অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ

प्रस्तावना

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाची स्थापना महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक सीडीएस-१०/२००१(पीके-५९) एडीएफ-४ मुंबई-३२ दि. २.४.२००२

मुख्यालय - अकोला, शिबीर कार्यालय पुणे व नागपूर

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाची स्थापना केंद्ग शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे व महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक सीडीएस-१०/२००१(पीके-५९) एडीएफ-४ मुंबई-३२ दि. २.४.२००२ अन्वये करण्यांत आली. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय सर्व प्रथम पुणे येथे मुख्यालयी स्थापन करण्यांत आले. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक सीडीएम-१०/२००१ (पीके-५९)पदुम-४ मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक ७.६.२००३ अन्वये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यालय (मुख्यालय) हे अकोला येथे दिनांक १२.९.२००३ रोजी स्थलांतरीत करण्यांत आले.सुरवातीला केंद्र सरकारने रु.१७.२० कोटी रक्कम मंजूर केली पैकी रु. ८.६० कोटी पहिला हप्ता म्हणून सन २००५-०६ मध्ये प्रकल्प (एन.पी. सी. बी बी अंतर्गत) राबवण्यासाठी पत्र. क्र ३-२२/२००३ -ए.एच.टी.(एन.पी. सी. बी बी) भारत सरकार,कृषी मंत्रालय, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय,कृषी भवन, नवी दिल्ली,दिनांक २६-९-२००३ ) प्रदान करण्यात आले.

    उदिष्टे

    • राज्यात पशुपैदासाच्या सुनिश्चित केलेल्या धोरणानुसार कृत्रिम रेतनाद्वारे संकरीत/सुधारीत पशुपैदासीचा कार्यक्रम राबविणे तसेच राज्यातील कृत्रिम रेतनाचे जिल्हानिहाय लक्ष्य ठरविणे व त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा व सनियंत्रण करणे.
    • राज्यात उपलब्ध करून दिल्या जाणा-या कृत्रिम रेतनाच्या सेवा आणि गोठीत रेतमात्रांच्या दर्जा उत्तम व विहीत मानकानुसार राहील यावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवणे. राज्यात क्षेत्रीय पैदास चाचणी कार्यक्रम राबवून सिद्ध वळूंची निश्चिती करणे.
    • राष्ट्रीय गुरे व महिष पैदास प्रकल्प योजना राबविणे.
    • शासन कृषि ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या राष्ट्रीय पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम आणि स्वर्णजयंती ग्रामस्वयंरोजगार योजना यांचा राष्ट्रीय गुरे व महिष पैदास प्रकल्प योजनाची अंमलबजावणी करतांना योग्य समन्वय ठेवणे.
    • दुग्धव्यवसाय विभाग, स्वयंसेवा संस्था, सहकारी दुध संघ, पशुपैदासकाराच्या संघटना आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचेशी समन्वय ठेवून त्यांचा सक्रिय सहभाग मिळविणे. पशुपालकांना व व्यावसायिकांना प्रशिक्षण. वंध्यत्व तपासणी शिबिरांचे आयोजन. सेवा व उपब्धतेबाबत च्या बाबतीत काटेकोर गुणनियंत्रणा बाबत अंमलबजावणी करणे.

    मंडळा अंतर्गत संस्था

    • गोठीत रेत प्रयोगशाळा : पुणे, औरंगाबाद, नागपूर (एकुण-३)
    • वळू प्रक्षेत्रे : औरंगाबाद, नागपूर (एकुण-२)
    • वळू माता प्रक्षेत्रे : जत, जुनोनी, ताथवडे, हिंगोली, कोपरगांव, पोहरा, वडसा (एकुण-७)
    • स्त्रोत राज्य सरकार कडून प्राप्त योजना व योजनेतर आस्थापना निधी .
    • भारत सरकारकडून प्राप्त निधी.
    • रेतमात्रा व द्रवनत्र विक्रीतून पशुसंवर्धन विभागास प्राप्त महसुली जमा.
    • उच्च वंशावळीचे वळू व वळूमाता उत्पादनानंतर उर्वरित अतिरिक्त पशुधन व पशुजन्य उत्पादने विक्रीतून प्राप्त महसुली जमा.

    महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाची कर्तव्ये व जबाबदा-या

    • राज्यात पशुपैदासाच्या सुनिश्चित केलेल्या धोरणानुसार कृत्रिम रेतनाद्वारे संकरीत/सुधारीत पशुपैदासीचा कार्यक्रम राबविणे तसेच राज्यातील कृत्रिम रेतनाचे जिल्हानिहाय लय ठरविणे व तयांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा व सनियंत्रण करणे. राज्यात उपलब्ध करून दिल्या जाणा-या कृत्रिम रेतनाच्या सेवा आणि गोठीत रेतमात्रांच्या दर्जा उत्तम व विहीत मानकानुसार राहील यावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवणे. राज्यात क्षेत्रीय पैदास चाचणी कार्यक्रम राबवून सिध्द वळूंची निश्चिती करणे.
    • राष्ट्रीय गुरे व महिष पैदास प्रकल्प योजना राबविणे.
    • शासन कृषि ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या राष्ट्रीय पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम आणि स्वर्णजयंती ग्रामस्वयंरोजगार योजना यांचा राष्ट्रीय गुरे व महिष पैदास प्रकल्प योजनाची अंमलबजावणी करतांना योग्य समन्वय ठेवणे.
    • दुग्धव्यवसाय विभाग, स्वयंसेवा संस्था, सहकारी दुध संघ, पशुपैदासकाराच्या संघटना आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचेशी समन्वय ठेवून त्यांचा सक्रिय सहभाग मिळविणे.

 

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate