Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:45:48.187417 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / गोड्या पाण्यात संवर्धनासाठी माशांच्या जाती
शेअर करा

T3 2019/10/14 23:45:48.192257 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:45:48.218621 GMT+0530

गोड्या पाण्यात संवर्धनासाठी माशांच्या जाती

डोके मोठे व रुंद असते. शरीराचा मध्य भाग चांगलाच रुंद व फुगीर असतो. अंगावरचे खवले मोठे असतात. तलावाच्या वरच्या थरातील अन्न खातो. कार्पच्या इतर जातींबरोबर खाद्याकरिता स्पर्धा करीत नाही. वाढ जलद असते.

 

भारतीय प्रमुख कार्प

1) कटला - डोके मोठे व रुंद असते. शरीराचा मध्य भाग चांगलाच रुंद व फुगीर असतो. अंगावरचे खवले मोठे असतात. तलावाच्या वरच्या थरातील अन्न खातो. कार्पच्या इतर जातींबरोबर खाद्याकरिता स्पर्धा करीत नाही. वाढ जलद असते. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. पावसाळ्याचा पूर्वार्ध हा प्रजननाचा हंगाम आहे.
2) रोहू - या माशाचे शरीर प्रमाणबद्ध वा लांबट असते. अंगावरचे खवले लालसर असतात. हा मासा त्याच्या ओठाच्या ठेवणीवरून ओळखला जातो. हा मासा प्रामुख्याने जलाशयाच्या मधल्या थरात राहतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.
3) मृगळ - या माशाचे शरीर जास्त लांबट असते. तोंड खालच्या बाजूला वळलेले वा रुंद असते. हा मासा तलावाच्या तळाजवळ राहतो. फक्त तळाजवळील अन्न घेत असल्याने कटला, रोहू माशांशी खाद्याच्या बाबतीत स्पर्धा नसते. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.

चायनीज कार्प

1) सायप्रिनस - या माशाचे काळपट, हिरवट, पिवळा, सोनेरी, लालसर असे विविध रंग आढळतात. तोंडाची ठेवण विशिष्ट असते. तळाशी राहणारा हा मासा सर्वभक्षक आहे. तळाशी आढळणारे किडे, शंख वर्गातील लहान प्राणी, कुजणाऱ्या पाणवनस्पती वा गाळ खातो. वयाच्या पहिल्याच वर्षातच प्रजननास योग्य होतो.
2) चंदेरा - पूर्ण शरीरावर बारीक चंदेरी खवले असल्यामुळे या माशाला "चंदेरा' म्हणतात. खालचा जबडा वरच्यापेक्षा किंचित लांब असतो. जलाशयाच्या वरच्या थरात हा मासा राहतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.
3) गवत्या - या माशाचे तोंड निमुळते, अरुंद असते. जलाशयाच्या मधल्या थरात राहतो. याचे खाद्य वनस्पती प्लवंग व मुख्यतः मोठ्या पाणवनस्पती हे आहे. याचा उपयोग तळ्यांमधील पाणवनस्पतींच्या निर्मूलनाकरिता किंवा नियंत्रणाकरिता चांगला होतो. हा मासा वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.
संपर्क - 022- 27452775 
खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल

स्त्रोत: अग्रोवन

3.04672897196
संभाजी बिनगुडे May 06, 2018 06:05 PM

मला मत्स्यपालन करण्यासाठी कटला रोहू व मृगजळ ची मत्स्यबिज किंवा बोटूकली कुठे मिळतील ?

अतिश अनंत भोईर Oct 17, 2017 01:34 PM

मला मत्स्यपालन सुरु करायचं आहे तर तुमच्या विभाग कडून मला प्रशिक्षण मिळेल का ?
कृपया संपर्क करा ८१४९४४४३५६ (अतिश अनंत भोईर) मु. पो. - गुळसुंदे, ता. पनवेल

योगेश मारूती भोंडकर Jun 05, 2017 11:24 AM

मला मत्स्यपालन करण्यासाठी कटला रोहू व मृगजळ ची मत्स्यबिज किंवा बोटूकली कुठे मिळतील .

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:45:48.442892 GMT+0530

T24 2019/10/14 23:45:48.449150 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:45:48.122797 GMT+0530

T612019/10/14 23:45:48.142716 GMT+0530

T622019/10/14 23:45:48.176587 GMT+0530

T632019/10/14 23:45:48.177563 GMT+0530