অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
२८ जून २०१७ चा शासन निर्णय (जी आर GR ) पाहण्यासाठी येथे क्लिक करा
२० जुलै २०१७ चा शासन निर्णय (जी आर GR ) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

योजना परिचय

या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दि. १.४.२००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज दि. ३०.६.२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल व व्याजासह रु. १.५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधिन राहून माफ करण्यात आले आहे. तसेच रु. १.५० लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (OTS) योजनेअंतर्गत रु. १.५० लाख एवढया रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि, यासाठी अशा शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत रु. १.५० लाख अदा करण्यात येईल.

या योजनेमध्ये सन २०१५ -१६ व २०१६ -१७ या वर्षातील घेतलेल्या पीक कर्जाची दि. ३०.६.२०१६ व दि. ३०.६.२०१७ अनुक्रमे परतफेड केल्यास अशा शेतक-यांनाही पीक कर्जाच्या २५% अथवा रु. २५००० लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये सन २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षातील पुनर्गठन केलेल्या रकमेची थकबाकी असल्यास किंवा त्यांची नियमित परतफेड केल्यासही शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर कर्जमाफी योजनेचा राष्ट्रीयकृत बॅंका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतक-यांना दिलेल्या कर्जास लागू राहील.

योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करावयाची पध्दत व तद्नुषंगिक सूचना

प्रस्तावना

महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ जाहीर करण्यात आलेली असून ही योजना राज्य आधार अधिनियम, २०१७ अंतर्गत अधिसूचित करण्यात येत आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी शेतकऱयांनी करावयाचा अर्ज आधार प्रमाणीकरणाच्या आधारे सॉफ्टिेअर ॲप्लीकेशनचा उपयोग करुन ऑनलाईन सादर करावयाचा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करावयाची पध्दत व तदनुषंगिक सूचना

ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत

अ) अर्जदाराची नोंदणी व अर्जदाराने स्वतः अर्जाचे डिजीटायझेशन करण्याची पध्दत पुढीलप्रमाणे

  1. https://aaplesarkarmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर योजनेची लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
  2. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, २०१७ बाबत लिंकवर क्लिक केल्यानंतर अर्जासाठी नविन टॅबवर http://www.csmssy.in हे पोर्टल उघडेल.
  3. या पोर्टलवर अर्जदारास नोंदणी करण्याच्या कार्यवाहीची निश्चित पध्दत, शासन निर्णय व योजनेचा इतर तपशील उपलब्ध होईल.
  4. अर्जदाराने त्याची स्वत:ची व त्याच्या कुटुंबातील (कुटुंब म्हणजे अर्जदार, पती/पत्नी व १८ वर्षांखालील अपत्ये) प्रत्येक सदस्याची आधार क्रमांक / आधार क्रमांक नसल्यास नव्याने आधार क्रमांकासाठी नोंदणी करुन मिळणारा EID आधारीत किंवा आधार क्रमांकाशिवाय नोंदणी करण्यासाठी अर्जदारांना "न्यू रजिस्ट्रेशन" यावर क्लिक करावे
  5. "नविन नोंदणी" यावर क्लिक केल्यावर अर्जदारास आधार क्रमांक आहे काय अशी विचारणा होईल. "होय" या पर्यायाची निवड केल्यास "OTP" व "Biometric" असे दोन पर्याय दिसतील.
  6. "OTP" आधारीत प्रमाणीकरण करावयाचे असल्यास त्यासाठी 'एक वेळ पासवर्ड आधार क्रमांकाशी नोंदणीकृत / जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल. मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाला जोडलेला नसेल तर त्याने किंवा तिने नजीकच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी जोडून घ्यावा
  7. जर अर्जदार अथवा कुटुंबातील इच्छूक सदस्याकडे आधार क्रमांक नसल्यास वेब पोर्टल वरील आधार विरहीत नोंदणीचा पर्याय मार्फत ते नोंदणी करु शकतात. तथापी अर्जदाराने याची नोदं घ्यावी की त्यास आधार क्रमांक मिळताच, या योजनेचा फायदा घेण्यासाठी त्याने आधार क्रमांक वेब पोर्टलवर अदयावत करणे आवश्यक आहे.
  8. वरील पैकी एखादया पध्दतीने नोंदणी यशस्वी झाल्यावर, अर्जदार आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य उपलब्धतेनुसार वैयक्तीक युजर आयडी व योग्य पासवर्ड निवडू शकतील.
  9. अर्जदाराने त्याच्या/तिच्या युजर आयडी (user id) व पासवर्ड (password) द्वारे http://www.csmssy,in या पोर्टलवर लॉगीन (Login) करावयाचे आहे.
  10. अर्जदाराने अर्जाच्या लॉगीनमध्ये उपलब्ध असलेली 'कर्जमाफी योजना' लिंक याची निवड केल्यास कर्जमाफी अर्जाचा नमूना संगणकावर दिसेल.
  11. अर्जदाराने जर आधार क्रमांकाव्दारे नोंदणी केली असेल तर कर्जमाफी अर्जात अर्जदाराबाबतची मूलभूत माहिती उदा. नाव, आधार क्रमांक, लिंकग मोबाईल क्रमांक, जन्म तारीख, पत्ता इ. माहिती आधार क्रमांकाच्या दंडाबेस मधून आपोआप उपलब्ध होईल.
  12. अर्जदाराने त्यानंतर अर्जामध्ये पॅन कार्डचा तपशील, पेन्शन पीपीओचा तपशील, कर्जाचा तपशील इत्यादी भरला पाहिजे. अर्जामध्ये कुंटूबातील (अर्जदार, पती/पत्नी व १८ वर्षांखालील अपत्ये) प्रत्येक व्यक्तीस एकापेक्षा अधिक कर्जाची माहिती भरण्याचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
  13. अर्जदाराने त्याच्या छापील अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे त्याची, पती / पत्नी व १८ वर्षांखालील कर्जदार अपत्यांची माहिती देखील ऑनलाईन पोर्टलवर भरली पाहिजे.
  14. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर संगणक प्रणालीव्दारे अर्जाची पोच पावती दिसेल. अर्जदार त्याच्या भावी उपयोगाकरीता या पावतीची मुद्रीत प्रत घेऊ शकेल किंवा पीडीएफ वर जतन करुन ठेवू शकेल.
  15. अर्जदाराने भविष्यातील संदर्भासाठी त्याचे युझर नेम व पासवर्ड स्वतःच्या स्मरणात ठेवले पाहिजेत असे सुचविण्यात येते.

ब) सीएससी (CSC) केंद्रावर अर्जाची नोंदणी व संगणकीकरणाची पर्यायी पध्दत

  1. अर्जदाराने भरलेल्या अर्जासह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रास भेट दयावी. जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राची यादी http://www.csmssy.in या पोर्टलवरुन उपलब्ध करुन घेता येईल.
  2. या योजनेच्या पोर्टलची लिंक https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
  3. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, २०१७ या लिंकवर क्लिक केल्यानंतर अर्जासाठी नविन टॅबवर http://www.csmssy.in हे पोर्टल उघडेल.
  4. अर्जदाराने त्याची स्वत:ची व त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची (अर्जदार, पती/ पत्नी व १८ वर्षांखालील कर्जदार अपत्यांचीच) आधार क्रमांक आधारीत किंवा आधार क्रमांकाशिवाय नोंदणी करण्यासाठी अर्जदाराने "न्यू रजिस्ट्रेशन " यावर क्लिक केले पाहिजे.
  5. "नविन नोंदणी" यावर क्लिक केल्यावर अर्जदारास आधार क्रमांक आहे काय अशी विचारणा होईल.' होय' या पर्यायाची निवड केल्यास "OTP" व "Biometric" असे दोन पर्याय दिसतील
  6. "OTP" (एक वेळ पासवर्ड) आधारीत प्रमाणीकरण करण्यासाठी एक वेळ पासवर्ड क्रमांक आधार क्रमांकाशी नोंदणीकृत / जोडलेलय मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल. मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाला जोडला असेल तर या पर्यायाची निवड करावी. जर अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधार क्रमाशी जोडलेला नसेल तर त्याने / तिने नजीकच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन असा आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी जोडून घ्यावा
  7. बायोमेट्रोक आधारित प्रमाणीकरणासाठी संगणक यंत्रणेला जोडलेले बायोमेट्रोक उपकरण कार्यरत असल्याची नोंदणी पूर्वी खात्री करुन घ्यावी.
  8. जर अर्जदार अथवा त्याच्या कुटुंबातील कर्जदार सदस्याकडे आधार क्रमांक नसल्यास वेब पोर्टलवरील आधार विरहीत नोंदणीचा पर्याया निवडून ते नोंदणी करु शकतात. तथापी अर्जदाराने याची नोंद घ्यावी की त्यास आधार क्रमांक मिळताच, या योजनेचा फायदा घेण्यासाठी त्याने आधार क्रमांक वेब पोर्टलवर अदयावत करणे आवश्यक राहील.
  9. वरील पैकी एखादया पध्दतीने नोंदणी यशस्वी झाल्यास, अर्जदार व त्याच्या कुटुंबातील सदस्य उपलब्धतेनुसार वैयक्तीक युजर आयडी व योग्य पासवर्ड निवडू शकतील.
  10. सेवा केंद्राच्या ऑपरेटरने अर्जदाराच्या युजर आयडी व पासवर्ड मधून http://www.csmssy,in या T लिकवर लॉगीन केले पाहिजे.
  11. लॉगीन केल्यावर सेवा केंद्राच्या ऑपरेटरने अॅप्लिीकेशन लॉगीन मध्ये कर्जमाफी योजना ही लिंक निवडावी म्हणजे त्यास कर्जमाफीचा अर्ज माहिती भरण्यासाठी संगणकावर दिसू लागेल.
  12. अर्जदाराने जर आधार क्रमांकाव्दारे नोंदणी केली असेल तर कर्जमाफी अर्जात अर्जदाराबाबतची मूलभूत माहिती उदा. नाव, आधार क्रमांक, लिंकग मोबाईल क्रमांक, जन्म तारीख, पत्ता इ. माहिती आधार क्रमांकाच्या दंडाबेस मधून आपोआप उपलब्ध होईल.
  13. सेवा केंद्राच्या ऑपरेटरने नंतर अर्जामध्ये पॅन काडांचा तपशील,,पेन्शन पीपीओचा तपशील, कर्जाचा तपशील इत्यादी भरला पाहिजे. अर्जामध्ये कुंटूबातील (अर्जदार, पती/पत्नी व १८ वर्षांखालील अपत्ये) प्रत्येक व्यक्तीस एकापेक्षा अधिक कर्जाची माहिती भरण्याचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
  14. सेवा केंद्राच्या ऑपरेटरने पोर्टलवर उपलब्ध असलेल्या अर्जाच्या सर्व स्तंभातील माहिती भरताना अर्जदाराच्या छापील अर्जातील माहितीचा वापर करावा.
  15. सेवा केंद्राच्या ऑपरेटरने पोर्टलवर उपलब्ध असलेल्या अर्जातील पती/पत्नी आणि वीर कुटुंबातील सदस्यांची माहिती भरताना छापील अर्जातील माहितीचा वापर करावा.
  16. सेवा केंद्राच्या ऑपरेटरने ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर संगणक प्रणालीव्दारे अर्जाची पोच पावती संगणकावर दिसेल. सेवा केंद्राच्या ऑपरेटरने अर्जदाराच्या भावी उपयोगाकरीता या पावतीची मुद्रीत प्रत घ्यावी आणि ती अर्जदारास दयावी.
  17. भविष्यातील संदर्भासाठी अर्जदाराचे युझर नेम व पासवर्ड स्वतःच्या स्मरणात ठेवले पाहिजेत असे सेवा केंद्राच्या ऑपरेटरने अर्जदारास सुचवावे.

नमुन्यातील अर्जाचे वर्णन :-

१) अर्जदारास ऑनलाईन अर्ज भरण्यास सुविधा व्हावी म्हणून छापील अर्ज खालील ठिकाणी उपलब्ध असतील.

  • प्रमुख वर्तमान पत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अर्जाचा नमुना.
  • http://www.csmssy.in या संकेतस्थळावरुन दि. २४.०७.२०१७ पासून अर्ज उतरवून घेता येईल.
  • दि. २४.०७.२०१७ पासून खालील ठिकाणांवरुन अर्जाच्या छायाकिंत प्रती काढून घेता येतील.
    a. जिल्हाधिकारी
    b. तहसिलदार
    c. जिल्हा उपनिबंधक/उपनिबंधक/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था
    d. ग्राम पंचायत
    e. बँका व प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था/विविध कार्यकारी सहकारी संस्था
    f. आपले सरकार सेवा केंद्र

(२) अर्जास दोन बाजू असून पहिल्या बाजूवर अर्जदाराची मूलभूत माहिती भरावयाची आहे. जसे कि, नाव, पत्ता, आधार क्रमांक/EID, लिंग, जन्मदिनांक, मोबाईल क्रमांक. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ ते ६ रकान्यातील माहिती भरणे बंधनकारक आहे.
पहिली बाजू


(३) अनुक्रमांक ७ व८ रकान्यामधील माहिती लागू असल्यास अर्जदाराने भरावी.

(४) अर्जदाराने कुटुंबातील (कुटुंब म्हणजे अर्जदार स्वतः, पती/पत्नी व १८ वर्षांखालील अपत्ये) सर्व कर्जदारांच्या माहितीचा तपशील एकाच अर्जात भरला पाहिजे.

(५) अर्जाच्या पहिल्या बाजूचा दुसरा विभाग अर्जदाराच्या कर्जाबाबतच्या तपशीलाविषयी आहे. कर्ज खाते क्रमांक व त्या कर्ज खातेदाराशी निगडीत असलेल्या बचत खात्याचा क्रमांक नमूद केला असल्याची अर्जदाराने खात्री केली पाहिजे.

(६) अर्जदाराकडे जर आधार क्रमांक असेल, तर अर्जदाराने त्याच्या स्वतःचा, पती / पत्नीचा आधार क्रमांक नमूद करावा. अर्जदाराकडे जर आधार क्रमांक नसेल, तर अर्जदाराला त्याची ओळख पटविण्यासाठी ओळखीचा इतर पुरावा दयावा लागेल.

(७) अज्ञान / अवलंबीत अपत्याबाबतची माहिती, जर ते कर्जदार असतील तरच भरण्यात यावी.

(८) अर्जामध्ये अर्जदाराच्या कुटुंबामधील फक्त तीन कर्जाची माहिती व दोन १८ वर्षांखालील कर्जदार अपत्यांची माहिती भरण्यासाठी जागा उपलब्ध आहे. जर अर्जदारास त्याच्या कुटुंबामध्ये तीन पेक्षा जास्त कर्जाची माहिती/ दोनपेक्षा जास्त १८ वर्षांखालील कर्जदार अपत्यांची माहिती भरावयाची असल्यास त्याने अशी माहिती भरण्यासाठी अतिरिक्त नमुना पृष्ठ/अर्जामध्ये माहिती भरुन मूळ अर्जासोबत जोडावे.

(९) सर्व अर्जदारांनी (योजनेचा फायदा घेवू इच्छिणा-या) याची नोंद घ्यावी की, त्यांनी त्यांचा आधार क्रमांक देणे व तो ऑनलाईन पोर्टलवर पुढील काळात अदयावत करणे आवश्यक आहे.

दुसरी बाजू


(१०) अर्जाची दुसरी बाजू अर्जदाराकडून त्याचे स्वत:चे व त्याच्या कुटुंबाच्या वतीने करावयाच्या विविध घोषणांबाबत आहे.

(११) अर्जावर अर्जदाराने स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

(१२) ऑनलाईन माहिती भरण्यापूर्वी अर्जदाराने छापील नमुन्यातील अर्जात सर्व माहिती भरुन तो आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह तयार ठेवला पाहिजे. जर अर्जदार आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत संगणकावर माहिती भरण्याचा पर्याय निवडणार असेल तर त्याने भरलेला छापील अर्जाचा नमुना व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

आपले सरकार सेवा केंद्रावरील कार्यपध्दतीचे वर्णन :-

  • अर्जदाराने भरलेल्या अर्जासोबत आधार कार्ड / EID, पंनकार्ड (असल्यास), बँक बचत खात्याचे पासबुक दि. २४.७.२०१७ नंतर नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर सादर करावे.
    * अर्ज स्विकारणा-या आपले सरकार केंद्राची यादी http://www.csmssy.in या संकेतस्थळावर दि. २४.७.२०१७ पासून उपलब्ध राहील.
  • आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटर/निर्देशित प्राधिकरण हे भरलेला अर्ज व त्या पुष्ठयर्थ कागदपत्रे सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजे पर्यंत स्विकारतील.
  • आपले सरकार सेवा केंद्रावर असलेले ऑपरेटर/निर्देशित प्राधिकरण यांचेकडून अर्ज व त्यासोबत जोडलेल्या छायांकीत प्रतींची पडताळणी केली जाईल. सदर केंद्राचे ऑपरेटर/निर्देशित प्राधिकरण अर्जामधील खालील बाबींची पडताळणी करतील.
    अ) अर्जदाराच्या अर्जामध्ये नमूद त्याचा स्वतःचा, पती/पत्नीचा व कुटुंबातील कर्ज घेतलेल्या १८ वर्षांखालील अपत्यांचा आधार क्रमांक. जर अर्जदाराकडे आधार क्रमांक नसेल तर त्याची ओळख पटविणारा इतर पुरावा.
    ब) सेवा केंद्राच्या ऑपरेटरने/निर्देशित प्राधिकरणाने अर्जामध्ये नमूद केलेला आधार क्रमांक व अर्जदाराने दिलेल्या आधार कार्डची मूळ प्रत/छायांकीत प्रत यामध्ये दिलेला आधार क्रमांक एकच आहे याची खातरजमा करावी.
    क) अर्जदाराने अर्जामध्ये नमूद केलेला बचत खाते क्रमांक अर्जदाराने दिलेल्या छायांकीत प्रतीशी पडताळून पहावा.
    ड) अर्जामध्ये पॅन कार्ड व पेन्शनच्या तपशीलासंबंधीची माहिती भरली असल्याबाबतची माहिती भरली असल्याबाबतची पडताळणी अर्जासोबत दिलेल्या छायाकिंत प्रतीवरून करावी.
  • अर्जामध्ये नमूद बंधनकारक असलेली माहिती भरली नसल्यास किंवा अशी बंधनकारक असलेली माहिती अर्जदाराने दिलेल्या संबधित छायांकित प्रतिषि जुळत नसल्यास अर्ज फेरसादर करण्याबाबत अर्जदारास सूचित करावे.
  • अर्जदाराचा परिपूर्ण भरलेला अर्ज आपले सरकार सेवा केंद्रावर प्राप्त झाल्यावर केंद्राच्या ऑपरेटर कडूंत / निर्देशित प्राधीकरणाकडून टोकन क्रमांक देण्यात येईल.
  • अर्ज परिपूर्ण असल्यास अर्जाचे संगणकीकरण व अर्जदार, पती/पत्नी व कुटुंबातील कर्ज घेतलेल्या इतर व्यक्ती यांचे आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करण्यासाठी केंद्राचे ऑपरेटर कडून अर्जदारास टोकन नंबर दिला जाईल. असा टोकन नंबर घेऊन अर्जदाराने केंद्राकडून कळविलेल्या दिवशी वेळेत उपस्थित रहावयाचे आहे. अर्जदारास सुनिश्चित वेळ कळविण्यासाठी खालील बाबींचा अवलंब करावा.
    अ) केंद्रावर अर्जदारांची गर्दी होऊ नये तसेच अर्जदाराचा प्रतिक्षाधीन कालावधी कमी व्हावा यासाठी केंद्राच्या ऑपरेटर यांनी एका दिवसासाठी शक्यतो ३० ते ४० टोकन वितरित करावेत.
    ब) अर्जदाराच्या अर्जाचे संगणकीकरण व अर्जदार, पती/ पत्नी व कुटुंबातील कर्ज घेतलेली १८ वर्षांखालील अपत्ये यांचे आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण, केंद्राचे ऑपरेटर यांनी शक्यतो अर्जदाराने टोकन सादर केलेल्या दिवशीच पुर्ण करावे.

 

स्रोत : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate