অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM)

राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM)

पशुधन उत्पादन प्रणालीमधे संख्यात्मक आणि गुणात्मक सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी आणि सर्व हितसंबंधी लोकांची क्षमता विकसित करण्यासाठी 2014-15 च्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission - NLM) सुरू करण्यात आले.

अभियानाची उद्दिष्टे

  1. कुक्कुटपालनासहित पशुधन क्षेत्रात शाश्वत वाढ आणि विकास
  2. मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी पशुखाद्याची उपलब्धता वाढवणे - ज्यामधे दर्जेदार चा-याचे बियाणे देणारे क्षेत्र वाढवणे, तंत्रज्ञानाचा प्रसार, विस्तार, कापणीनंतरचे व्यवस्थापन आणि विविध कृषी - हवामान स्थितीसह सुसंगत प्रक्रिया यांचा समावेश होतो.
  3. दर्जेदार चारा आणि चा-याच्या बियाण्यांच्या उत्पादनाच्या साखळीच्या (केंद्रक - प्रजनन करणारा – स्थापना – प्रमाणित – लेबलची यथार्थता इत्यादी.) माध्यमातून तसेच शेतक-यांच्या सक्रिय सहभागासह, दुग्ध / शेतकरी सहकारी संस्था, बियाणे कंपन्या आणि खाजगी क्षेत्रातील उद्योग यांच्या सहकार्याने उत्पादनाचा वेग वाढवणे.
  4. शाश्वत पशुधन विकास तसेच सध्या सुरू असलेले योजना कार्यक्रम आणि हितधारकांच्या आपापसांतील प्रयत्नांचे एकत्रीकरण आणि समन्वय प्रस्थापित करणे.
  5. पशूंचे पोषण आणि पशुधन उत्पादनातील प्राधान्य असलेल्या आव्हानात्मक बाबींच्या संशोधनावर भर देणे.
  6. राज्यातील सरकारी संस्था आणि पशुधनाची मालकी असणा-यांची क्षमता विस्तारित यंत्रणेच्या माध्यमातून विकसित करणे ज्याद्वारे शेतक-यांना दर्जेदार विस्तारित सेवा प्रदान केली जाईल.
  7. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि पशुधन क्षेत्रातील उत्पादन सुधारण्यासाठी, कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाचा आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.
  8. शेतकरी/शेतकरी समूह/सहकारी संस्था इत्यादींच्या सहकार्याने पशुधनाच्या संवर्धनासाठी पुढाकार आणि पशुधनाच्या देशी जातींमधे आनुवांशिक सुधारणांचा प्रसार करणे. (मंत्रालयाच्या इतर योजने अंतर्गत येणा-या गोवंशीय प्राणी वगळून)
  9. शेतकरी गट, लहान तसेच मध्यम शेतकरी/पशुधनाची मालकी असणारे यांच्या सहकारी संस्थेच्या/ उत्पादक कंपन्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे.
  10. पशुधन क्षेत्राशी संबंधित असलेले नाविन्यपूर्ण मार्गदर्शक उपक्रम आणि मुख्य प्रवाहातील यशस्वी मार्गदर्शक उपक्रमांना प्रोत्साहन देणे.
  11. विपणन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यासाठी शेतक-यांच्या उद्योगांना पायाभूत सुविधा आणि पुढील दुवे प्रदान करणे.
  12. शेतक-यांसाठी पशुधन विम्याचा समावेश असलेल्या जोखीम व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे.
  13. पशूंच्या रोगांचे आणि पर्यावरणाच्या प्रदूषणाचे नियंत्रण आणि प्रतिबंध करण्यासाठीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे. अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आणि मृत जनावरांच्या शरीरातून वेळच्या वेळी मिळवलेल्या गुणवत्तापूर्ण कातडीचा पुरवठा करणे.
  14. पशुसंवर्धनाशी संबंधित शाश्वत पध्दतींसाठी, प्रजातीच्या संवर्धनासाठी आणि राज्यातील स्त्रोतांच्या नकाशाच्या निर्मितीसाठी समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे.

मिशनचा आराखडा

पशुधन उत्पादन प्रणालीमधे संख्यात्मक आणि गुणात्मक सुधारणा सुनिश्चित करण्यास आणि सर्व हितधारकांची क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपक्रमांचा समावेश या अभियानाच्या आराखड्यात करण्यात आला आहे. ह्या आराखड्यात पशुधनाचे उत्पादन सुधारणा-या आणि या विषयाशी सुसंगत असलेल्या उपक्रमांना (जर शासनाच्या विभागाकडून इतर केंद्रीय प्रायोजित योजनेद्वारे निधी उपलब्ध होत नसल्यास) हे अभियान सहाय्य करेल.

या अभियानाचे पुढील 4 उप अभियानात विभाजन करण्यात आले आहेः

  1. पशुधन विकासाचे उप अभियान- या उप अभियानात गुरे ढोरे आणि म्हशींव्यतिरिक्त इतर पशुधन प्रजातींच्या (कुक्कुटपालनासह)  समस्या सोडवण्यासाठी आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी केल्या जाणा-या उपक्रमांचा समावेश होतो. मात्र उप अभियानातील जोखीम व्यवस्थापन घटकात इतर मुख्य आणि लहान पशुधनाबरोबरच गुरेढोरे आणि म्हशींचा देखील समावेश होतो.
  2. ईशान्य क्षेत्रामधील डुकरांच्या विकासाचे उप अभियान- ईशान्य क्षेत्रात डुकरांशी संबंधित सर्वांगीण विकास करणे, संशोधन आणि विकास संस्थांशी योग्य प्रकारे संपर्क ठेवून त्यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे. ज्यामधे डुकरांमधील आनुवांशिक सुधारणा, आरोग्य विमा संरक्षण आणि कापणी नंतरच्या क्रिया यांचा समावेश असेल.
  3. अन्न आणि चारा विकासाचे उप अभियान- जनावरांच्या चारा आणि खाद्य स्त्रोताच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, भारतात पशुधन क्षेत्र हा एक स्पर्धात्मक उद्योग बनवण्यास प्रोत्साहन देण्याकरिता, त्यातील निर्यात क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठी या अभियानाचा आराखडा तयार केला गेला आहे. हे उप अभियान विशेष करून कृषी योग्य असलेल्या आणि नसलेल्या भागातील विशिष्ट कृषी-हवामानाच्या प्रदेशाला उपयुक्त अशा सुधारित आणि योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करून चा-याचे उत्पादन आणि त्याची उत्पादकता वाढवण्यावर भर देईल.
  4. कौशल्य विकास, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि विस्ताराचे उप अभियान- हे उप अभियान तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, त्याचा स्वीकार करण्यासाठी आणि त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. यामधे शेतकरी, संशोधक आणि एक्सटेन्शन वर्कर्स इत्यादींच्या सहकार्याने होणा-या प्रमुख क्षेत्रातील प्रात्यक्षिकांचा समावेश होतो, जिथे सद्य स्थितीतील व्यवस्थेच्या माध्यमातून हे साध्य करणे शक्य होत नाही.

 

अधिक माहितीसाठीः राष्टीय पशुधन अभियान मार्गदर्शक सूचना: National Livestock Mission Operational Guidelines

स्त्रोतः पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, भारत सरकार Department of Animal Husbandry and Dairying

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate