Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:29:17.449853 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / प्रधानमंत्री पीक विमा योजना : ३ हजारात मिळणार ६० हजाराचे विमा संरक्षण
शेअर करा

T3 2019/10/14 06:29:17.454787 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:29:17.481812 GMT+0530

प्रधानमंत्री पीक विमा योजना : ३ हजारात मिळणार ६० हजाराचे विमा संरक्षण

प्रधानमंत्री पीक विमा योजना : ३ हजारात मिळणार ६० हजाराचे विमा संरक्षण या विषयक माहिती.

प्रधानमंत्री पीक विमा योजना : ३ हजारात मिळणार ६० हजाराचे विमा संरक्षण

शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकविलेल्या मालाचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीत त्याला ठराविक रक्कम मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रब्बी हंगामात ज्वारी (बागायत), ज्वारी (जिराईत), गहू (बागायत), हरभरा, उन्हाळी भुईमुग, कांदा आदि पिकांचा समावेश आहे. सन २०१७-१८ च्या रब्बी हंगामात या योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी यो योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत १ जानेवारी २०१८ पर्यंत आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

योजनेची वैशिष्ट्ये -

नैसर्गिक आग, वीज कोसळणे, पूर, चक्री वादळ, भूस्खलन, गारपीट, पावसातील खंड, कीड व रोग या आपत्तीमुळे होणारे नुकसान या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

नुकसान भरपाई कृषि आयुक्तालयामार्फत पीक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेतलेले पिक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल.

जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.

उभ्या पिकांबरोबरच काढणी झालेल्या पिकांसाठी सर्वसामान्य काढणी/कापणी झाल्यानंतर अधिसुचित पिकांचे नुकसान झाल्यास जास्तीत जास्त 15 दिवस नुकसान भरपाईस पात्र राहील.

विमा हप्ता दर व विमा संरक्षित रक्कम -

या योजनेमध्ये प्रती हेक्टरी विमा हप्ता दर व विमा सरंक्षण निश्चित करण्यात आले आहे ते यानुसार आहे. रब्बी ज्वारी (बागायत) 130 रुपयात 26 हजार रुपयांचे विमा संरक्षण, ज्वारी (जिराईत) 360 रुपयात 24 हजार रुपयांचे विमा संरक्षण, गहू (बागायत) 495 रुपयात 33 हजार रुपयांचे विमा संरक्षण, हरभरा 360 रुपयात 24 हजार रुपये, उन्हाळी भुईमुग 184 रुपयात 36 हजार रुपयांचे तर कांदा पीकासाठी 3 हजार रुपयात 60 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.

योजनेच्या अधिक माहिती व संपर्कासाठी –

आपल्या तालुक्यातील नजिकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँका, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

माहिती स्रोत: महान्युज

2.94444444444
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:29:17.866137 GMT+0530

T24 2019/10/14 06:29:17.872671 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:29:17.316996 GMT+0530

T612019/10/14 06:29:17.336409 GMT+0530

T622019/10/14 06:29:17.438018 GMT+0530

T632019/10/14 06:29:17.439011 GMT+0530