कटला

डोके मोठे व रुंद असते. शरीराचा मध्य भाग चांगलाच रुंद व फुगीर असतो.

अंगावरचे खवले मोठे असतात. ओठाच्या ठेवणीवरून इतर कार्प माशांमध्ये हा सहज ओळखला जातो.

तोंड वरच्या बाजूला वळलेले, खालचा ओठ जाड असतो. मिश्या नसतात.

खालच्या ओठाचा काठ मऊ दातेरी नसतो. माशाचे प्रमुख खाद्य प्राणी प्लवंग वा वनस्पती प्लवंग आहे.

तलावाच्या वरच्या थरातील अन्न खातो. कार्पच्या इतर जातींबरोबर खाद्याकरिता स्पर्धा करीत नाही. वाढ जलद असते.

भारतात सर्वत्र आढळतो. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. पावसाळ्याचा पूर्वार्ध हा प्रजननाचा हंगाम आहे.

रोहू

या माशाचे शरीर प्रमाणबद्ध वा लांबट असते. अंगावरचे खवले लालसर असतात.

हा मासाही त्याच्या ओठाच्या ठेवणीवरून ओळखला जातो. खालचा ओठ जाड असून, त्याची किनार मऊ दातेरी असते.

वरच्या जबड्यास दोन लहान मिश्या असतात. तोंड किंचित खालच्या बाजूला वळलेले वा अरुंद असते.

हा मासा प्रामुख्याने जलाशयाच्या मधल्या थरात राहतो. प्राणी प्लवंग व सडणारी वनस्पती, त्यावरील जीवजंतू यावर उपजीविका करतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.

मृगळ

या माशाचे शरीर जास्त लांबट असते. तोंड खालच्या बाजूला वळलेले वा रुंद असते.

ओठ पातळ वा खालच्या जबड्यावर दोन मिश्या असतात. हा मासा तलावाच्या तळाजवळ राहतो.

तळावरील कुजणारे वनस्पतिजन्य अन्न, शेवाळे, प्राणिप्लवंग हे अन्न घेतो.

फक्त तळाजवळील अन्न घेत असल्याने कटला, रोहू माशांशी खाद्याच्या बाबतीत स्पर्धा नसते. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननास योग्य होतो.

संपर्क - 022- 27452775
खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल, जि. रायगड.

स्त्रोत: अग्रोवन