Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/21 04:30:41.726190 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / शोभिवंत मासे
शेअर करा

T3 2019/05/21 04:30:41.731073 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/21 04:30:41.755593 GMT+0530

शोभिवंत मासे

आजकाल आर्थिक स्थिती चांगली असणारया मॉडर्न घरात इतर सर्व प्रकारच्या अद्ययावत उपकारणबरोबरच शोभिवंत माशाच्या मत्स्यालायाचे काचेचे घर ( फिश पॉट ) हे असतेच.

प्रस्तावना

आजकाल आर्थिक स्थिती चांगली असणारया मॉडर्न घरात इतर सर्व प्रकारच्या अद्ययावत उपकारणबरोबरच शोभिवंत माशाच्या मत्स्यालायाचे काचेचे घर ( फिश पॉट ) हे असतेच. त्यामुळे शोभिवंत माशांच्या पालनाला अलीकडे चांगले दिवस येऊ पाहताहेत. शोभिवंत माशाचे प्रजनन, पालन आणि विक्री हा व्यवसाय जम धरू लागला आहे.

मत्स्यपालन करताना मुलभूत बाबीं

सायप्रीनीड कुटुंबातील बार्ब आणि लोचेस जातीचे मासे प्रामुख्याने शोभिवंत मत्स्यपालनाकरता उपयोगात आणले जातात. याचबरोबर खाऱ्या पाण्यातील शोभिवंत मत्स्यपालन करताना मुलभूत बाबींची माहिती असणे फार महत्वाचे आहे.

१)      काचेच्या मात्स्यालायाचा आकार ५० x३० x३० सें.मी अगर ६०x४५x३० सें. मी एवढा असावा.

२)      मात्स्यालायाकरिता पावसाचे पाणी,वितळलेल्या बर्फाचे पाणी, डीस्टील वाटर वापरावे.

३)      मात्सालायातील पाण्याचे तापमान २० ते ३० सें. एवढे असावे.

४)      पाण्याची पारदर्शकता, पुरेसा प्रकाश, माशांची योग्य संख्या आणि पाणवनस्पती यांच्या वापरामुळे जे शेवाळ बनते ते कमी करण्यासाठी पाणी बदलावे लागते.

५)      पाण्यात आलेले ढगाळपण घालवण्यासाठी ३ ते ४ शिंपले ठेवावेत.

६)      मात्स्यालायला घरात ८-१० तास प्रकाश आणि ३-४ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. अगर प्रकाशासाठी ट्युबलाईट बसवावी.

७)      खाडीयुक्त वाळू वापरावी. हि खडीवजा वाळू चांगल्या प्रकारे धुऊन वापरावी.

८)      पाणवनस्पती ठेवावी. त्यामुळे मासे शोभिवंत दिसतात. प्राणवायूचे प्रमाण वाढते. पानवनस्पती अॅमेझॉन स्वोर्ड प्लान्ट, इंडिअन फर्न, बनाना प्लान्ट, वाटरलिली, हायद्रीला. इ. रकर आहेत ते वापरावे.

९)      बुडबुडे सोडण्यासाठी एअर रेटर मशीनचा मत्स्यालयात वापर करावा.

१०)  साधारणत: पाण्याच्या निम्मी घनमीटर हवा मत्स्यालयात असावी. याशिवाय मत्स्यालयात पाणी शुद्धीकरणासाठी फिल्टर बसवावा.

११)  थंडीच्या दिवसात मात्स्यालायाचे तापमान नियंत्रित करण्यासाठी हिटर बसवावे.

१२)  मासा जेवढा भुकेला राहतो तेवढा तो चांगला राहतो.थंडीत आठवड्यातन २-३ वेळा खाद्य द्यावे. खाद्याशिवाय डफ निया, मोईना, वर्म्स इत्यादी जिवंत खाद्यही द्याव.हे खाद्य पाण्यावर पसरून द्यावे.

१३)  महत्वाचे म्हणजे मत्स्यालयात गप्पी,गोराफिश, गोल्डफिश,एंजल, टेट्रा,कोई, प्लटी,इ. शोभिवंत मासे पाळावेत. त्यांच्या बाबतीतली सर्वतोपरी माहिती आणि सवयी माहित करून त्यांचे पालन करावे.

हा व्यवसाय म्हणून करताना त्यांचे प्रजनन, मात्यालय आणि त्यांचे पालनपोषण इ. ची माहिती आणि प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरु केल्यास निश्चितपणे चांगले अर्थार्जन करता येईल.

स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव

3.0
मीलीद कावले Jan 09, 2018 02:55 PM

जर मला प्रशिक्षण घायचे झाले तर कोठे घेता येईल.
चारकोप मुंबई 98*****94

रामचंद्र दत्‍ताराम नांदोसकर Sep 01, 2017 12:45 PM

मी मुंबई येथे राहतो वरील व्‍यवसाय मलाा घरात करायचा आहे तोही पूरक व्‍यवसाय म्‍हणून
या बाबतीत मला सर्वोतोपरी आपले मोफत मार्गदर्शन लाभेल तर फार कृपा होईल
माझा मोबाईल क्रमांक ९८७०९६९८९२

प्रदीप खोत Aug 16, 2017 02:02 PM

मला शोभिवंत मासे व्यवसाय बाबत मार्गदर्शन हवे आहे mob 78*****20

धनंजय पंत Feb 23, 2017 05:21 PM

जर मला प्रशिक्षण घायचे झाले तर कोठे घेता येईल.
रा. ता. जि. अकोला महाराष्ट्र.
मो. 96*****99

सुदेश गायकवाड Nov 21, 2016 11:18 PM

जर मला प्रशिक्षण घायचे झाले तर कोठे घेता येईल.
मी ता.खालापुर ,जि.रायगड येथे राहत आहे.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/21 04:30:41.971364 GMT+0530

T24 2019/05/21 04:30:41.977607 GMT+0530
Back to top

T12019/05/21 04:30:41.641421 GMT+0530

T612019/05/21 04:30:41.659133 GMT+0530

T622019/05/21 04:30:41.715094 GMT+0530

T632019/05/21 04:30:41.716035 GMT+0530