पर्यंत मिळते.

कुफरी सिंदुरी - ही जात १२० ते १३५ दिवसात तयार होते. या जातीचा रंग फिकट तांबडा असून बटाटे मध्यम व गोल आकारचे असतात. ही जात साठवणुकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन ३०० क्विंटल पर्यंत मिळते.

या शिवाय कुफरी बादशाह,कुफरी कुबेर, कुफरी ज्योती, अलंकार, कुफरी चमत्कार या जाती लागवडीस योग्य आहेत

बियाणाचे प्रमाण

बियाणे उत्तम दर्जाचे असावे. हेक्टरी १५ ते २० क्विंटल बियाणे लागवडीस पुरेसे असते. लागवडीपूर्वी बियाणे कॅप्टन ३० ग्रॅम आणि बविस्टोन १० ग्रॅम १० लिटर पाण्यात ५ मिनिटे बुडवून व नंतर लागवडीसाठी वापरावी.

लागवड

सरासरी बेण्याचे वजन जास्तीत जास्त २५ ते ३० ग्रॅम असावे. बेण्याचा आकार म्ध्याम असून बटाट्याचे आकारमानानुसार दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंमी आणि दोन बियांमधील अंतर १५ ते २० सेंमी ठेवावे. ट्रँक्टरच्या सह्हायाने सरी वरंबापद्धतीने लागवड करावी

खते व पाणी व्यवस्थापन

बटाटा पिकास लागवडीपूर्वीहेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर १ महिन्याने ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुले जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पातळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनीला लगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर  व बटाटा पोसण्याच्यावेळेस ६ ते ८ दिवसांच्याअंतराने पाणी द्यावे. पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर पाण्याच्यापाळ्या कमी कराव्यात

आंतरमशागत

बटाट्यच्या आंतरमाशागतीत तण काढणे व खुरपणी या बरोबर भर देणे हे महत्वाचे काम आहे. तीन चार वेळा खुरपणी करून जमीन भुशभूशित  ठेवावी. खताचा दुसरा हप्ता देताना झाडांना मातीचा भर द्यावी.

रोग व कीड

करपा - पानवर काळे ठिपके पडून पाने गळतात. बटाट्यावर खोलगट चट्टे पडतात.

उपाय - डायथेनएम ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मर - मोठी झाडे पिवळी व मलूल दिसतात. बुंध्याजवळ जमिनीलगतच्याभागावर बुरशीची वाढ झालेली दिसते. पिकांची फरपालट आणि नियमित पाण्याच्या पाळ्या देऊन रोग आटोक्यात अंत येतो. जमिनीत नँप्थलीन किंवा फॉरमँलिन(१:५०) मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते.

चारकोल राँट किंवा खोक्या रोग - या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो. जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस पेक्षाअधिक असल्यास ते रोगजतूना पोषक ठरते. या रोगामुळे साठवणीतील बटाटे नसतात. जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस च्या वर चढण्यापूर्वी बटाट्याचीकाढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे.

कीड

देठ कुडतरणारी अळी – राखी रंगाची अळी असून रात्रीचे वेळी खोडाजवळील भाग कुरतडतात. पाने व कोवळे देठ खातात.

उपाय - या किडीच्या बंदोबस्तासाठी क्लोरेड एम ५ % पावडर हेक्टरी ५० किलो जमिनीवर सायंकाळी धुराळावी

मावा व तुडतुडे - या किडीत पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात.

उपाय - लागवडीनंतर १५ दिवसांनी मिथिल डिमेटाँन १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून किंवा फाँस्फोमिडाँन ८५ डब्लू एमसी १० मिलि १० लिटर पाण्यात फावरावे.

बटाट्यावरील पंतग - हि किड बटाट्याचे अतोनात नुकसान करते. या किडीची सुरवात शेतातूनहोते. परंतुनुकसान हे साठवणुकीच्या काळात दिसून येते. या किडीच्या आळया पानात देठात व खोडात शिरून पोखरतात. आळया बटाट्यात शिरून आतील भाग पोखरून खातात.

उपाय - या किडीच्या बंदोब्स्तासाठी कार्बारील ५० डब्लू.पी. १.५ किलो ७५० पाण्यात मिसळून फावरावे.

काढणी व उत्पादन-

सर्व सुधारित तंत्राचा उपयोग करून बटाट्याचे पिक घेतल्यास लवकर तयार होणार्या जातीचे उत्पादन हेक्टरी २०० क्विंटल व उशिरा तयार होणा-या जातीचे उत्पादन हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल पर्यंत होऊ शकते.

 

स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate