Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/22 06:33:48.797350 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / पंतप्रधान विशेष पॅकेज योजना
शेअर करा

T3 2019/05/22 06:33:48.802263 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/22 06:33:48.826761 GMT+0530

पंतप्रधान विशेष पॅकेज योजना

भारत सरकारने विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी शेतीसोबत पर्यायी आर्थिक सहाय्यासाठी विशेष पॅकेज सन २००६-०७ पासून तीन वर्षाकरीतामंजूर केले आहे.

मा. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत विदर्भातील आत्महत्याग्रस्तसहा जिल्हयासाठी योजना

भारत सरकारने विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी शेतीसोबत पर्यायी आर्थिक सहाय्यासाठी विशेष पॅकेज सन २००६-०७ पासून तीन वर्षाकरीतामंजूर केले असून त्यामध्ये पशुसंवर्धन विषयक खालील बाबी विशेषत : दुध उत्पादन वाढीसाठी अनुदानावर योजना दि. ३०.८.२००६चे शासन निर्णयानुसार मंजूर केली आहे.
दुधाळ जनावरे खरेदी :- मा. पंतप्रधान विशेष पॅकेज योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त सहा जिल्हयातील ( अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम व वर्धा) अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्रती जिल्हा एक हजार दुधाळ जनावरे प्रती वर्ष वाटप करून दुग्धज्ञ्पादनाचा व्यवसाय करण्यासाठी ५०% अनुदानावर शेतकऱ्यांना दोन दुधाळ जनावरे खरेदीचे प्रावधान सदर योजनेत आहे. सदरील योजना आत्महत्याग्रस्त जिल्हयात तीन वर्षाकरीताराबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना गाई सोबत एक महिन्यापर्यंतचे वासरू खरेदी करणे बंधनकारक आहे. ही योजना बँके मार्फत राबविण्याचेही प्रावधान आहे. दुधाळ जनावरे खरेदी करीताजिल्हा स्तरावर समितीगठीत केली आहे.
सदर योजनेसाठी सन २००६-२००७ ते २००९-१० मध्ये दुधाळ जनावरे खरेदीसाठी भारत सरकारकडून रु.२७०० लक्ष्य तरतूद मंजुर होती. त यापैकी रु. २७२४.६६ लक्ष्य प्राप्त झाली. यापैकी रु. २४२०.५३ लक्ष्य दुधाळ जनावरे खरेदी साठी आत्महत्याग्रस्त या सहा जिल्हयातील (अमरावती / अकोला / वाशिम / बुलढाणा /यवत माळ/ वर्धा ) ११८३४ शेतकऱ्यांना २०४८३ दुधाळ जनावरे संबधित जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत खरेदी करण्यात आली. त्या करिता रु. २४२०.५३ लक्ष्य खर्च झाले आहे. तसेच या योजनेखाली सहा जिल्हयातील ४९३३ शेतकऱ्यांना रू २३९.५५लक्ष्य ५०% अनुदान शेड बांधण्याकरीता वाटप करण्यात आले आहे.

वासरांचे संगोपन कार्यक्रम

सदर योजनेत मादीवासरांना संगोपनासाठी ५०% अनुदानावर प्रती वासरू वीस रूपये प्रती दिन दुध पशुखाद्य व औषधोपचार या बाबीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येते .
या योजनेसाठी सन २००६-२००७ व २००९-१० मध्ये रु.६५७.०० लक्ष्य तरतूद मंजुर होतीत्यापैकी रु.६३२.३४ तरतूद प्राप्त झाली. यापैकी रु. ५३५.४५ लक्ष्य पि. एम. पॅकज अज्ञंर्गत खरेदी झालेल्या दुधाळ जनावरांच्या मादी वासरांना ५०% अनुदानावर संगोपनासाठी रु. २०/- प्रतीवासरु प्रतीदिन प्रमाणे एक वर्षाकरिताअनुदान द्यावयाचे आहे. सन २००६-२००७ते २००९-१०मध्ये ११५३९वासरांना रु.५३५.४५लक्ष्य संगोपनासाठी अनुदान वाटप करण्यात आले आहे.

गाई म्हशीमध्ये प्रजनन सेवा सुविधा पुरविणे

आत्महत्याग्रस्त सहा जिल्हयातील सर्व प्रजननसक्षम जनावरांना मोफत प्रजनन सेवा शेतकऱ्याच्या दारात पुरविणे या योजनेत अंतर्भुत आहे. सदर जिल्हयातील ७०% प्रजननसक्षम जनावरांना कृत्रिम रेतनाचे सुविधा पुरविणे आवश्यक आहे. आत्महत्याग्रस्त सहा जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार पशुवैद्यक यांचेकडून शासनाच्या सुचनेनुसार मानधन देवून दुधाळ जनावरांना कृत्रिम रेतन कार्य करण्यात येते. निवड केलेल्या सुशिक्षित बेरोजगार पशुवैद्यकांना प्रती संकरित वासरांच्या जन्माला रु. ४५० रुपये खर्च करण्यात येतो (तीन कृत्रिम रेतनापर्यंत )
सदर योजनेत रु.१४६३.३१लक्ष्य तरतूद केंद्र शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी रु.१३७३.१५लक्ष्य खर्च झालेला आहे. सदर योजनेतून ४५०८००लाभार्थ्याना लाभ देण्यात आलेला आहे.

दुधाळ जनावरांना पशुखाद्य पुरवठा

सदर योजनेसाठी सन २००६-२००७ते २००९-१०मध्ये रु. ९७५.००लक्ष्य तरतूद उपलब्ध झाली आहे. त यापैकी रु.९७५.०० लक्ष्य तरतूद खर्च झालेली आहे. या योजनेत पि.एम पॅकेजमध्ये खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांना रु. २५ /- प्रती दिन (अंदाजे २.५ ते ३ किलो पशुखाद्य ) प्रमाणे एक वर्षाकरिता मिल्क रेशन ग्रेड-१ खाद्य पुरवठा करावयाचा आहे. सन २००७-२००८ ते २००९-१०मध्ये वाटप केलेल्या २०४८३दुधाळ जनावरांकरिता११३६५.८१५ मे. टन खाद्य पुरवठा करण्यात आलेला आहे. खाद्य पुरवठा आदेश आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांनी भावबंदीत केलेली संस्था महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांना देण्यात आले आहे.

फॉडर ब्लॉक्स मेंकींग युनिट

या योजनेत सन २००६-२००७ते २००९-१०साठी रु. ८५लक्ष्य तरतूद उपलब्ध होती, ती तरतूद फॉडर ब्लॉक्स मेंकींगयुनिट स्थापनेसाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुबंई व पोषक ऍग्रीव्हेट अमरावती, या संस्थाना प्रत्येकी रु. ४२.५०लक्ष्य प्रमाणे अशे एकूण रु. ८५.००लक्ष्य देण्यात आले होते .

दुधाळ जनावरांना आरोग्य सुविधा


सदर योजनेअंतर्गत पि.एम. पॅकेज अंतर्गत खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांना रू ३००/- प्रती जनावराच्या आरोग्य सुविधेवर खर्च करावयाचा आहे. त्या करीता मार्च २००८ अखेर आत्महत्याग्रस्त सहा जिल्हयातील दुधाळ जनावरांना आरोग्य सुविधेकरीता आवश्यक औषधी खरेदी करून जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन यांचे कडे देण्यात आली आहे. सदर योजनेवर रू ३६.०० लक्ष्य तरतूदप्राप्त होती. रू ३६.०० लक्ष्य खर्च झाले आहेत.

 

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

3.1
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/22 06:33:49.208537 GMT+0530

T24 2019/05/22 06:33:49.215355 GMT+0530
Back to top

T12019/05/22 06:33:48.692229 GMT+0530

T612019/05/22 06:33:48.709813 GMT+0530

T622019/05/22 06:33:48.787021 GMT+0530

T632019/05/22 06:33:48.787820 GMT+0530