অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिखल्या खेकडा (मड क्रॅब)

चिखल्या खेकडा (मड क्रॅब)

जोरदार मागणीमुळे निर्यात बाजारांत चिखल्या खेकडा अत्‍यंत लोकप्रिय आहे. व्यावसायिक तत्वावर ह्या खेकड्याची जोपासना करण्याचे प्रमाण आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्ट्यांवर तीव्र गतीने वाढत आहे.

चिखल्या खेकड्याचे प्रकार

स्काइला (Scylla) जातीचा हा खेकडा मुख्यतः किनारपट्टया, नद्यांची मुखे व पश्चजलात (बॅकवॉटर) सापडतो.

मोठी प्रजाती

  • मोठ्या प्रजातीला स्थानिक लोक `हिरवा चिखल्या खेकडा' म्हणतात.
  • तो 22 सें.मी. रुंदीपर्यंत वाढतो.
  • ह्या खेकड्याच्या पायांवर तसेच कवचावर बहुकोनीय नक्षी असल्याने तो सहज ओळखता येतो.

लहान प्रजाती

  • लहान प्रजातीच्या खेकड्यांना `लालनांग्या' म्हणतात.
  • तो 12.7 सें.मी. रुंदीपर्यंत वाढतो व त्याचे वजन 1.2 किलो असते.
  • ह्याच्या अंगावर बहुकोनीय नक्षी नसते व तो जमिनीतील बिळात राहतो.

दोन्ही जातींच्या खेकड्यांना देशी-परदेशी मासळीबाजारांत मोठी मागणी असते.

पूर्ण वाढीचा चिखल्या खेकडा

जोपासनेच्या पद्धती

चिखल्या खेकड्याची शेती करण्याच्या (मड क्रॅब फार्मिंग) दोन पद्धती आहेत.

ग्रो-आउट कल्चर

  • कमी वयाचे खेकडे, 5 ते 6 महिन्यांत, आपणांस इच्छित आकाराइतके वाढवले जातात.
  • मड क्रॅब ग्रो-आउट पद्धत साधारणतः तलावांत राबविली जाते. येथे खारफुटीचे जंगल (मॅन्ग्रूव्ह) असलेच पाहिजे असे नाही.
  • तलाव साधारणतः 0.5 ते 2.0 हेक्टर आकाराचा असतो व तेथे भरतीचे पाणी येण्या-जाण्याची तसेच बांधबंदिस्तीची सोय असते.
  • लहान तलावाला कुंपण घालणे उत्तम. मोठ्या तलावात नैसर्गिक स्थिती जास्त आढळत असल्याने तलावाची कड भक्कम असणे गरजेचे असते.
  • ह्यासाठी 10 ते 100 ग्रॅम वजनाचे जंगली खेकडे पकडून वाढवले जातात.
  • जोपासनेचा (कल्चर) काळ सुमारे 3 ते 9 महिने असतो.
  • प्रति चौरस मीटरमध्ये 1 ते 3 खेकडे वाढवता येतात. त्यांना वरचे अन्न दिले जाते.
  • उपलब्‍ध असलेल्‍या इतर स्‍थानिक पदार्थांबरोबर बहुतेक फेकून दिलेले मासेच आहार म्‍हणून देण्‍यात येतात असतात (त्यांचे प्रमाण एकंदर जैव-वस्तुमानाच्या-बायोमास) सुमारे 5% असते.
  • खेकड्यांच्या वाढीवर व आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच त्यांना दिल्या जाणार्‍या अन्नाचे प्रमाण ठरवण्यासाठी नियमितपणे नमुने घेतले जातात (सँपलिंग).
  • तिसर्‍या महिन्यानंतर खेकडे काही प्रमाणात बाजारात पाठवता येतात (पार्शल हार्वेस्टिंग). ह्याचा आणखी एक फायदा म्हणजे मोठ्या व लहान खेकड्यांमधील मारामार्‍यांचे प्रमाण कमी होते व बाकीचे खेकडे व्यवस्थित वाढतात.

कवच-जोपासना (फॅटनिंग)

काही आठवडे मऊ पाठीच्‍या खेकड्यांची जोपासना करण्‍यात येते, ज्यायोगे त्यांचे कवच (एक्झोस्केलेटन) टणक होते. मऊ खेकड्यांपेक्षा टणक खेकड्यांना तिप्पट वा चौपट देखील किंमत मिळू शकते.

a. तलावांतील कवच-जोपासना (फॅटनिंग)

  • भरतीच्या पाण्याने भरणार्‍या लहान तलावांतही फॅटनिंग करता येते. ह्या ठिकाणी 1 ते 1.5 मीटर खोल पाणी ठेवतात. तलावाचा आकार 0.025 ते 0.2 हेक्टर असतो.
  • ह्याआधी तलावातले पाणी काढून तळ उन्हात कोरडा केला जातो व योग्य प्रमाणात चुनखडी टाकली जाते.
  • तलावाच्या भिंती व बंधारे व्यवस्थित आहेत ना हे पहावे लागते. गटाराची (स्ल्यूस गेट) तोंडे नीट बंद करावी कारण हे खेकडे त्यांतून पळून जाण्यात पटाईत असतात. पाणी आत येण्याच्या जागेवर बांबूच्या चटया लावाव्या.
  • ह्या तलावांना बांबू व जाळीचे कुंपण घालतात. ह्या कुंपणाची वरची बाजू तलावाकडे म्हणजे आत झुकलेली असल्याने खेकडे त्यावर चढून पळून जाऊ शकत नाहीत.
  • स्थानिक कोळी व व्यापार्‍यांकडून घेतलेले मऊ खेकडे शक्यतो सकाळच्या वेळी तलावात सोडले जातात. खेकड्यांच्या आकाराप्रमाणे त्यांची संख्या दर चौरस मीटरमध्ये 0.5 ते 2 इतकी ठेवली जाते.
  • 550 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त वजनाच्या खेकड्यांना बाजारात मोठी मागणी असते म्हणून शक्यतो असेच खेकडे बाळगावे. मात्र अशा प्रत्येक खेकड्याला 1 चौरसमीटर जागा आवश्यक आहे.
  • पाणखेकड्यांची उपलब्धता आणि तलावाच्या ठिकाणानुसार एका तलावात 6 ते 8 वेळा फॅटनिंगची क्रिया करता येते.
  • तलाव मोठा असल्यास त्याचे योग्य आकाराचे छोटे भाग करून प्रत्येक भागात विशिष्ट आकाराचे खेकडे जोपासणे अधिक योग्य आहे. ह्याने त्यांचे संगोपन आणि काढणी सोपी होते.
  • जोपासणीच्या दोन हंगामांत बराच कालावधी असल्यास एका आकाराचे खेकडे एका विभागात ठेवता येतील.
  • नर खेकड्यांकडून होणारे हल्ले कमी करण्यासाठी ह्या विभागांमधून लिंगानुसार वर्गवारी करून खेकडे ठेवणेही फायदेशीर ठरते. तसेच त्यांच्या आपसातील मारामार्‍या कमी होण्यासाठी फरशा, जुने टायर्स किंवा वेताच्या टोपल्या तलावात टाकून ठेवल्या तर त्यांमधून लहान खेकडे आसरा घेऊ शकतात.

खेकडे जोपासणीचा तलाव तलावातील पाण्याचे आगम (इनलेट)
मजबूत बनवण्यासाठी बांबूचा वापर"inlets"

b. खुराडी व पिंजर्‍यांमधून कवच-जोपासना (फॅटनिंग)

  • उथळ नदीमुखे, कालवे व भरतीचे पाणी येण्याजाण्याची चांगली सोय असलेल्या श्रिंप तलावांत सोडलेली तरंगती खुराडी, जाळी व टोपल्यांतूनही फॅटनिंग करता येते.
  • हाय डेन्सिटी पॉलियुरेथिन (एचडीपीई), नेटलॉन किंवा बांबूच्या कामट्यांची जाळी वापरता येतात.
  • हा पिंजरा साधारण 3 मी x 2 मी x 1 मी आकाराचा असावा.
  • अन्न देणे व देखभालीच्या सोयीसाठी हे पिंजरे एका ओळीत ठेवावे.
  • पिंजर्‍यामध्ये दर चौरस मीटरमध्ये 10 तर खुराड्यांमध्ये दर चौरस मीटरमध्ये 5 खेकडे ठेवा. पिंजर्‍यात खेकड्यांची संख्या जास्त असल्याने, त्यांची आपसांतील भांडणे कमी करण्यासाठी, त्यांच्या नांग्यांची टोके काढून टाका.
  • ह्या पद्धतींचा, तलावातील जोपासनेप्रमाणे, अजून व्यावसायिक पातळीवर वापर झालेला नाही.

ह्या दोन पद्धतींमधून फॅटनिंग जास्त फायदेशीर पडते कारण जोपासनेचा अवधि कमी आणि फायदेशीर असतो, जेव्‍हां स्‍टॉकिंग मटेरियल पुरेसे असल्‍याची खात्री असते. भारतामध्‍ये, ग्रो-आउट तितकेसे लोकप्रिय नाही, याचे प्रमुख कारण म्‍हणजे त्‍यासाठी लागणारी खेकड्यांची वीण (क्रॅब-सीड) व व्‍यावसायिक अन्नपुरवठा उपलब्ध नाहीत.

अन्नपुरवठा

खेकड्यांना दररोज फेकून दिलेले मासे, खारे पाणशिंपले अथवा कुक्कुटपालनातला कचरा (उकळून) खायला दिला जातो. खेकड्याच्या वजनाच्या सुमारे 5 ते 8 टक्के वजनाचे अन्न त्याला पुरवतात. मात्र दिवसातून दोनदा खायला देत असल्यास अन्नाचा जास्त भाग संध्याकाळी द्या.

पाण्याचा दर्जा

खाली दिलेल्या मर्यादांनुसार पाण्याचा दर्जा सांभाळणे गरजेचे आहे -

खारटपणा

15-25%

तपमान

26-30° C

प्राणवायु

> 3 ppm

pH

7.8-8.5

काढणी व विक्रीस पाठवणे

  • खेकड्याचा टणकपणा वारंवार तपासा.
  • अगदी सकाळी किंवा संध्याकाळी हार्वेस्टिंग (काढणी) करावे.
  • हे खेकडे स्वच्छ खार्‍या पाण्यात चांगले धुवा म्हणजे त्यांच्या अंगावरची घाण निघून जाईल. त्यांना बांधताना त्यांचे पाय न मोडण्याची काळजी घ्या.
  • ह्या खेकड्यांना दमटपणाची गरज असते तसेच सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा अन्यथा त्यांचे आयुष्य कमी होते.

मड क्रॅब फॅटनिंगमागील अर्थकारण (दरवर्षी 6 काढण्या, 0.1 हेक्टरच्या भरती-चलित तलावामधून)

. वार्षिक स्थायी खर्च

रु.

तलाव (लीजची रक्कम)

10,000

स्ल्यूस गेट

5,000

तलाव बनवणे, कुंपण व इतर संबंधित खर्च

10,000

. चालवण्याचा खर्च (एका हंगामासाठी)

 

1. खेकड्यांची खरेदी (रु. 120/किलो प्रमाणे 400 खेकडे)

36,000

2. खेकड्यांचे अन्न

10,000

3. मजुरी

3,000

एका हंगामासाठी एकूण

49,000

6 हंगामांसाठी एकूण

2,94,000

C. वार्षिक एकूण खर्च

3,19,000

D. उत्पादन उत्पन्न

 

प्रत्येक वेळी खेकड्यांचे उत्पादन

240 kg

हंगामांचे एकूण उत्पन्न (रु.320/किलो प्रमाणे)

4,60,800

E. नक्त फायदा

1,41,800

  • पैशाचे हे गणित सामान्य शेतकरी स्थानिक पातळीवर चालवू शकेल अशा योग्य आकाराच्या तलावासाठी मार्गदर्शनपर दिलेले आहे. लहान तलावांसाठीदेखील हे लागू होऊ शकते.
  • खेकड्यांची संख्या प्रति चौरस मीटरला 0.4 इतकी कमी धरली आहे कारण खेकड्याचे वजन 750 ग्रॅम मानले आहे.
  • अन्न देण्याचा दर पहिल्या आठवड्यासाठी एकूण बायोमासच्या 10% धरला आहे तर उरलेल्या दिवसांसाठी 5%. अन्न (फीड) वाया जाऊ नये तसेच पाणी स्वच्छ राहावे ह्यासाठी फीडिंग ट्रेज् चा वापर करा.
  • चांगले व्यवस्थापन असलेल्या तलावांमध्ये 8 वेळा फॅटनिंगचा हंगाम घेता येतो व जिवंत राहण्याचा दर (सर्वायव्हल रेट) 80 ते 85 टक्के मिळतो. इथे 6 हंगाम व सर्व्हायव्हलचा दर 75% मानला आहे.

स्रोत: केंद्रीय मत्स्योद्योग तंत्रज्ञान संस्था, कोचीन,

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate