অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पशुधन - केंद्र पुरस्कृत योजना

राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना

मंगळवार, 14 जुलै 2015 07:28 शेवटचा बदल केलेला दिनांक गुरुवार, 16 जुलै 2015 05:47
अ.क्र.योजनेचे नांवप्रकल्प स्वरुप बाबनिहायप्रकल्प किंमत ( रुपये )अनुदानाचे ( टक्के )योजना अंमलबजावणी अधिकारीलाभधारक निवडीचे अधिकार
१. वैरण बियाणे उत्पादन, संकलन व वितरण योजना वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी ज्वारी/मका/बाजरी/बरसिम/ लुसर्ण इ. वैरण पिकांच्या सुधारीत प्रजातीच्या प्रमाणित बियाणांचे उत्पादन घेऊन पशुपालकांना वितरीत करणे -- ७५ टक्के केंद्र शासनाचे अनुदान जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती
२. वनक्षेत्र नसलेल्या नापिक जमिनी / गायरान जमिनी / गवती कुरण क्षेत्र व पडीक जमिनी क्षेत्रातून वैरण उत्पादन करणे हलक्या नापिक / पडीक / गायरान / गवती कुरण क्षेत्र जमिनी विकसित करुन त्यावर योग्य प्रकारच्या एकदल व द्विदल बहुवार्षिक वैरण पिकांची व गवतांची लागवड करुन वैरणीचे उत्पादन घेणे रु. ३०,०००/- ते रु. १,००,०००/- जमिनीच्या प्रकारानुसार ७५ टक्के केंद्र शासनाचे अनुदान जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती
३. हस्तचलीत कडबा कुट्टी यंत्रासाठी प्रोत्साहन भारतीय मानक प्रमाणकानुसार असलेल्या हस्तचलित कडबाकुट्टी यंत्राचे वितरण रु. ५,०००/- प्रति युनिट ७५ टक्के, रु. ३,७५०/- पर्यंतच्या मर्यादेत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती
४. विद्युतचलीत कडबा कुट्टी यंत्रासाठी प्रोत्साहन भारतीय मानक प्रमाणकानुसार असलेल्या विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्राचे वितरण रु. २०,०००/- प्रति युनिट ५० टक्के रु. १०,०००/- पर्यंतच्या मर्यादेत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती
५. मुरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करणे वर्षा ऋतुत अतिरीक्त हिरवी वैरण उत्पादित करुन, मुरघासमध्ये रुपांतरीत करण्याकरीता अनुदान रु. ५०,०००/- ते रु. १,००,०००/- क्षमतेनुसार ७५ टक्के केंद्र शासनाचे अनुदान जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती
६. उच्च क्षमतेच्या वैरणीच्या विटा तयार करण्याचे युनिट स्थापन करणे कृषि पिकांच्या दुय्यम उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैरणीच्या विटामध्ये रुपांतर करणे, अशा वैरणीच्या विटा टंचाई, अतिवृष्टी इत्यादी नैसर्गिक आपत्तीमध्ये उपयोगात आणण्याकरीता राखीव साठा तयार करणे यासाठी अनुदान रु. १५०.०० लक्ष प्रति युनिट ५० टक्के केंद्र शासनाचे अनुदान (अधिकतम मर्यादा रु. ७५ लक्ष प्रति युनिट) जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती
७. लघु क्षमतेचे ट्रॅक्टरला जोडता येणारे वैरणीच्या विटा तयार करण्याचे युनिट / गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन / वैरण कापणी यंत्राचे वितरण कृषि पिकांच्या दुय्यम उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैरणीच्या विटामध्ये रुपांतर करणे, अशा वैरणीच्या विटा टंचाई, अतिवृष्टी इत्यादी नैसर्गिक आपत्तीमध्ये उपयोगात आणण्याकरीता राखीव साठा तयार करणे यासाठी अनुदान रु. २०.०० लक्ष प्रति युनिट ५० टक्के केंद्र शासनाचे अनुदान (अधिकतम मर्यादा रु. १० लक्ष प्रति युनिट) जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती
८. क्षेत्रनिहाय विवक्षित प्रभागानुसार क्षारमिश्रण, पशुखाद्य कांडी व पशुखाद्य निर्मिती केंद्राची स्थापना पशुखाद्य व विवक्षित भागातील क्षारांच्या कमतरतेनुसार त्या भागात आवश्यक घटकद्रव्यांसह क्षारमिश्रणाचे उत्पादन करण्यासाठी अनुदान -- २५ टक्के केंद्र शासनाचे अनुदान (अधिकतम मर्यादा रु. २०० लक्ष प्रति युनिट) जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती
९. बायपास प्रोटीन उत्पादन केंद्राची स्थापना उच्च दुध उत्पादन देणाऱ्या दुधाळ गाई / म्हशींच्या पोषणासाठी उत्तम दर्जाचे खाद्य घटक वापरुन या खाद्याचे पोषणमुल्य वाढविण्याबरोबरच ते पशुधनाच्या आहारासाठी पुरेपुर उपयोगात आणणे याकरीता अनुदान -- २५ टक्के केंद्र शासनाचे अनुदान (अधिकतम मर्यादा रु. २०० लक्ष प्रति युनिट) जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती
१०. परसातील कुक्कुट पालनास चालना देणे. मागास जिल्हयातील दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानाने ४ आठवडे वयाचे ३ टप्प्यात ४५ पक्षी पुरविणे व निवा-यासाठी रु. १,५००/-प्रती लाभधारक अनुदान देणे. एका मदर युनिटमध्ये ३९३ लाभार्थी. मदर युनिट धारकास रु. ५०/- प्रति पक्षी पुरवठयानंतर रु. ६०,०००/- अनुदान. १०० टक्के जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुधन अभियान समिती

 

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 7/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate