Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:21:33.073908 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मत्स्यपालनाच्या पद्धती
शेअर करा

T3 2019/05/26 00:21:33.078598 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:21:33.104799 GMT+0530

मत्स्यपालनाच्या पद्धती

मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण जमिनीतील निमखाऱ्या पाण्यातही करता येते.

मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण जमिनीतील निमखाऱ्या पाण्यातही करता येते. मत्स्यशेती करण्यापूर्वी आपल्याकडील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञानाचा अंदाज घ्यावा. मत्स्यशेतीच्या विविध पद्धती आहेत. आपल्या क्षमतेनुसार मत्स्यपालनाच्या पद्धतींची निवड करावी.

एकजातीय मत्स्यसंवर्धन (मोनोकल्चर)


1) या प्रकारामध्ये एका वेळेस एकाच जातीच्या माशांचे अथवा कोळंबीचे संवर्धन केले जाते. 
2) या पद्धतीमध्ये तलावाचा आकार 0.2 ते 1 हेक्‍टर एवढा असतो. 
3) या प्रकारामध्ये कोळंबी जास्तीत जास्त 50,000 नग प्रति हेक्‍टर किंवा मासे 5,000 ते 10,000 बोटुकली प्रति हेक्‍टर या प्रमाणात संचयन केले जाते.

एकत्रित मत्स्यसंवर्धन (कंपोझिट फिश कल्चर)


1) या प्रकारामध्ये दोन किंवा जास्त माशांच्या जातींचे एकत्रित संवर्धन केले जाते. या प्रकारात आपल्याकडील तलावातील उपलब्ध जास्तीत जास्त घटकांचा उपयोग कसा होईल, याचा विचार केला जातो. पूर्वी फक्त भारतीय कार्प माशांचे एकत्रित संवर्धन होत होते; परंतु आता चायनीज कार्पचे बीज उपलब्ध असल्याने त्यांचेही एकत्रित संवर्धन केले जाते. 
2) या संवर्धनामध्ये तीनही थरांमधील माशांचे संवर्धन केल्यास तीनही थरांमधील तलावातील उपलब्ध अन्नाचा वापर होतो, शिवाय तलावामध्ये शेवाळ किंवा वनस्पती असतील तर गवत्या मासा त्यांना खातो. 
3) भारतीय कार्प साधारणतः वर्षामध्ये 800 ग्रॅम ते 1,000 ग्रॅम वाढतात, तर चायनीज कार्प 1,500 ते 2,000 ग्रॅमपर्यंत वाढतात. भारतीय व चायनीज कार्पसच्या संकरित जातीही उपलब्ध आहेत.

मिश्र मत्स्यसंवर्धन (पॉलिकल्चर)

1) या प्रकारच्या संवर्धनामध्ये भारतीय व चायनीज कार्पबरोबर गोड्या पाण्यातील कोळंबीचे (पोचा कोळंबी/ झिंगा) संवर्धन केले जाते. (तक्ता क्रमांक दोन पाहावा). 
2) कोळंबी खालच्या थरात राहत असल्याने खाद्य व वावरण्यासाठी जागा यासाठी स्पर्धा होऊ शकते. म्हणून मृगल व कॉमन कार्प या माशांचे संवर्धन करू शकत नाही. 
3) कोळंबी आठ महिन्यांमध्ये 60 ते 100 ग्रॅम वजनाची होते. मासे साधारणतः 500 ते 1500 ग्रॅमचे होतात. 
4) बाजारपेठेतील आवकेनुसार माशांना साधारणतः 40 ते 60 रुपये प्रति किलो, तर कोळंबीला 350 ते 550 रुपये प्रति किलो दर मिळतो. या प्रकारामध्ये साधारणतः तीन ते चार टन प्रति हेक्‍टरी प्रति वर्ष मत्स्योत्पादन मिळू शकते. 
5) या पद्धतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या तलावाचा आकार 0.5 ते 5.0 हेक्‍टर एवढा असतो. तलावामध्ये सोडण्यात येणाऱ्या मत्स्यबीजाची घनता 5,000 ते 10,000 प्रति हेक्‍टर आणि कोळंबी बीजाची घनता (पीएल- 15 ते 20) 20,000 ते 50,000 प्रति हेक्‍टर एवढी असावी. 

संपर्क - श्री. साटम - 9552875067 
मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी.

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

2.87962962963
पंकज माळी Jun 19, 2018 12:38 PM

सर मला मत्स्य पालान व्यवसाय सुरू करायचा आहे. तरी मला या विषयी पुर्ण मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. मो. नं. 77*****30

किरण माळवे Nov 02, 2017 06:12 AM

माझे अर्धा एकर शेततळे आहे तरी कोणते मासे सोडावेत माहिती दया
मो नंबर आहे ८८८८१०८००८

नितिन बाेराडे Oct 28, 2017 07:31 PM

मला मत्सपालन ऊद्याेग चालु करायचा आहे.त
तरी मला शासनाकडुन मिळणारे फायदे व निधी
तसेच आर्थिक मदत मार्गदर्शन करावे ही विनंती.
माे नं.९१७२४४७४७४

हरिश परदेशी Aug 13, 2017 09:36 PM

सर मला मत्स पालन करायचे आहे पारनेर अहमदनगर येथे तर मस्य बीज कूठे मिळेल

सागर काळोखे Aug 04, 2017 11:19 PM

मी २२ वर्षाचा युवक आहे,मला मत्स्यपालन व्यवसाय करायचा आहे,तरी याविषयी मला पुर्ण माहीती व शासकीय अनुदानाविषयी माहीती द्यावी.
संपर्क-९५५२६१७२७७.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:21:33.412069 GMT+0530

T24 2019/05/26 00:21:33.418215 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:21:33.011830 GMT+0530

T612019/05/26 00:21:33.030828 GMT+0530

T622019/05/26 00:21:33.062939 GMT+0530

T632019/05/26 00:21:33.063725 GMT+0530