Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 01:26:37.739967 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / शेततळ्यातील मत्स्यशेती
शेअर करा

T3 2019/05/26 01:26:37.744699 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 01:26:37.769966 GMT+0530

शेततळ्यातील मत्स्यशेती

शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याबरोबर खेकडे, वाम, बेडूक यांसारखे भक्षक प्राणी प्रवेश करणार नाहीत याची व्यवस्था करावी.

शेततळ्यातील मत्स्यशेती व्यवस्थापन

 

1) शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याबरोबर खेकडे, वाम, बेडूक यांसारखे भक्षक प्राणी प्रवेश करणार नाहीत याची व्यवस्था करावी.

2) शेततळ्यात खाद्य व्यवस्थापनासाठी सुविधा करावी. 
3) पाणी काढल्यानंतर माशांची काढणी करण्यासाठी तळ्यात (विशेषतः प्लॅस्टिक अस्तर टाकलेल्या) सहज चढ-उतार करण्यासाठी पायऱ्यांची सोय करावी. 
4) सर्वसाधारणपणे मातीच्या तलावात माशांची विष्ठा, शिल्लक खाद्य यांसारख्या सेंद्रिय पदार्थांचे मातीतील जिवाणूंमुळे सहज विघटन होते. मात्र प्लॅस्टिक अस्तर टाकलेल्या तलावात असे होत नाही. यामुळे या तळ्यातील पाणी लवकर खराब होते. तसेच प्लॅस्टिक अस्तर, लहान आकार इ. कारणांमुळे शेततळ्यातील पाण्याचे गुणधर्मही (उदा. तापमान, सामू इ.) सतत बदलत असतात. याशिवाय डिसेंबर-जानेवारीनंतर शेततळ्यांतील पाण्याची पातळी कमी होत जाते. उन्हाळा सुरू होताना तापमान वाढते. साठवणूक केलेल्या माशांची वाढ झालेली असल्याने, खाद्य जास्त प्रमाणात द्यावे लागते. त्या अनुषंगाने माशांची विष्ठा, शिल्लक खाद्य यांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे शेततळ्यातील पाण्याची प्रत मोठ्या प्रमाणावर खराब होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी शेततळ्यातील पाणी शेतीला देणे, शेततळ्यात नवीन पाणी भरणे आवश्‍यक ठरते. 
5) सर्वसाधारणपणे शेततळ्याची खोली दोन ते तीन मीटर असते. या अनुषंगाने माशांची काढणी करण्यासाठी पुरेशा उंचीची (किमान पाच मीटर) ओढजाळी असावी.
6) पावसाळ्यात शेततळी भरून वाहतात. अशा वेळी ओव्हरफ्लोमधून साठवणूक केलेले मासे वाहून जाणार नाहीत, यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. तसेच जनावरे शेततळ्यात जाऊन प्लॅस्टिक कागद फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.

जाती

1) भारतीय प्रमुख कार्प मासे : कटला, रोहू, मृगळ या तीन मत्स्य जातींना भारतीय प्रमुख कार्प मासे म्हणतात. झपाट्याने होणारी वाढ व आकाराने खूप मोठे होत असल्याने मत्स्यशेतीकरिता या जाती फायद्याच्या ठरतात. 
2) चिनी कार्प : चंदेरा व गवत्या हे चांगले उत्पादन देणारे मासे आहेत. 
3) भारतीय प्रमुख कार्प मासे हे परंपरागतरीत्या नैसर्गिक तळी व कृत्रिम तलावामध्ये वाढविले जातात. नैसर्गिक अन्न आणि जागेसाठी या तीन जातींची पूरकता असल्याने त्यांचे तलावामध्ये एकत्रित संवर्धन केले जाते. 
4) मिश्र मत्स्यशेतीमध्ये कटला पाण्याच्या पृष्ठभागाजवळ असलेल्या प्राणी प्लवंगांचा अन्न म्हणून वापर करतो. रोहू मधल्या थरातील अन्न खातो, तसेच मृगळ तळाशी असलेले अन्न खातो. चांगली वाढ आणि उत्तम मागणी असल्यामुळे मिश्र मत्स्यशेती फायदेशीर ठरते. 

संपर्क : रवींद्र बोंद्रे : 9423049520 
मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

3.09433962264
राहूल गवळी Nov 06, 2018 01:35 PM

सर मला शेत तलाव मासेउत्पादन करायचे आहे तर मला मार्ग दर्शन करावे

कृष्णा शिवाजी झेंडे May 07, 2018 12:20 PM

सर माझा 60 गुंठा प्लॉट आहे मी त्या मध्ये मत्स्य शेती करू शकतो का कृपया मार्गदर्शन करावे जिल्हा- कोल्हापूर- तालुका -शाहूवाडी
फोन नम्बर 97*****76

कृष्णा शिवाजी झेंडे May 07, 2018 12:13 PM

मला मत्स्य शेती करायची आहे तरी मला मार्गदर्शन पाहिजे, कृपया आपण मला मार्गदर्शन करा माझा फोन नंबर आहे +९१ 97*****76

Chaudhari suryakant Feb 13, 2018 08:08 PM

मलाही माहिती. .दया

राम Feb 02, 2018 06:39 PM

सुपर्णा मासा मस्तीसाठी फायदेमंद आहे का उद्या खाण्यासाठी काय द्यावे याचे मार्गदर्शन करावे ९०२८९९१२९०

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 01:26:38.151480 GMT+0530

T24 2019/05/26 01:26:38.158053 GMT+0530
Back to top

T12019/05/26 01:26:37.680429 GMT+0530

T612019/05/26 01:26:37.698902 GMT+0530

T622019/05/26 01:26:37.729630 GMT+0530

T632019/05/26 01:26:37.730410 GMT+0530