অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माशांचे शरीरशास्र

माशांचे पचन तंत्र

या तंत्राची सुरुवात मुखापासून होते. मुखाचे आकार माशांच्या अन्नावर (खाद्य सवयींवर) अवलंबून असतात. बहुतेक माशांच्या मुखात दात नसतात. ज्या माशांत दात आहेत त्या दातांचे आकारदेखील माशांच्या अन्नावर अवलंबून असतात. हे दात बहुधा भक्ष्य पकडण्यासाठी असतात. पुष्कळसे मासे प्राणिभक्षी असल्यामुळे सूक्ष्म प्राण्यांवर

आ.१४. उपस्थिमिनांच्या दातांचे निरनिराळे प्रकार : वालुका मुशीच्या (सँड शार्कच्या) खालच्या जबड्याचा काटच्छेद (दातांचा अनुक्रम दर्शविणारा), (२) श्वेत मुशीचा (व्हाइट शार्कचा) दात, (३) व्याघ्र मुशीचा (टायगर शार्कचा) दात, (४) कंगव्याच्या दातांसारखे दात असणाऱ्‍या मुशीचा (कोम-टूण्ड शार्कचा) दात, (५) वालुका मुशीचा दात.

किंवा लहान माशांवरच आपली उपजीविका करतात. अशा माशांना बॅराकुडा माशात दिसणारे अणकुचीदार दात योग्य असतात. यांतील काही दात टाळूवरतर काही क्लोमचापाच्या बुंध्यावर आढळतात. घशात असणाऱ्‍यादातांना ग्रसनी दात म्हणतात. हे क्लोमचापाच्या जाड झालेल्या भागावर आढळतात. यांच्यात देखील अन्नानुरूप फरक आढळतात. मुश्यांसारख्या उपास्थिमिनात जवड्यातील दात दंताभ स्ववल्यांच्या घर्तीवरच पण खूप जाड असे असतात. या दातांवर विकसित वर्गातील प्राण्यांच्या दातांप्रमाणे दंतवल्क व दंतिन असते [⟶ दात]. त्यांचे पुढचे दात झिजले, तर मागच्या रांगेतील पुढे येतात. काही मुश्यांच्या दाताचा एक भाग करवतीच्या पात्यासारखा दंतुर असतो व पाव कापावयाच्या सुरीप्रमाण मांस कापू शकतो. बागळीचे दात फरशीसारखे चापट, तर पिरान्हाचे धारदार असतात. पोपट माशाच्या धारदार जबड्यात प्रवाळाचे खडक फोडू शकतील असे कृंतक (पटाशीचे) दात असतात व त्या खडकाच्या तुकड्यांचा चुरा करण्यासीठी घशात

आ. १५. अस्थिमिनांच्या दातांचे प्रकार : (अ) मार्जारमीन : (१) फणीच्या आकारात दात; (आ) खोलसमुद्रातील व्हायपर मासा : (१) सुळे; (इ) पार्जी मासा : (१) कृंतक, (२) चर्वनक; (ई) ईगल रे मासा : (१) पट्टकीय चर्वणक; (उ) मिनो मासा : ग्रसनी दातांचा प्रकार : (१) पकडणारा, (२) फाडणारा, (३) चर्वणक; (ऊ) चूषमीन : (१) कंगव्यासारखे ग्रसनी दात.

फरशीसारखे चापट ग्रसनी दात असतात. काही मार्जारमिनांचे दात खरवडण्यास योग्य असे असतात. खवळचोर नावाच्या माशाला जबड्याबाहेर असे दात असून त्यांनी तो दुसऱ्‍या माशाचे खवले ओरबडून खातो. शिवड्याच्या मुखात अणकुचीदार दात असतात. बोंबिलांचे दात बारीक व तीक्ष्ण असून टोकाजवळ वाकलेले असतात आणि त्यामुळे त्याचे भक्ष्य मुखातून निसटून जाऊ शकत नाही.

जबड्यानंतर मुखाची विस्तीर्ण पोकळी आढळते [आ. २ (आ)]. तिच्या पश्चभागी दोन्ही बाजूंस क्लोम-दरणे (क्लोमांतील फटी) असतात. हा भाग घशापर्यंत प्रसरणशील असतो. यानंतरच्या अन्नमार्गाच्या भागास ग्रसिका असे म्हणतात. ग्रसिकेच्या भित्ती प्रसरणशील असतात. मुखातील किंवा घशातील दाताने चावलेले अन्न या नलिकेत येते व नंतर येथून जठरात जाते. माशांच्या जठराचा आकार त्यांच्या अन्नावर अवलंबून असतो. प्राणिभक्षी माशांत ते थोडे फुगीर व नलिकासदृश असते. जठराच्या भित्तीत रस स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. या रसाने अन्नाचे पचन होते. जिताडा, मरळ, शिवडा या माशांत अशा आकाराचे जठर आढळते. स्टर्जन, गीझर्डशॅड, बोय यांसारख्या माशांत जाड गोळ्यासारखे स्नायुयुक्त जठर असते. त्याच्या आकुंचनामुळे क्रमसंकोच होतो व जठरातील अन्न आतड्यात पुढे सरकते. जठर व आतडे या दोहोंच्या संधिभागात यकृत व अग्निपिंड (स्वादुपिंड) यांमधून येणारे रस येऊन मिळतात व पचनक्रियेत भाग घेतात. यकृत हे विस्तृत आकारमानाचे, दोन खंडात विभालेले, किरमिजी रंगाचे इंद्रिय असते. यकृतातून स्रवणारा रस पित्ताशयात साठविला जातो व तेथुन तो एका स्वतंत्र नलिकेद्वारे जठर व आतडे यांच्या संधिभागात पचन तंत्रात ओतला जातो. अग्निपिंड कधीकधी यकृतास चिकटलेला किंवा आतड्याच्या आधारभूत ऊतकास (समान रचना व कार्य असणाऱ्‍या कोशिकांच्या समूहास) जोडलेला असतो. जठर व आतडे यांच्या संधिभागास जठरनिर्गमद्वार म्हणतात. या भागात एक स्नायुयुक्त झडप असते व अंधनालांचा (पिशवीसारख्या एका टोकास बंद असलेल्या नलिकाकार भागांचा) एक पुंजकाही येथे आढळतो [आ. २ (आ)]. या नालांतून कधीकधी पाचकरस स्रवतात, तर कधीकधी अन्नरसांचे शोषणही होते. यापुढील अन्नमार्ग पातळ भित्तीचा व पचवलेल्या अन्नाचे शोषण करणारा असतो. या भागातील अन्नमार्गाचो लांबी निरनिराळ्या माशांत निरनिराळी असते. प्राणिभक्षी माशांची आतडी लांबीला कमी, तर वनस्पतिभक्षी माशांची आतडी बरीच लांब असतात. रोहू, मृगळ यांच्या बाबतीत ती शरीराच्या लांबीच्या १०–१२ पट असते, तर खडशी किंवा महसीर माशांत ती ३-४ पट असते. महसीर हा मासा शेवाळ व जलीय वनस्पतींबरोबर मासेही खातो.

आतड्याचे मुख्य कार्य अन्नरसाचे शोषण हे आहे. जितके आतडे लांब तितके ते जास्त उपयुक्त ठरते. वनस्पतिजन्य अन्नात सेल्युलोजाचे प्रमाण जास्त असते व सेल्युलोजाच्या पचनास जास्त वेळ लागतो. आतडे लांब असले म्हणजे त्यात सेल्युलोजावर होणाम री प्रक्रिया पूर्ण होते व रूपांतरित अन्नरसाचे शोषण होते. मुशी, पाकट, कायमीरा, काँड्रोस्टीयन, होलोस्टीयन व काही प्राचीन टेलिऑस्ट या माशांत आतड्याची लां बी जरी कमी असली, तरी शोषणशील पृष्ठभाग वाढविण्यासाठी त्यांच्या आतड्याच्या आतील बाजूस सर्पिल झडप असते. या झडपेत खाचा असतात व त्यांतून अन्नरस वाहत असतात. अर्वाचीन टेलिऑस्टमध्ये हे काम आतड्यातील रसांकुर करतात. काही माशांच्या खाऱ्या-गोड्या पाण्यातील जीवनामुळे त्यांच्या आतड्यामध्ये होणाऱ्या तर्षण फरकांचे नियमन करणाऱ्या कोशिका असतात. आतड्यातील मलाचे उत्सर्जन गुदद्वारावाटे होते. डिप्नोई व मुशी यांची आतडी अवस्करात (ज्यात आतडे, युग्मक-वाहिन्या म्हणजे जननकोशिका वाहणाऱ्या वाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात असा शरीराच्या मागील टोकाकडे असलेल्या समाईक कोष्ठात) उत्सर्जन करतात आणि विष्ठा व मूत्र एकाच रंध्रातून बाहेर येतात.

श्वसन तंत्र : ऑक्सिजन व कार्वन डाय-ऑक्साइड हे दोन्ही वायू थोड्याफार प्रमाणात पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असतात. हा विरघळलेला ऑक्सिजन क्लोमावाटे रक्तात शोषून घेणे व रक्तात साठलेला कार्बन डाय-ऑक्साइड वायू त्याच मार्गाने बाहेर टाकणे हीच माशांची श्वसनक्रिया होय. क्लोमाचे वर्णन वर आले आहेच. चाप मुखाच्या पोकळीच्या मागे दोन्ही पार्श्वीय बाजूंस बसविलेले असतात व त्यांवर असंख्य क्लोमपटलिका असतात. या क्लोमपटलिकांस रक्ताचा भरपूर पुरवठा होत असतो. मुखात घेतलेले पाणी या क्लोमपटलिकांवरून वाहत जाऊन प्रच्छदाच्या मागील बाजूने बाहेर जाते. क्लोमपटलिकांचा या पाण्याशी संबंध आला म्हणजे त्यांच्यातील रक्तात असलेल्या तांबड्या कोशिका हीमोग्लोबिन या द्रव्याद्वारे पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेते व रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड हा वायू बाहेर टाकला जातो. अस्थिमिनांत क्लोमांवर उघडझाप करणारे झाकण असते, याला प्रच्छद म्हणतात. सायक्लोस्टोम, मुशी व काही पुरातन मत्स्यकुलांतही क्लोम असतात; पण त्यांवर आवरण नसते. क्लोमाच्या लांबट छिद्रात आतील बाजूस एक त्वचेची झडप असते. इतर क्रिया मात्र अस्थिमिनांसारख्या असतात.

माशांच्या पोटात आतड्याच्या वरच्या बाजूस एक पांढरी लांबट हवेची पिशवी असते. तिला वाताशय म्हणतात [आ. २ (आ)]. काही माशांत हा वाताशय निरुंद अशा खोबणीने विभागलेला असतो. या वाताशयाची उत्पत्ती अन्ननलिकेपासून निघणाऱ्या अंधवर्धापासून (पिशवीसारख्या एका टोकास बंद असलेल्या वाढीपासून) झालेली असते.ॲकँथोप्टेरिजियनासारख्या अर्वाचीन माशांत या अंधवर्धाचा व अन्ननलिकेचा काही संबंध आढळून येत नाही. महसीरसारख्या काही माशांत या दोहोंचा सुताने जोडल्यासारख्या संबंध आढळून येतो. काही प्राचीन माशांत वाताशयाच्या आतील बाजूस रक्तवाहिन्या व सूक्ष्मकोशिकामिश्रित त्वचेची उत्पत्ती झाली. यातूनच पुढे वायवी श्वसनक्रियेला (पाण्याबाहेरील हवेचा सरळ उपयोग करणाऱ्या श्वसनक्रियेला) सुरुवात झाली असावी. याची परिणती लेपिडोसायरन व प्रोटॉप्टेरस यांसारख्या वायवी श्वसन करणाऱ्या माशांच्या उत्पत्तीत झाली असावी. या माशांचे वायवी श्वसनास इतके अनुकूलन झाले आहे की, त्यांना जर मोकळी हवा मिळाली नाही, तर ते मरतात. क्लोमांवाटे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेण्याची त्यांची क्षमता काही प्रमाणात नष्ट झालेली असते. काही मासे वाताशयाचा उपयोग जलस्थितिक (पाण्याचा दाव व समतोल यांच्याशी संबंधित असलेले) अंग म्हणून करतात. यामुळे माशाला पाण्याच्या दाबाशी अनुकूलन करता येते. पाण्याच्या आवश्यक त्या खोलीत राहण्यासाठी वाताशयातील वायूचे प्रमाण कमीजास्त करावे लागते. हे काम वाताशयातील अंतस्त्वचेच्या कोशिका करतात. हा वायू बहुधा ऑक्सिजनच असतो आणि तो कमी करावयाचा असल्यास भोवतालच्या रक्तवाहिन्यांत त्याचे शोषण होते. या वाताशयाचा क्रमविकास फुप्फुसात झाला असावा, असे अनुमान करण्यात आले आहे. काही मासे (उदा., सायप्रिनिफॉर्मीस गणातील) वाताशयाचा उपयोग ध्वनिग्रहणाच्या कार्यात, तर काही (उदा., स्किईनिडी कुलातील) ध्वनिनिर्मितीच्या कामीही करतात.

रक्ताभिसरण तंत्र

या तंत्रातील मुख्य घटक म्हणजे हृदय, रोहिण्या, नीला आणि केशिका हे होत. केशिका अत्यंत सूक्ष्म असून शरीरात सर्वत्र पसरलेल्या असतात. त्यांची भित्ती अत्यंत पातळ असल्यामुळे त्यांतून पोषकद्रव्ये, हॉर्मोने (वाहिनीविहीन ग्रंथींचे एकदम रक्तात मिसळणारे उत्तेजक स्राव),तसेच ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड या वायूंची रक्तात देवाणघेवाण होत असते. क्लोमपटलिकांतील केशिका वायूची देवाणघेवाण करण्यात फार कार्यक्षम असतात. या तंत्रातील केंद्रीय घटक हृदय हा होय. भ्रूणावस्थेत ते एका वाकविलेल्या माहरोहिणीपासून तयार होते. भ्रूणविकासात या महारोहिणीच्या भित्ती जाड स्नायुयुक्त बनतात व शेवटी तीन किंवा चार कप्प्यांचा हा अवयव तयार होतो. हृदयाच्या तालबद्ध प्रसरण व आकुंचनामुळे महानीलेत आलेले अशुद्ध रक्त नीलाकुहरातून अलिंदात (अशुद्ध रक्ताच्या कप्प्यात) जमा होते. तेथून ते निलय (शुद्ध रक्ताचा कप्पा) या स्नायुयुक्त कप्प्यात येते. या कप्प्यातून पुढे रक्त महारोहिणीशंकू या कप्प्यात येते. हा कप्पा नीलाकुहरापेक्षा जास्त स्नायुयुक्त असतो. या कप्प्याच्या आकुंचनाने रक्त पुढे महारोहिणीत शिरते. या निरनिराळ्या कप्प्यांत अशा झडपा असतात की, महानीलेपासून रक्ताचा प्रवाह एका दिशेने पुढे सरकत असतो. महारोहिणीत रक्त आल्यानंतर क्लोमात जाण्यासाठी दोन्ही बाजूंना अभिवाही फाटे फुटतात व हे फाटे क्लोमचापावर जाऊन तेथे रुधिरकेशिकांत विभागतात. या रुधिरकेशिका क्लोमपटलिकांत विसावतात. तेथे रक्तातील हीमोग्लोबिन पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेते. रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड व इतर उत्सर्ग द्रव्ये (निरुपयोगी द्रव्ये) पाण्यात सोडून दिली जातात. हे काम झाल्यावर शुद्ध रक्त रुधिरकेशिकांद्वारे चार किंवा पाच अपवाही रोहिण्यांत जाते व तेथून ते पृष्ठमहारोहिणीत नेले जाते. या रोहिणीतून डोक्यास व शरीराच्या इतर भागांत शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. रोहिणीचे अंतम विभाजन केशिकांत होते. या केशिका इंद्रियांत विखुरलेल्या असतात. रक्तातील पोषक द्रव्ये, हॉर्मोन, ऑक्सिजन वगैरे इंद्रियांत मिळाल्यावर कार्बन डाय-ऑक्साइडयुक्त रक्त नव्या केशिकांत जाते. या केशिका एकमेकींस मिळतात. महानीलेतले अशुद्ध रक्त हृदयात येते. अशा रीतीने मत्स्य वर्गातील प्राण्यांचे रक्ताभिसरण होते. इतर पृष्ठवंशी हृदयातील अशुद्ध रक्त फुप्फुसात जाऊन शुद्ध झाल्यावर परत हृदयात येते व तेथून ते इतर इंद्रियांकडे जाते. माशांच्या बाबतीत मात्र क्लोमांत शुद्ध झालेले रक्त हृदयात परत न येता परस्पर इंद्रियांकडे जाते.

उत्सर्जन तंत्र

या क्रियेचे मुख्य इंद्रिय वृक्क (मूत्रपिंड) हे होय. ते लांबट आकाराचे, तांबूस किंवा किरमिजी रंगाचे असते. हे इंद्रिय देहगुहेच्या वरच्या भागात मणक्यांच्या खाली चिकटलेले असते. वृक्के दोन असतात. त्यांपैकी एक उजव्या बाजूस व दुसरे डाव्या बाजूस असते. वृक्कांतील उत्सर्ग द्रव्य नलिकेद्वारे बाहेर टाकले जाते. दोन्ही बाजूंच्या नलिका एका मूत्राशयात येऊन ते मूत्र छिद्रावाटे बाहेर फेकले जाते. काही माशांत उत्सर्जनाचे कार्य थोड्या प्रमाणात आतडी, त्वचा व क्लोम हे अवयवही करीत असतात. विशेषतः क्लोमांमधून अमोनियासारखी काही उत्सर्ग द्रव्ये बाहेर टाकली जातात. मासे नेहमीच गोड्या किंवा खार्याव पाण्यात राहत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त आंतरिक पर्यावरण म्हणजे शरीरातील द्रव पदार्थ व बाह्य पर्यावरण म्हणजे पाणी यांत तर्शण दाबाच्या [⟶ तर्षण] दृष्टीने समतोल राखणे आवश्यक असते आणि हे बिकट काम वृक्कांतील कोशिका व त्याचबरोबर क्लोमपटलिका व त्वचा करीत असतात. खार्यार पाण्यातील लवणांचे प्रमाण (संहती) माशातील द्रव पदार्थात किंवा रक्ताच्या द्रवात असलेल्या लवणांच्या प्रमाणापेक्षा जास्त असते. अशा स्थितीत तर्षणामुळे शरीरातील द्रव बाहेर जाऊ न देता जीवन कंठाचे लागते. गोड्या पाण्यात लवणांचे प्रमाण शरीरातील द्रव पदार्थातील लवणांपेक्षा कमी असते. अशा माशांत आत आलेले जास्त पाणी वृक्काच्या कोशिका इतर उत्सर्ग द्रव्याबरोबर बाहेर टाकीत असतात. सामन, पाला यांसारखे मासे समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात प्रजोत्पादनासाठी येतात; तसेच यूरोपियन वाम गोड्या पाण्यातून खाऱअया पाण्यात जाते. या दोन्ही प्रकारच्या माशांत तर्षण नियमन करून शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचे नियमन करावे लागते. हे करण्यास वृक्काबरोबरच क्लोमपटलिकांतील काही कोशिका,आतड्यातील काही कोशिका व त्वचा यांचाही उपयोग केला जातो. मुशी, पाकट यांसारख्या माशांत रक्तात साठविलेल्या युरियाचा तर्षण दाब समतोल साधण्यासाठी उपयोग केला जातो. यामुळेच गोड्या पाण्यातील काही मुशी किंवा पाकट यांच्या रक्तात यूरियाचे प्रमाण समुद्रातील माशापेक्षा पुष्कळ कमी असते.

अंतःस्रावी ग्रंथी

(वाहिनीविहीन ग्रंथी). या ग्रंथींना वाहिनीनलिका नसल्यामुळे त्या आपले स्राव रुधिरकेशिकांत सोडतात. तेथे रक्तात मिसळलेल हे स्राव रक्तप्रवाहाद्वार शरीरातील इतर भागांत जातात. ह्या स्रावातील द्रव्ये शरीराच्या विविध क्रिया-प्रक्रियांचे नियमन करतात. सायक्लोस्टोम माशात या ग्रंथींचे कार्य पुष्कळ विस्तृत असते. ⇨पोप ग्रंथी, ⇨अपटू ग्रंथी, ⇨अधिवृक्क ग्रंथी, ⇨अग्निपिंड व ⇨जनन ग्रंथी या मुख्य अंतःस्रावी ग्रंथी होत. यांशिवाय आतड्यातील व क्लोमचापावरील विशिष्ट ग्रंथींपासूनही अंतःस्राव होतो. शरीराची वाढ, जननक्रिया, तर्षण नियमन, अन्नपचन, वसा (स्निग्ध पदार्थ) उत्पादन, रक्तदान व कातडीचा रंग या सर्वांचे नियमन अंतःस्रावांद्वारे व मेंदूतील संवेदनशक्तीच्या आधारे होत असते. या ग्रंथी शरीरात एकमेकींपासून दूर अंतरावर असल्या, तरी त्यांच्या क्रियांचे सुसूत्रीकरण मेंदूकडून केले जाते. पोष ग्रंथीचा उपयोग अलीकडे खाद्य माशांचे प्रजनन (पैदास) वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला आहे. [⟶ अंतःस्रावी ग्रंथी].

तंत्रिका तंत्र

(मज्जासंस्था). शरीराच्या सर्व संवेदनांचे व हालचालींचे नियमन या तंत्राद्वारे होते. या तंत्राचे मुख्य केंद्र मेंदू हे होय. मेंदूच्या पश्चभागापासून पुच्छभागापर्यंत जाणाऱ्या रज्जूस मेरुरज्जू या दोहोंचे मिलून केंद्रिय तंत्रिका तंत्र बनते. मेंदूपासून निघणाऱ्या तंत्रिका व मेरुरज्जूपासून निघणाऱ्या तंत्रिकांचे मिळून परिसरीय तंत्रिका तंत्र बनते. स्वायत्त तंत्रिका तंत्रात अनुकंपी व परानुकंपी तंत्रिकांचा समावेश होते [⟶ तंत्रिका तंत्र]. आजूबाजूच्या वातावरणातील उद्दीपनांचे आकलन होण्याकरिता इतर पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे माशासही ज्ञानेंद्रिये असतात व ही तंत्रिकांशी संलग्न असतात. डोळे, कान, नाक, मुखगुहा (तोंडाची पोकळी) व त्वचा ही मुख्य ज्ञानेंद्रिये होत. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या तंत्रिका तंत्रात आढळणारा आकृतिबंध (आराखडा) स्थूलमानाने माशांतही आढळतो.

आ. १६. मुशी माशाचा मेंदू : (अ) पृष्ठीय दृश्य : (१) अग्रमस्तिष्क, (२) मध्यमस्तिष्क, (३) पश्चमस्तिष्क, (४) गंधखंड, (५) प्रमस्तिष्क, (६) तृतीय नेत्रपिंडाचा देठ, (७) दृष्टिखंड, (८) निमस्तिष्क, (९) लंबमज्जा; (आ) अधर दृश्य : (१०) पोष ग्रंथी.मेंदू : माशाच्या मेंदूत अग्रभागी दोन्ही बाजूंस गंधखंड, दोन प्रमस्तिष्क (मोठा मेंदू) गोलार्ध, दोन दृष्टिखंड, लंबमज्जा व खालील बाजूस निमस्तिष्क (लहान मेंदू) असे भाग असतात. ते भाग जरी एकमेकांस जोडलेले असले, तरी प्रत्येक भागाची संवेदनक्षमता व कार्यपद्धती वेगवेगळ्या असतात. दृष्टी, श्रवणशक्ती, घ्राणेंद्रिय इत्यादींची संवेदना केंद्रस्थाने मेंदूमध्येच पण निरनिराळ्या ठिकाणी असतात. निरनिराळ्या तंत्रिकांच्या साहाय्याने ही आपआपली कार्यं करीत असतात. मेंदूतून दहा मस्तिष्क तंत्रिकांचा उगम होतो. पृष्ठवंशी प्राण्यात आढळणारी मेंदूची संरचना प्राथमिक स्वरूपात मत्स्य वर्गात आढळते. [⟶ तंत्रिका तंत्र].

आ. १७. अस्थिमिनाच्या डोळ्याचा छेद : (१) भिंग, (२) स्वच्छ मंडल, (३) कनीनिका, (४) भिंगाचा निलंबी बंध, (५) वलयाकृती बंध, (६) त्वचा, (७) श्वेतमंडल, (८) जालपटल (दृक्पटल), (९) दृक् तंत्रिका, (१०) दृक् रक्तवाहिन्या, (११) भिंग प्रतिकर्षक स्नायू, (१२) नेत्रश्लेष्म (यातील संज्ञांच्या स्पष्टीकरणार्थ ‘डोळा’ ही नोंद पहावी).डोळा : हे इंद्रिय अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्नसंपादन,शत्रूपासून संरक्षण, प्रजनन या सर्व महत्त्वाच्या कार्यांत डोळ्याची आवश्यकता असते. माशांच्या डोळ्यासारखी असते; मात्र पर्यावरणामुळे माशांच्या डोळ्याच्या रचनेत काही फरक आढळतात. जे मासे नेहमी गढूळ पाण्यात किंवा कमी उजेडात राहतात, त्याचे डोळे मोठे असतात. उथळ पाण्यात व भरपूर प्रकाशात वावरणाऱ्या माशांचे डोळे थोडे लहान असतात. बहुतेक माशांत डोळ्याचे भिंग वाटोळे असते. दूरच्या किंवा जवळच्या वस्तूचे अवलोकन करण्यासाठी त्यावर सर्व भिंगच फिरविण्याची स्नायूमध्ये क्षमता असते. काही माशांमध्ये (उदा., मुशी) भिंगाचा व्यास बदलण्याचीही क्षमता असते. मर्यादित प्रमाणात मासे रंग ओळखू शकतात. उथळ पाण्यात राहणारे मासे खोल पाण्यात राहणाऱ्या माशांपेक्षा रंग ओळखण्यात जास्त क्रियाशील असतात. खोल पाण्यात राहणाऱ्या कित्येक माशांच्या जातींत दृष्टीचा ऱ्हास झालेला असतो. अशा माशांचे डोळे अवशेषांगे (अवशेष रूपातील अंगे) म्हणून अस्तित्वात असतात किंवा नष्टच झालेले असतात. डोळे निष्क्रिय झाल्यामुळे त्यांची इतर इंद्रिये जास्त कार्यक्षम झालेली असतात. [⟶ आंधळा मासा ].

बहुतेक माशांच्या दोन डोळ्यांत इतके मोठे रुंद अंतर असते की, त्यांची दृष्टी एकनेत्री आहे असे म्हणता येईल. म्हणजे प्रत्येक डोळा एक स्वतंत्र असमन्वयित प्रतिमा ग्रहण करतो आणि या प्रतिमांच्या परस्परव्याप्तीचे प्रमाण (असलेच तर) अत्यल्प असते. याखेरीज माशाच्या डोळ्यांची जालपटले मेंदूतील त्या त्या डोळ्याच्या विरुद्ध क्षेत्राला दृक् संवेदना पोहचवितात व त्यामुळे एकनेत्री दृष्टीचा परिणाम अधिक प्रभावी होतो.

रुचिसंवेदना

माशामध्ये तोंडात असलेली जीम प्रारंभिक स्वरूपाची व हालचालविरहित असते. काही माशांचे दात जिभेतच असतात. या संवेदनेची जाणीव होण्यासाठी त्यांच्या तोंडात, डोक्यावर व शरीराच्या इतर भागांवर देखील रुचिकलिका (कळीच्या आकाराच्या संरचनेमध्ये असलेल्या रुचीचे आकलन होणाऱ्या खास तंत्रिका) असतात. यांच्या व घ्राणेंद्रियाच्या साहाय्याने पाण्यातील लवणे व त्यांची चव यांची माशांना जाणीव होते. डोळे नसलेले मासे, सामन, मुशी इत्यादींत देखील रुचिसंवेदना अशाच प्रकारे होते. मार्जारमिनांच्या मुखाजवळील तंतुमय अभिमर्शांवर (मिशांसारख्या संरचनांवर) देखील रुचिकलिका असतात व त्या त्यांचे अन्न शोधून काढण्यास मदत करतात. आंधळ्या माशांत अशा रुचिकलिका सर्व शरीरावर असतात.

घ्राणेंद्रिय : वास ओळखण्याची संवेदना माशांच्या बाबतीत फार महत्त्वाची आहे. मुखाच्या वरच्या बाजूस घ्राणेंद्रियाची दोन रंध्रे आढळतात. ही रंध्रे ज्या बाकदार नलिकेत आ. १८. माशाचे नासाविवर : (१) पाण्याचे मार्ग, (२) संवेदनक्षम अस्तर, (३) पहिली तंत्रिका.

आ. १८. माशाचे नासाविवर : (१) पाण्याचे मार्ग, (२) संवेदनक्षम अस्तर, (३) पहिली तंत्रिका.खुली होतात त्या नलिकेतच संवेदनाक्षम अशा तंत्रिका असतात. यांपैकी एक तंत्रिका सभोवतालच्या पाण्याची परीक्षा करून आपला अभिप्राय मेंदूस कळविते. यावर काय कार्यवाही करावयाची हे मेंदूत ठरविले जाते. वाम जातीच्या माशांची दृष्टी मंद असल्यामुळे ते भक्ष्य मिळविण्याच्या कामी घ्रोणेंद्रियाचाच जास्त उपयोग करतात. मुशी माशांचे डोळेही लहान असल्यामुळे ते दृष्टीबरोबरच भक्ष्य मिळविण्यासाठी घ्राणेंद्रियांचाही उपयोग करतात. आंधळे मासे तर भक्ष्य मिळविण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी सर्वस्वी घ्राणेंद्रिये व रुचिकलिका यांवर अवलंबून असतात. गोड्या पाण्यातील काही माशांत जर एखादा मासा जखमी झाला, तर इतर मासे त्याच्या रक्ताचा वास ओळखून शत्रूच्या भितीने दूर पळून जातात. सामनसारखे मासे कितीही काळ कोठेही दूर गेले, तरी आपल्या जननस्थानातील पाण्याचा गंध व चव विसरत नाहीत आणि या अनुरोधाने ते तेथे परत येत असावेत, असे मानले जाते. माशांची अंतिम क्रिया एकाच इंद्रियावर अवलंबून नसून दुसऱ्या ज्ञानेंद्रियांचा समन्वय साधूनच केली जाते. त्यातल्या त्यात गंध व रुची या दोन संवेदनांचा समन्वय नेहमीच साधला जातो. [⟶ गंध; नाक].

श्रवणेंद्रिय

हे मस्तकाच्या पाठीमागे उजव्या व डाव्या बाजूस एकेक असे हाडाच्या पोकळीत असते. माशांना बाह्यकर्ण व मध्यकर्ण नसतो. अंतर्कर्ण मुख्यतः शरीराचा तोल

आ. १९. माशाचे श्रवणेंद्रिय : (अ) कॉड माशातील कर्णाशम; (आ) मीग्रे माशातील कर्णाश्म; (इ) सामान्य प्रकारचा (सामनॉइड) अंतर्क्ण : कलामय सर्पिल कुहर : (१) अग्र उर्ध्व नलिका, (२) पश्च ऊर्ध्व नलिका, (३) पार्श्व किंवा क्षैतिज (आडवी) नलिका, (४) लॅगिना, (५) शराश्म, (६) लघुकोश, (७) गोणिका. सांभाळण्याचेही कार्य करतो. अतिशय विकास पावलेले मासे आणी अस्थिमीन यांत सर्पिल कुहर (अंतर्कर्णातील नलिकाकार पोकळी) अंतर्लसीकेने (एका विशेष प्रकारच्या द्रवाने) भरलेले असते. अंतर्कर्णात कर्णनलिका व त्यांच्या टोकांशी कुंभिका असतात. या उच्च पृष्ठवंशी प्राण्यांच्या कानातल्यासारख्याच असतात [⟶ कान]. मनुष्यप्राण्याच्या कानात आढळणारा कर्णशंबूक मात्र येथे आढळत नाही. कर्णनलिकेत कॅल्शियम कार्बोनेटाचे लहान स्फटिक असतात. त्यांना कर्णाश्मम्हणतात. या कर्णाश्मांचे आकार निरनिराळ्या मत्स्यकुलात निरनिराळे असतात. यांपैकी प्रमुख कर्णाश्मास शराश्म म्हणतात. याच्या अंतर्भागात वयाप्रमाणे वलयीभवन होते व यावरून त्या माशाचे वयोमान ठरविता येते. काही उपास्थिमिनांत (उदा., मुशी, रे वगैरे) एक उघडा अंतर्वलन नाल असतो, तो शीर्षाच्या पृष्ठापासून लघुकोशाला गेलेला असतो. हा नाल समुद्रातील पाण्याने भरलेला असतो. काही मुशी माशांत कर्णाश्माच्या ऐवजी वाळूचे कण असतात. सगळे उपास्थिमीन व अस्थिमीन यांत तीन अर्धवर्तुलाकार नलिका, गोणिका, लघुकोश व लघुकोशापासून निघालेला चषकासारखा लॅगिना हे भाग असतात. अर्धवर्तुलाकार नलिकेच्या एका टोकाशी एक कुंभिका असून तिच्या आत एका ठिकाणी संवेदी लोमकोशिका (सूक्ष्म केस असलेल्या कोशिका) असतात [⟶ कान].

पाण्यात जे ध्वनितरंग निर्माण होतात त्यांमुळे कर्णाश्म कंपन पावतात व त्यांचे संवेदन तंत्रिकातंतूद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते. पाण्यातल्याप्रमाणे कठीण पदार्थापासून निर्माण होणारे ध्वनितरंगही याचप्रमाणे मेंदूपर्यंत पोहोचतात. तळ्यातील माशांना नेहमी खाणे घालणाऱ्या माणसांच्या पावलांची चाहूल लागताच तळ्यातील मासे चळवळ करू लागतात. त्यांना हा माणूस जरी प्रत्यक्ष दिसला नाही, तरी त्याच्या पावलांमुळे उत्पन्न झालेले ध्वनितरंग त्यांच्या कर्णावर जाऊन आदळतात. काही मासे दात एकमेकांवर घासून व वाताशयाच्या कंपनामुळे स्वतःच आवाज उत्पन्न करतात. ढोमा जातीचे मासे असा आवाज काढण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. पुष्कळदा या आवाजावरून मच्छीमारास त्यांना पकडणे सोपे जाते.

स्पर्श, तापमान व वेदना

स्पर्शाची जाणीव करून देणारे तंत्रिकातंतू माशाच्या पृष्ठभागावर त्वचेखाली सर्व शरीरावर पसरलेल असतात.तापमानाचे तंत्रिकातंतूही असेच सर्व शरीराच्या पृष्ठभागावर असतात व ते ०.०३ से. इतका उष्णतेतील अतिसूक्ष्म फरकही जाणू शकतात. माशाच वेदनेची कितपत जाणीव होते, याबाबतीत विशेष निर्णायक माहिती उपलब्ध नाही; पण त्यांना जखम केली असता तीव्र प्रतिक्रिया आढळून येतात.

आ. २०. जपानी ईल माशातील पार्श्विक रेखा तंत्र : (१) पार्श्विक रेखा नाल, (२) छिद्र, (३) बाह्यत्वचा, (४) चषिका, (५) संवेदनक्षमकोशिका, (६) तंत्रिकातुंगक, (७) तंत्रिका, (८) खवला, (९) स्नायू (आकृतीतील संज्ञांच्या स्पष्टीकरणार्थ ‘पार्श्विक रेखा’ ही नोंद पहावी.)

पार्श्विक रेखा ज्ञानेंद्रिय : थोडे उभयचर वर्गातील प्राणी सोडल्यास ही रेखा फक्त मत्स्य वर्गातील प्राण्यांतच आढळते. त्वचेखाली असलेल्या काही संवेदनक्षम कोशिका असलेल्या नलिकांची ही रेखा बनलेली असते. या नलिका डोळ्यांच्या हाडाभोवताली जबड्याखालून डोक्याच्या हाडावरून शरीराच्या दोन्ही बाजूंनी थेट शवटापर्यंत जाते. शरीराच्या बाजूवरून जाताना त्या खवल्यांच्या मध्यरांगेशी जोडलेल्या असतात. त्यांच्यावर मधूनमधून संवेदनक्षम अशी रंध्रे असतात. या सर्व तंत्रामुळे माशांना पाण्याच्या दाबाची व त्यातील निरनिराळ्या प्रवाहांची कल्पना येते. या इंद्रियामुळेच माशांचा थवा एकाच वेळी आपली स्थलांतराची दिशा बदलतो. सर्व मासे शिस्तीने जातात. उपास्थिमिनांत लोरेझीनी कुंभिका, पुटिका इ. आणखी काही संवेदनक्षम कोशिका-पुंज असतात. [⟶ पार्श्विक रेखा].

इलेक्ट्रोफोरस, टॉर्पेडो, मलाप्टेरस यांसारख्या माशांत कमी दाबाचा विद्युत् प्रवाह उत्पन्न करण्याची शक्ती असते. त्यांच्या विद्युत्‌ आकलकामुळे त्यांना शत्रूची चाहूल किंवा अन्नाची संभवता याचे आकलन होते. [⟶विद्युत्‌ अंगे].

जनन तंत्र

सर्वसाधारणपणे मासे अंडी घालतात व या अंड्यांपासून निषेचनानंतर नवीन माशांची उत्पत्ती होते. यावरून मासे हे अंडज प्राणी आहेत हे स्पष्ट होते; पण या सर्वसाधारण लक्षणा त काही जातींचे मासे अपवाद आहेत. पिसीलिडी कुलातील गँब्यूझ, गपी वगैरे, बाघवीरसारख्या मुश्यांच्या जाती, ईल, पाऊट यांसारखे व्लेनी मासे व हिस्टेरोकार्‌पस यांसारखे पर्च मासे हे अंडी न घालता पिलांना जन्म देतात. यांना जरायुज प्राणी म्हणतात. अंडी पाण्यातच सोडली जातात. पुष्कळदा ती असहाय्यपणे पाण्यात तरंगतात.काही जातींत अंडी पाण्याच्या तळास किंवा शेवाळास चिकटविली जातात. या सर्वसाधारण अंडी घालण्याच्या प्रकारात नर अगर मादी अंड्याचे रक्षण करण्यास थांबत नाहीत. या प्रकारात नैसर्गिक आपत्तीमुळे बरीच अंडी नाश पावतात. यावर उपाय म्हणून की काय निसर्गाने मादीस खूप अंडी घालण्याची क्षमता दिली आहे. परिणामतः पुढील पिढीस जरूर तेवढी अंडी शिल्लक राहतात. भारतातील पाला ह्या माशाची मादी एका वेळी २० लाख अंडी घालू शकते. अटलांटिक महासागरातील लिंग (मोलवा) हा मासा सु. १५५ सेंमी. लांबीचा असताना २.८ कोटी, तर ९.५० किग्रॅ. वजनाचा कॉड मासा ६६.५ लक्ष अंडी घालतो. इतक्या मोठ्या प्रजननक्षमतेमुळे या माशांची कितीही प्रमाणात मासेमारीत हानी झाली, तरी त्यांची संख्या घटत नाही. जरायुज माशात मात्र प्रजननास मर्यादा असते. अंड्याची वाढ मादीच्या शरीरात होत असल्यामुळे त्यांची संख्या शरीरात मावू शकेल इतकीच मर्यादित असते. पिले शरीरात वाढत असल्यामुळे शत्रूपासून व नैसर्गिक आपत्तीपासून त्यांचे संरक्षण होते. पिलांची संख्या कमी असली, तरी उपजताच ती हालचाल करू लागतात व थोड्या काळात स्वतंत्र जीवन जगू लागतात व नवी पिढी निर्माण होते.

लिंगभेद

काही अपवाद सोडल्यास मासा हा एकलिंगी प्राणी आहे. बहुतांश माशांत नर व मादी यांच्या शरीररचनेत फारसा फरक दिसत नाही. ह्यांना बाह्य जननेंद्रिये नसतात. प्रजननाच्या वेळी मादीच्या पोटाचे आकारमान मोठे होते. पिसी लिडी कुलातील माशांत नर मादीपेक्षा आकारमानाने लहान असतो व त्याला जननभुजा असते. ही जननभुजा गुदपक्षाच्या दोन-तीन अरांपासून झालेली असते. होराइक्थीस माशातही नर या प्रकारचा असतो. कटला, रोहू इ. कार्प जातीच्या माशांत नर व मादीत बाह्यात्कारी विशेष फरक नसला, तरी नराचा अंसपक्ष थोडा जास्त लांब असतो व प्रजननाच्या काळात या असंपक्षावर व गालफटावर खरखरीतपणा येतो. इंडियन ट्राउट [बॅरिलियस बोला (धगार)] याच्या पश्च शरीराच्या दोन्ही बाजूंच्या खवल्यांवर टोकदार मुखरी असते. तीमुळे या पृष्टभागास खरखरीतपणा येतो. कोळशी (पुंटीयस कोला) या माशातील नराच्या गालफटावर असलेल्या मुखऱ्यांचा पुंजका इतका धारदार असतो की, त्यावरून हात फिरविल्यास तो कापण्याचा संभव असतो. मुशी, पाकट वगैरेंसारख्या उपास्थिमिनांत नराला आलिंगक (श्रोणिपक्षाच्या रूपांतरणाने तयार झालेली व मैथुनाच्या वेळी उपयोगी पडणारी दंडासारखी उपांगे) असतात. प्लोस्टेथिडी कुलातील प्रियापियम माशात नराच्या स्कंधाच्या अस्थिमेखलेचा एक भाग वा श्रोणिपक्ष यांच्या संयोगाने गळ्याखालीच एक जटिल बाह्य आलिंगकासारखा नवीनच अवयव पहावयास मिळतो. जलजीवालयात वापरण्यात येणाऱ्या एंजल, सयामी फायटर वगैरे जातींतील नर त्यांच्या लांब व विशिष्ट तऱ्हेच्या पक्षांवरून ओळखले जातात.

आ. २१ मुशी माशातील अलिंगक : (१) आलिंगक, (२) श्रोणिपक्ष.

आ. २१ मुशी माशातील अलिंगक : (१) आलिंगक, (२) श्रोणिपक्ष.

नर : नराच्या देहगुहेत कण्याच्या दोन्ही बाजूंस लांबटगोल असे दोन वृषण (पुं-जनन ग्रंथी) असतात. यांत शुक्राणू तयार होतात.प्रत्येक वृषणास नलिका असतात. यांतून शुक्राणूंचे वहन होते. दोन्ही बाजूंच्या शुक्रनलिका एकत्र येऊन त्यातील रेत एकाच छिद्राद्वारे बाहेर फेकले जाते. जरायुज माशांत हे रेत आलिंगक, जननभुजा अशा विशिष्ट अवयवांच्या मदतीने मादीच्या योनिमार्गात सोडले जाते. आलिंगकांची जोडी असून प्रत्येक आलिंगक श्रोणिपक्षाच्या रचनेचे रूपांतर झाल्यामुळे तयार होतो. त्याचा आकार वर्तुळाकार छेदाचा, बोरूसारखा असतो. जननभुजा गुदपक्षाच्या पहिल्या तीन किंवा चार अरांपासून बनलेली असते. गँब्यूझमध्ये पहिले तीन अर जाड व लांब होऊन जननभुजा बनते [आ. ४ (आ)]. होराइक्थीसमध्ये अरांत खूपच रूपांतर होऊन जटिल स्वरूपाची जननभुजा तयार होते. या माशांत शुक्राणूंचे पुंजके तयार होतात व मीलनाच्या वेळी हे पुंजके मादीच्या जननेंद्रियावर फेकले जातात. तेथे ते चिकटतात व यथाकाल त्यांतून शुक्राणू बाहेर पडून मादीच्या अंडनलिकेत शिरतात.

आ. २२. (अ) ठिपकेदार कुत्रा-माशाची सर्पिलाकार तंतुयुक्त मरमेड पिशवी; (आ) ठिपकेदार पाकट माशाची (राजा मॅक्युलाटा) शिंगासारखे तंतू असलेली मरमेड पिशवी.

आ. २२. (अ) ठिपकेदार कुत्रा-माशाची सर्पिलाकार तंतुयुक्त मरमेड पिशवी; (आ) ठिपकेदार पाकट माशाची (राजा मॅक्युलाटा) शिंगासारखे तंतू असलेली मरमेड पिशवी.मादी : मादीच्या देहगुहेत कण्याच्या दोन्ही बाजूंस एकेक लांबट पिशवीसारखा अंडकोश असतो. दोन्ही अंडकोश पश्चभागात एकत्र होतात. या शेवटच्या भागाची काही माशांत एक जाडशी पिशवी तयार होते. या पिशवीत मूत्राचे उत्सर्जन, तसेच अंड्यांचे निक्षेपण होते. नंतर पिशवीस असलेल्या एका छिद्रातून अंडी बाहेर पडतात व नराच्या शुक्राणूकडून त्यांचे निषेचन होते. जरायुज माशात अंड्यांचे निषेचन अंडनलिकेत होते व तेथेच त्यांचा विकास होऊ लागतो. हा विकास काही माशांच अंड्यात असणाऱ्या पितकातील (निर्जीव पोषक द्रव्यातील) अन्नरसावर होतो, तर काहीत अंडनलिकेच्या भित्तीवरील रसांकुरामधून वाढणाऱ्या भ्रूणास (गर्भास) अन्न मिळते. भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यावर तो मादीच्या जननछिद्रातून बाहेर पडतो. मुशी, पाकट वगैरेसारख्या काही उपास्थिमिनांत तसेच होराइक्थीस, हिप्पोकँपस (घोडामासा) वगैरे काही अन्य माशांत अंड्याचे निषेचन मात्र अंडनलिकेत होते; पण यापुढची सर्व वाढ मादीच्या शरीराबाहेर होते. काही माशांत अशा अंड्यांना संरक्षणासाठी विशिष्ट तऱ्हेची टोके असलेले तंतू (तणावे) वरील व खालील बाजूंस असलेले पिशवीसारखे वेष्टन असते; उदा., ठिपकेदार कुत्रा-मासा (स्कायलिओर्हिनस जाती), पोर्ट-जॅकसन मुशी (हेटेरोडोंटस फिलिपी) किंवा राजा मॅक्युलाटा हा ठिपकेदार पाकट. या पिशाव्या समुद्रात कोठेतरी खडकास किंवा शेवाळास अडकून राहतात व गर्भाची पूर्ण वाढ झाल्यावर डिंभ बाहेर येतात. या पिशव्या‘मरमेडच्या पिशव्या’ (जलपरीच्या पिशव्या), ‘मरमेडच्या पिन-बॉक्सेस’ इ. विविध नावांनी ओळखण्यात येतात.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020

© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate