Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/15 00:42:33.314600 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / माशांत आढळले अधिक प्रतिजैविकांचे प्रमाण
शेअर करा

T3 2019/10/15 00:42:33.319266 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/15 00:42:33.344350 GMT+0530

माशांत आढळले अधिक प्रतिजैविकांचे प्रमाण

मत्स्यपालन उद्योगाची वाढ वेगाने होत असून, माशांच्या मागणीतही चांगलीच वाढ होते.

मानवी आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक 

अरिझोना राज्य विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या विश्‍लेषणामध्ये 27 प्रकारच्या माशांमध्ये 47 पैकी पाच प्रतिजैविके मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. मत्स्यपालनामध्ये जागतिक पातळीवर गेल्या काही दशकांपासून प्रतिजैविकांचा वापर वेगाने वाढत आहे. त्याचे विपरीत परिणाम मानवी आरोग्यासह पर्यावरणामध्येही होण्याची शक्‍यता आहे. हे संशोधन "जरनल ऑफ हाजार्डस मटेरिअल्स' मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मत्स्यपालन उद्योगाची वाढ वेगाने होत असून, माशांच्या मागणीतही चांगलीच वाढ होते. गेल्या वीस वर्षांमध्ये मागणी तिपटीने वाढली असून, 2013 मध्ये ती 83 दशलक्ष टन इतकी होती. माशांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो. काही वेळा प्रतिजैविकांचा वापर अनावश्‍यकरीत्या व अधिक प्रमाणात केला जातो, त्यामुळे रोगकारक जिवाणूंमध्ये प्रतिकारकता वाढत आहे. पर्यायाने मानवी उपचारामध्ये प्रतिजैविकांचा वापर करण्यावर मर्यादा येत आहेत.

प्रतिजैविकांमुळे रोगनियंत्रणासह प्रतिबंधामध्ये मोठी भूमिका निभावली असली तरी त्यांचे वाढते प्रमाण अंतिमतः मनुष्यजातीसाठी धोकादायक ठरू शकते. विविध सूक्ष्मजीवामध्ये प्रतिजैविकामध्ये प्रतिकारकता विकसित होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे मत्स्यपालनातील प्रतिजैविकांचे नेमके प्रमाण जाणण्यासाठी अरिझोना राज्य विद्यापीठातील संशोधक हॅन्सा डोन आणि रोल्फ हाल्डेन यांनी अभ्यास केला आहे. अकरा देशांतून अमेरिकेमध्ये निर्यात होणाऱ्या माशांच्या विविध जातींतील प्रतिजैविकांचे प्रमाण मोजले असता, त्यामध्ये पाच प्रतिजैविके मोठ्या प्रमाणात आढळली आहेत.

ही पाच प्रतिजैविके आढळली

या अभ्यासामध्ये जलउत्पादित घटकांच्या नमुन्यांचे विश्‍लेषण करण्यात आले. त्यात अमेरिकेमध्ये आहारात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या श्रिंप, तिलापिया, कॅटफिश, स्वाई आणि अटलांटिक सॅलमोन माशांचा समावेश होता.

  • जंगली श्रिंप, मत्स्यपालनातील तिलापिया, सॅलमोन, ट्रॉट मासे यामध्ये ऑक्‍सिटेट्रासायक्‍लिन.
  • मत्स्यपालनातील सॅलमोनमध्ये इपिक्‍सिटेट्रासायक्‍लिन, ऑर्मेटोप्रीम व व्हर्जिनियोमायसिन.
  • मत्स्यपालनातील श्रिंपमध्ये सल्फाडिमिथोक्‍सिन असा पाच प्रतिजैविकांचे प्रमाण अधिक आढळले.
  • त्यातही ऑक्‍सिटेट्रासायक्‍लिन हे प्रतिजैविक मत्स्यपालनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ते मेक्‍सिको येथील समुद्रातून मिळवलेल्या श्रिंपमध्येही आढळले आहे. त्यामागे सागरी प्रदूषण हे प्रमुख कारण असल्याचे संशोधकांचे मत आहे.
  • प्रतिजैविकांचे प्रमाण ते या कालावधीमध्ये आठ पटीने वाढल्याचे दिसून आले.

या माशांवर झाले संशोधन

अमेरिकेसह अकरा देशांमध्ये उत्पादित होत असलेल्या सॅलमोन, कोळंबी, ट्रॉट, तिलापिया, स्वाई, कॅटफिश या माशांचे विश्‍लेषण अरिझोना राज्य विद्यापीठातील संशोधकांनी केले.

स्त्रोत:अग्रोवन

3.08
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/15 00:42:33.532186 GMT+0530

T24 2019/10/15 00:42:33.538522 GMT+0530
Back to top

T12019/10/15 00:42:33.255877 GMT+0530

T612019/10/15 00:42:33.272291 GMT+0530

T622019/10/15 00:42:33.304344 GMT+0530

T632019/10/15 00:42:33.305147 GMT+0530