Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/22 05:57:5.377383 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / जिल्‍हा परिषदेच्‍या पशुसंवर्धन विभागाच्‍या योजना
शेअर करा

T3 2019/05/22 05:57:5.382188 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/22 05:57:5.406589 GMT+0530

जिल्‍हा परिषदेच्‍या पशुसंवर्धन विभागाच्‍या योजना

पशुसंवर्धन विभागामार्फत रा‍बविल्‍या जाणाऱ्या योजनांची माहिती.

पशुसंवर्धन विभागामार्फत रा‍बविल्‍या जाणाऱ्या योजनांची माहिती सन २०१७-१८ पुढीलप्रमाणे आहे.

विशेष घटक योजना (शासन अनुदान)

दुधाळ जनावरांपैकी भाकड जनावरांना खाद्यानुदान वाटप करण्‍यात येणार आहे. नवबौध्‍द/अनु. जातीच्‍या लाभार्थीकडील दुभत्‍या जनावरांपैकी भाकड जनावरांना १०० टक्‍के अनुदानावर पशुखाद्य पुरवठा करण्‍यात येणार आहे तसेच लाभार्थी अनु. जाती/ नवबौध्‍द असावा.

आवश्‍यक कागदपत्रे

विहीत नमुन्‍यातील लाभार्थींचा अर्ज, जातीचा / शाळा सोडल्‍याचा दाखला, ग्रामपंचायत शिफारसपत्र.

जिल्‍हा वार्षिक योजना सर्वसाधारण

विशेष पशुधन उत्‍पादन कार्यक्रम होणार असून अल्‍पभुधारक / अत्‍यल्‍पभुधारक तसेच भूमिहीन शेतमजुर लाभार्थी कडील संकरीत कालवडी वय ४ ते ४० महिन्‍यापर्यंत ५० टक्‍के अनुदानावर पशुखाद्य पुरविले जाते. लाभार्थी अल्‍पभुधारक/ अत्‍यल्‍पभुधारक किंवा भूमिहीन शेतमजुर असणे आवश्‍यक आहे.

आवश्‍यक कागदपत्रे

विहीत नमुन्‍यातील अर्ज, लाभार्थी अल्‍पभुधारक / अत्‍यल्‍पभुधारक किंवा भूमिहीन शेतमजुर असलेबाबत तलाठी यांचा दाखला, ७/१२ व ८ अ उतारा, ग्रामपंचायत शिफारसपत्र.

जिल्‍हा वार्षिक योजना सर्वसाधारण

एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमांतर्गत १ दिवसीय १०० पिले वाटप करण्‍यात येणार आतहे. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, भूमिहीन शेतमजुर, मागासवर्गीय, अल्‍प/ अत्‍यल्‍पभुधारक या प्राधान्‍यक्रमानुसार प्राप्‍त अर्जामधील पात्र लाभार्थींना १ दिवस व याचे १०० पक्ष्‍यांचा १ गट (५० टक्‍के अनुदानावर) दिला जातो. रुपये २ हजार पक्ष्‍यांची किंमत व रुपये ६ हजार खाद्य पुरवठा केला जाईल. दारिद्रय रेषेखालील भूमिहीन, शेतमजुर, अपंग, मागासवर्गीय, अत्‍यल्‍पभुधारक/ अल्‍पभुधारक यापैकी लाभार्थीस प्राधान्‍य व लाभार्थींने ५० टक्‍के लाभार्थी हिस्‍सा ८ हजार रुपये मधुन शेड, खाद्यभांडी, पाण्‍याची भांडी इ. साठी खर्च करावयाचा आहे.

आवश्‍यक कागदपत्रे

विहीत नमुन्‍यातील लाभार्थ्‍यांचा अर्ज, रेशन कार्ड सत्‍यप्रत, ओळखपत्र झेरॉक्‍स, अपत्‍य दाखला.

जिल्‍हा वार्षिक योजना सर्वसाधारण

वैरण विकास योजना १०० टक्‍के अनुदानावर शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उपलब्‍धतेकरीता वैरण बियाणे पुरवठा करणे. जनावरांसाठी उत्‍कृष्‍ठ प्रतीचा चारा पुरविण्‍यांसाठी १०० टक्‍के अनुदानावर वैरण बियाणांचा पुरवठा प्रति लाभार्थी रक्‍कम ६०० रुपये च्‍या मर्यादेत. जिल्‍ह्यातील कोणीही पशुपालक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

आवश्‍यक कागदपत्रे

वि‍हीत नमुन्‍यातील लाभार्थ्‍यांचा अर्ज, जमीन ७/१२ उतारा.

जिल्‍हा परिषद वाढीव उपकराव्‍यतिरिक्‍त अनुदान

१०० टक्‍के अनुदानावर सकस चारा नि‍र्मीतीकरीता अर्थसहाय्य दिले जाणार आहे. जनावरांसाठी उत्‍कृष्‍ट प्रतीचा चारा उत्‍पादनाकरीता प्रोत्‍साहन. प्रति १० गुंठे करीता ३ हजार ५०० रुपये व कमाल १ हेक्‍टर करीता ३५ हजार रुपये. कोणीही पशुपालक/ नोंदणीकृत दुग्‍ध व्‍यावसायीक संस्‍था/ बचत गट/ विकास संस्‍था या योजनेचा लाभ घेऊ शकतो. प्रथम चारा उत्पादित करणे आवश्‍यक आहे तसेच उत्पादित चारा पिकांची पडताळणी केल्‍यावर अनुदान दिले जाणार आहे.

आवश्‍यक कागदपत्रे

विहीत नमुन्‍यातील लाभार्थ्‍यांचा अर्ज, जमीन ७/१२ उतारा.

जिल्‍हा परिषद वाढीव उपकराव्‍यतिरिक्‍त अनुदान

७५ टक्‍के अनुदान शेळी गट पुरवठा केला जाणार आहे. दारिद्रय रेषेखालील व अल्‍प उत्‍पन्‍न गटातील लाभार्थींना ७५ टक्‍के अनुदानावर ५ शेळ्या व १सुधारीत जातीचा बोकड यांचा १ गट पुरवठा केला जाणार असून दारिद्रय रेषेखालील किंवा अल्‍प उत्‍पन्‍न गट दाखला आवश्‍यक आहे. योजना डिबीटीद्वारे राबविण्‍यात येत असल्‍याने लाभार्थीने प्रथम शेळी गट खरेदी करणे आवश्‍यक आहे.

आवश्‍यक कागदपत्रे

विहीत नमुन्‍यातील लाभार्थ्‍यांचा अर्ज, दारिद्रय रेषेचा दाखला किंवा अल्‍प उत्‍पन्‍नाचा दाखला (४० हजार रुपयचे आत), जि. प. सदस्‍याचे शिफारसपत्र ही कागदपत्रे आवश्‍यक आहेत.

जिल्‍हा परिषद वाढीव उपकराव्‍यतिरिक्‍त अनुदान

महिला सबलीकरणाकरिता ७५ टक्‍के अनुदान शेळी गट पुरवठा करणार असून दारिद्रय रेषेखालील व बचत गटातील महिला, विधवा व परित्‍यक्‍ता महिला लाभार्थीना ७५ टक्‍के अनुदानावर ५ शेळ्या व १ सुधारीत जातीचा बोकड यांचा १ गट पुरवठा करण्‍यात येणार आहे. दारिद्रयरेषेखालील किंवा बचत गटातील महिला, विधवा व परित्‍यक्‍ता महिला असणे आवश्‍यक आहे.

आवश्‍यक कागदपत्रे

विहीत नमुन्‍यातील लाभार्थ्‍यांचा अर्ज, दारिद्रय रेषेचा दाखला किंवा बचत गट सदस्‍यत्‍वाचा दाखला, जि. प. सदस्‍याचे शिफारस पत्र, विधवा व परित्‍यक्‍त्या महिला असलेबाबतचा ग्रामपंचायतीचा दाखला.

जिल्‍हा परिषद वाढीव उपकराव्‍यतिरिक्‍त अनुदान

अनुदान दुधाळ जनावरांचा पुरवठा केला जाईल. कोणत्‍याही बॅंकेकडील रक्‍कम रुपये १.०० लक्ष कर्जामधुन ०२ दुधाळ जनावरे देण्‍यात येतात. कर्जावरील व्‍याजाकरीता रक्कम ४० हजार रुपये अनुदान बॅंकेकडे वर्ग करण्‍यात येते. जिल्‍ह्यातील कोणीही पशुपालक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आवश्‍यक कागदपत्रे

विहीत नमुन्‍यातील लाभार्थ्‍यांचा अर्ज, ७/१२, ८ अ चा उतारा, जि. प. सदस्‍याचे शिफारसपत्र, लाभार्थीने कर्ज प्रकरण बॅकेकडुन मंजुर करुन घेणे आवश्‍यक आहे.

जिल्‍हा परिषद वाढीव उपकराव्‍यतिरिक्‍त अनुदान

९० टक्‍के अनुदानारावर फॅट मशीनचा पुरवठा केला जाणार आहे. नोंदणीकृत सहकारी दुग्‍ध संस्‍थांना ९० टक्‍के अनुदानावर स्वयंचलित फॅट मशिनचा पुरवठा करणे. कोणतीही सहकारी दुग्‍ध संस्‍था नोंदणीकृत असावी, संस्‍था सभासद संख्‍या कमीत कमी १० असावी, दैनंदिन दुग्‍ध संकलन किमान १००लिटर असावे, संस्‍थेने यापुर्वी अशा प्रकारच्‍या कोणत्‍याही शासकीय/ निमशासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा, स्‍व्‍हिशाची १० टक्‍के रक्‍कम निवड झालेवर रोखीने भरणा करणे आवश्‍यक आहे.

आवश्‍यक कागदपत्रे

विहीत नमुन्‍यातील मागणी अर्ज, अर्जासोबत जि. प. सदस्‍याचे शिफारसपत्र, सभासद व दुग्‍ध संकलन दाखला ही कागदपत्रे आवश्‍यक आहेत.

जिल्‍हा परिषद वाढीव उपकराव्‍यतिरिक्‍त अनुदान

महिला सबलीकरणकरिता ९० टक्‍के अनुदानावर सुधारित जातीच्‍या एक दिवसीय ५० कुक्‍कुट पिल्‍लांचा गट व पशुखाद्याचा पुरवठा केला जाईल. कोणत्‍याही प्रवर्गातील महिला, दारिद्रय रेषेखालील किंवा बचत गटातील महिलांना प्राधान्‍य दिले जाईल.

आवश्‍यक कागदपत्रे

विहीत नमुन्‍यातील लाभार्थ्‍यांचा अर्ज, दारिद्रय रेषेचा दाखला किंवा महिला बचत गट सदस्‍यत्‍वाचा दाखला, जि. प. सदस्‍याचे शिफारसपत्र.

जिल्‍हा परिषद वाढीव उपकराव्‍यतिरिक्‍त अनुदान

अंड्यावरील कुक्‍कुटपालन व्‍यावसायास चालना देण्‍यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. कोणत्‍याही बॅंकेकडील रक्‍कम रुपये १.०० लक्ष कर्जामधून ३०० अंड्यावरील पक्षी संगोपनकरीता बॅंक प्रकरणाद्वारे व्‍यवसाय करणे आवश्‍यक आहे त्‍यापैकी कर्जावरील व्‍याजाकरीता रक्‍कम २० हजार रुपये अनुदान बॅंकेकडे वर्ग करण्‍यात येते. जिल्‍ह्यातील कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

आवश्‍यक कागदपत्रे

विहीत नमुन्‍यातील लाभार्थ्‍यांचा अर्ज, ७/१२, ८ अ चा उतारा, जि. प. सदस्‍याचे शिफारसपत्र, लाभार्थींने कर्ज प्रकरण बॅंकेकडून मंजूर करुन घेणे आवश्‍यक आहे.

माहिती स्रोत: महान्युज

2.93548387097
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Related Languages

T5 2019/05/22 05:57:5.781396 GMT+0530

T24 2019/05/22 05:57:5.788015 GMT+0530
Back to top

T12019/05/22 05:57:5.248033 GMT+0530

T612019/05/22 05:57:5.266286 GMT+0530

T622019/05/22 05:57:5.366344 GMT+0530

T632019/05/22 05:57:5.367333 GMT+0530