Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 08:33:58.404423 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / औषधी वनस्पती लागवड
शेअर करा

T3 2019/10/14 08:33:58.409077 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 08:33:58.435113 GMT+0530

औषधी वनस्पती लागवड

औषधी वनस्पतीची लागवड या घटक योजनेअंतर्गत समूह पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीकरिता प्रजातीनिहाय प्रकल्प खर्चाच्या २० टक्के, ५० टक्के व ७५ टक्के एवढे वित्तीय साह्य देय आहे.

औषधी वनस्पती लागवड

 • औषधी वनस्पतीची लागवड या घटक योजनेअंतर्गत समूह पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीकरिता प्रजातीनिहाय प्रकल्प खर्चाच्या २० टक्के, ५० टक्के व ७५ टक्के एवढे वित्तीय साह्य देय आहे.
 • औषधी वनस्पती पिकांची लागवड प्राधान्याने समूह पद्धतीने करण्यात यावी. समूह निश्चिअती करण्याकरिता औषधी वनस्पती पिकांचे किमान दोन हेक्टार क्षेत्र असावे. यामध्ये साधारणपणे कमीत कमी पाच शेतकऱ्यांचा व जास्तीत जास्त तीन गावांचा समावेश असावा.
 • वैयक्तिक शेतकरी सदर घटक योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास त्याचे लागवडीसाठीचे प्रस्तावित क्षेत्र कमीत कमी ०.२० हेक्टतर असणे आवश्यवक आहे. समूह हा शक्यधतो औषधी वनस्पती प्रजातीनिहाय असावा. प्रजातीनिहाय समूह शक्य् नसल्यास २ ते ३ प्रजातींचा समावेश असलेल्या एकत्रित लागवडीचा समूह करावा व त्याचे क्षेत्र सलग असावे. आंतरपीक व मिश्र पद्धतीने औषधी वनस्पतीची लागवड अर्थसाह्यासाठी पात्र आहे.
 • या घटक योजनेअंतर्गत औषधी वनस्पती उत्पादक, शेतकरी लागवडदार इ., तसेच औषधी वनस्पती उत्पादक संघ, फेडरेशन, स्वयंसहायता गट, कंपनी, उत्पादक सहकारी संस्था इ. यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
 • लागवडपश्चायत व्यवस्थापन

  वाळवणी गृह

 • वाळवणी गृह घटकअंतर्गत औषधी वनस्पती काढणी केलेल्या कच्चा माल वाळविणे, याशिवाय उत्पादित मालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी मालाची स्वच्छता व प्रतवारी करणे शक्यळ होणार आहे.
 • स्वयंसहायता गट/ सहकारी संस्था/ सार्वजनिक संस्था यांच्यासाठी या योजनेअंतर्गत १०० टक्के व कमाल पाच लाख रुपये अर्थसाह्य उपलब्ध होणार आहे. तसेच खासगी क्षेत्रासाठी सदरची योजना बॅंक कर्जाशी निगडित असून, वैयक्तिक लाभार्थीकरिता ५० टक्के व कमाल २.५० लाख रुपये अर्थसाह्य देण्यात येईल.
 • साठवण गृह

 • राज्यातील औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने साठवण गृह घटक योजना अत्यंत महत्त्वाची आहे. औषधी वनस्पतींच्या समूह क्षेत्रांमध्ये वाळवणी गृहांची, तसेच साठवण गृहांची योजना राबविली जाते. सदर साठवण गृह हे वाळवणी गृह व प्रक्रिया केंद्र यामध्ये दुवा साधण्याचे काम करणार आहे.
 • या योजनेअंतर्गत स्वयंसहायता गट/ सहकारी संस्था यांच्यासाठी १०० टक्के व कमाल पाच लाख रुपये अर्थसाह्य मिळते.
 •  


   

  3.02142857143
  Ravindra Bhikaji Chougale Mar 31, 2019 01:53 PM

  Extra information are needed and which medicinal plant and market information needed

  सरपंच ग्रामपंचायत एकुंडी ता जत जि सांगली Jan 25, 2018 03:34 PM

  आम्ही ग्रामपंचायत गायरानमध्ये औषधी वनस्पती लावणार आहोत तरी कुणाला भेटावे.

  सचिन सोनजी शिंगडा Sep 10, 2017 08:29 AM

  अधिक माहितीसाठी कोणाशी संपर्क करावा

  अक्षय जंजिरे Sep 01, 2017 04:16 PM

  अधिक माहिती हवी आहे . कुठल्या वनस्पती आहेत आणि बाजारपेठ उपलब्धता या विषयी मार्गदर्शन हवे आहे .माझा मो नं96*****37

  रवि स्वामी Aug 20, 2017 07:43 PM

  अधिक माहिती हवी आहे . कुठल्या वनस्पती आहेत आणि बाजारपेठ उपलब्धता या विषयी मार्गदर्शन हवे आहे .माझा मो नं ९०११५२८८५२.

  आपल्या सूचना पोस्ट करा

  (वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

  Enter the word
  नेवीगेशन

  T5 2019/10/14 08:33:59.287330 GMT+0530

  T24 2019/10/14 08:33:59.293733 GMT+0530
  Back to top

  T12019/10/14 08:33:58.275736 GMT+0530

  T612019/10/14 08:33:58.295146 GMT+0530

  T622019/10/14 08:33:58.393882 GMT+0530

  T632019/10/14 08:33:58.394871 GMT+0530