Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/20 00:41:18.750635 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
शेअर करा

T3 2019/06/20 00:41:18.755140 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/20 00:41:18.779704 GMT+0530

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविण्यात असलेली अनुसूचित जाती उपयोजना.

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविण्यात असलेली अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता एकच राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सध्याची प्रचलीत विशेष घटक योजना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना' या नावाने राबविण्यास शासनाने 27 एप्रिल 2016 च्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.

या योजनेमध्ये सन 2017-18 या वर्षात घटकनिहाय अनुदान मर्यादा याप्रमाणे-

• नवीन विहीरीसाठी उच्चतम अनुदान मर्यादा- अडीच लक्ष रुपये.

• जुनी विहीर दुरुस्तीसाठी- 50 हजार रुपये,

• इनवेल बोअरींगसाठी- 20 हजार रुपये,

• पंप संच- 25 हजार रुपये,

• वीज जोडणी आकार- 10 हजार रुपये,

• शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण- एक लक्ष रुपये

सूक्ष्म सिंचन- मंत्रीमंडळ उपसमितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार.

या योजनेंतर्गत वरील बाबी असून लाभ पॅकेज स्वरुपात द्यावयाचा आहे.

लाभार्थी पात्रतेच्या अटी

लाभार्थी हा अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत:च्या नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे. लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व ते बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य. दारिद्र्यरेषेखालील नसलेले अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तेच लाभार्थी लाभ घेण्यास पात्र राहतील. दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल)यादीत अंतर्भूत शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पनाच्या मर्यादेची अट राहणार नाही. परंतु ज्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या मर्यादेत आहे, अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार यांच्याकडून सन 2016-17 चा उत्पन्नाचा अद्ययावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज, प्रस्ताव गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करुन अर्जाची मूळ प्रत आवश्यक त्या कागदपत्रासह कृषी अधिकारी (वि.घ.यो.) यांच्याकडे स्व:हस्ते जमा करावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी (वि.घ.यो.) पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा.

संकलन-जिल्हा माहिती कार्यालय, रायगड.

माहिती स्रोत: महान्युज

3.22641509434
सागर भानसे Jun 04, 2019 02:41 PM

बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या वर्षी केव्हा चालू होणार आहे.

प्रदीप टेम्भुर्णे Apr 12, 2019 07:12 PM

सन 2019 /20 मधील अर्ज कधी चालू होत आहेत.

Samrat salave Mar 25, 2019 05:46 PM

Can be effect on model code of conduct on already established this scheme.

Priyanka dilip shikhare Mar 01, 2019 11:06 PM

Very nice

नागेश घोडके Feb 21, 2019 06:49 AM

सण 2019/20 मधील अर्ज कधी पासून चालू होणार आहेत

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/20 00:41:19.160585 GMT+0530

T24 2019/06/20 00:41:19.166499 GMT+0530
Back to top

T12019/06/20 00:41:18.649638 GMT+0530

T612019/06/20 00:41:18.668796 GMT+0530

T622019/06/20 00:41:18.740468 GMT+0530

T632019/06/20 00:41:18.741231 GMT+0530