Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:52:53.931059 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण
शेअर करा

T3 2019/05/26 00:52:53.936161 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:52:53.964164 GMT+0530

समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण

मरिन प्रॉडक्‍ट एक्‍स्पोर्ट डेव्हलपमेंट ऍथॉरिटी (एमपेडा) या संस्थेची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली.

मरिन प्रॉडक्‍ट एक्‍स्पोर्ट डेव्हलपमेंट ऍथॉरिटी (एमपेडा) या संस्थेची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली. एमपेडा भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयांअंतर्गत काम करत असून, मासेमारी आणि संबंधित उत्पादने याबाबत केंद्र आणि राज्याच्या विविध आस्थापनांमध्ये समन्वय राखण्याचे काम करते. केरळ राज्यातील कोची येथे एमपेडाचे मुख्यालय असून, देशातील सागरी उत्पादन उद्योगाला चालना देण्याची व्यापक स्वरूपाची जबाबदारी या संस्थेकडे आहे.

यामध्ये विविध प्रकारच्या मासेमारीचे संकलन करणे, निर्यात वाढवणे, प्रमाणीकरण करणे, प्रक्रिया, मार्केटिंग, विस्तार यासोबतच या सर्वांच्या वाढीसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे, अशी वैविध्यपूर्ण कामे एमपेडाद्वारा केली जातात.

  • सागरी उत्पादनांच्या बाजारभावांचा आढावा घेणारी प्राईम विकली आणि एमपेडा न्यूज लेटर ही नियतकालिके एमपेडाद्वारा प्रकाशित केली जातात.
  • जगभरातील सुमारे 100 देशांना विविध सागरी उत्पादनांची निर्यात एमपेडामार्फत केली जाते.
  • जपानमधील टोकियो येथे आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे एमपेडाची व्यवसाय विस्तार केंद्रे आहेत.
  • भारतातील विविध बंदरांमधून केल्या जाणाऱ्या समुद्री उत्पादनांच्या निर्यातीची आकडेवारी एमपेडाद्वारा संकलित केली जाते. या माहितीवरून बाजारभावाचे नियंत्रण आणि विनिमय दरातील चढ-उतारांचे नियंत्रण ठेवले जाते.

एमपेडाद्वारा देशातील मूल्यवर्धित समुद्री उत्पादन प्रकल्पांना तंत्र-आर्थिक आणि वित्तीय मान्यता दिली जाते. त्याचबरोबर भारत सरकारला खोल सागरातील मासेमारीबाबत सल्ला देण्याचे कामही केले जाते.

निर्यातीस चालना देण्यासाठी जगभारातील विविध ठिकाणी होणाऱ्या फूड फेस्टिव्हलमध्ये एमपेडाचा सहभाग असतो.

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

3.03614457831
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:52:54.155713 GMT+0530

T24 2019/05/26 00:52:54.162169 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:52:53.841954 GMT+0530

T612019/05/26 00:52:53.862702 GMT+0530

T622019/05/26 00:52:53.917851 GMT+0530

T632019/05/26 00:52:53.918779 GMT+0530