Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 22:06:54.513003 GMT+0530
शेअर करा

T3 2019/05/20 22:06:54.517938 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 22:06:54.543818 GMT+0530

मांदेली

मांदेली : क्लुपिफॉर्मीस गणाच्या एन्‌ग्रॉलिडी (वा क्लुपिइडी) कुलातील एक खाद्य मासा. याचे शास्त्रीय नाव कोइलिया डुस्सुमिरी असे आहे. हा उष्ण कटिबंधातील बहुतेक समुद्रांत सापडतो.

मांदेली : क्लुपिफॉर्मीस गणाच्या एन्‌ग्रॉलिडी (वा क्लुपिइडी) कुलातील एक खाद्य मासा. याचे शास्त्रीय नाव कोइलिया डुस्सुमिर असे आहे. हा उष्ण कटिबंधातील बहुतेक समुद्रांत सापडतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबई भागात हा विपुल सापडतो. तसेच पूर्व किनाऱ्यावर ओरिसात नदीमुखखाड्यांतून व इंडोनेशियाच्या द्वीपसमूहापर्यंत हा सापडतो.

मांदेलीच्या शरीराची लांबी सु. १८–२० सेंमी. असते. शरीर लांबट, शेपटीकडे निमुळते होत जाणारे, दोन्ही बाजूंनी चापट असते. मुस्कट टोकदार असून वरचा जबडा पुढे आलेला असतो. तोंडाची फट खालच्या बाजूला व डोळ्यांपर्यंत खोलवर गेलेली असते. जीभेवर व तालूवर बारीक बारीक दात असतात. पृष्ठपक्ष (हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी पाठीवरील त्वचेची स्नायुमय घडी; पाठीवरील पर) लहान असून तो मागच्या बाजूस शेपटीपर्यंत गेलेला असतो. गुदपक्ष (ढुंगणावरील पर) मागच्या बाजूला वाढून पुच्छपक्षाला (शेपटीच्या पराला) मिळालेला असतो. शेपटी टोकदार व लांब असते. पुच्छपक्ष पालींमध्ये (खंडांमध्ये) विभागलेला नसतो. अंगावर लहान लहान खवले असतात. डोक्यावर अजिबात खवले नसतात. रंग सोनेरी चमकदार असून शरीराच्या खालच्या बाजूवर काळसर ठिपक्यांच्या २ ते ३ ओळी असतात.

मुंबई किनाऱ्यावर वर्षभर आढळणारा हा मासा या भागात अत्यंत लोकप्रिय आहे. हा ताजा किंवा खारवून, वाळवूनदेखील खातात. याच्या प्रजोत्पादनाविषयी विशेष माहिती नाही. याच्या मांसात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे एक पौष्टिक खाद्य मत्स्य म्हणून याला महत्त्व आहे.

 

लेखक: लीना जोशी

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

2.96363636364
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 22:06:54.734666 GMT+0530

T24 2019/05/20 22:06:54.740882 GMT+0530
Back to top

T12019/05/20 22:06:54.425526 GMT+0530

T612019/05/20 22:06:54.444587 GMT+0530

T622019/05/20 22:06:54.502633 GMT+0530

T632019/05/20 22:06:54.503485 GMT+0530