Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 01:11:43.788428 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मत्स्य संशोधन संस्था
शेअर करा

T3 2019/05/26 01:11:43.793167 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 01:11:43.819193 GMT+0530

मत्स्य संशोधन संस्था

मासेमारी हा भारतातील पारंपरिक व्यवसाय. या व्यवसायाचेदेखील आता आधुनिकीकरण होत आहे.

 

मासेमारी हा भारतातील पारंपरिक व्यवसाय. या व्यवसायाचेदेखील आता आधुनिकीकरण होत आहे. मत्स्यशेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी कोची येथे केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन संस्था कार्यरत आहे. यानठिकाणी सागरी माशांवर संशोधन, शिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसारावर भर देण्यात आला आहे. या संस्थेने भारतीय किनारपट्‌टीच्या प्रदेशात आढळणाऱ्या 200 माशांच्या जातींची नोंद केली आहे.

नवीन तंत्रज्ञान

संस्थेने मत्स्यबीजोत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे दर्जेदार मत्स्यबीजाची उपलब्धता झाली आहे. त्याबरोबरीने देश-विदेशांत मागणी असलेल्या 15 शोभिवंत माशांच्या जातींचे बीजोत्पादन आणि उत्पादनाचेही तंत्र विकसित केले आहे.

मत्स्य जातींचे संवर्धन

विविध भागांत आढळणाऱ्या मत्स्य जातींचे संवर्धनही संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विविध राज्यांमध्ये मत्स्य उत्पादन वाढीसाठी मच्छीमारांच्या सोबत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मदतीने मच्छीमारांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. 
जगभरातील मत्स्य संशोधन संस्थांच्या सहकार्यातून मत्स्यशेतीमधील नवीन संशोधनाची देवाण-घेवाण करण्यात येत आहे. त्याचा फायदा भारतातील मत्स्य उत्पादकांना होत आहे. संस्थेने संकेतस्थळाच्या माध्यमातून संस्थेत झालेले संशोधन, तसेच विदेशातील संशोधन संस्थांनी केलेले संशोधन उपलब्ध करून दिले आहे. हवामान बदलाचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होत आहे. याच्या अभ्यासासाठी संस्थेने विशेष संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. सुदूर संवेदन तंत्राच्या मदतीने समुद्रामध्ये असलेला मत्स्यसाठा शोधण्यात येत आहे. त्याचा फायदा मच्छीमारांना झाला आहे. माशांच्यामधील जैव विविधतेचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी मत्स्य बॅंक विकसित करण्यात येत आहे.

 

संकेत स्थळ - www.cmfri.org.इन

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

2.92682926829
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 01:11:44.012253 GMT+0530

T24 2019/05/26 01:11:44.018814 GMT+0530
Back to top

T12019/05/26 01:11:43.726317 GMT+0530

T612019/05/26 01:11:43.744791 GMT+0530

T622019/05/26 01:11:43.778113 GMT+0530

T632019/05/26 01:11:43.778899 GMT+0530