Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 09:49:52.167403 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / शेतकरी - अपघात विमा योजना
शेअर करा

T3 2019/05/20 09:49:52.171976 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 09:49:52.196827 GMT+0530

शेतकरी - अपघात विमा योजना

शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते.

प्रस्तावना

शेतात कष्टाने कामे करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. घराचे अर्थकारण शेतकऱ्यावरच अवलंबून असल्याने समस्या अधिक गंभीर बनते. या संकटातून सावरण्यासाठी आणि त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते.

विमा संरक्षणासाठी समाविष्ट असलेली कारणे

शेती व्यवसाय करतांना, नैसर्गिक आपत्ती, विज पडणे, पुर यासोबतच विजेचा झटका बसणे, सर्पदंश, विंचुदंश, रस्त्यावरील वाहन अपघात, जनावरांने चावल्याने किंवा हल्ला केल्याने, खून झाल्यास, दंगलीत मृत्यू झाल्यास तसेच अन्य कोणत्याही अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ या अपघात विमा योजनेअंतर्गत देण्यात येतो. परंतू विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंधन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, भ्रमिष्टपणा, बांळतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून झाल्यास या कारणास्तव विमा संरक्षण लागू होत नाही.

विमा दावा करण्यासाठी आवश्यक घटक आणि कागदपत्रे

महसूल नोंदीनुसार 7/ 12 उताऱ्यावर नावाचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील सर्व महिला किंवा पुरुष शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे. शेतकऱ्यांच्या वतीने विमा हप्त्याची रक्कम शासन विमा कंपनीस अदा करत असते. योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी अपघातात अपंगत्व आल्यास शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनी विहीत नमुन्यातील दाव्यासाठीचा अर्ज सादर करणे आवश्यक असते. अर्जासोबत शेतकरी म्हणून अपघातग्रस्ताच्या नावाचा समावेश असलेला 7/12 उतारा, ज्या नोंदीवरुन अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव 7/12 वर आले असेल अशी संबधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर 6-ड), शेतकऱ्यांचे वारस म्हणून तलाठी यांच्याकडील गाव नमुना नं.6- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र हे कागदपत्रे मुळ स्वरुपात सादर करावेत. तसेच शेतकऱ्याचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, राजपत्रित अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेले ग्रामपंचायत प्रमाणपत्र, शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी राजपत्रित अधिकाऱ्याने साक्षांकित केलेला कोणताही एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. परिपूर्ण भरलेला दाव्यासाठीचा अर्ज क्षेत्रिय कृषी पर्यवेक्षक यांच्यामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.

भरपाईची रक्कम आणि कालावधी

विमा कंपनीकडून दावे सादर केल्याच्या दोन महिन्याचा आत निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या किंवा वारसदारांच्या बचत खात्यात जमा केले जातात. यात शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातामुळे 2 डोळे निकामी झाल्यास, 2 अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. अपघामुळे एक डोळा निकामी झाल्यास किंवा एक अवयव निकामी झाल्यास 50 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात येते. तसेच विमा प्रस्तावात त्रुटी असल्यास त्याबाबत विमा कंपनीकडून पत्राद्वारे अर्जदारास कळविण्यात येते. विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याबाबत काही वाद उद्भवल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियंत्रण समिती निर्णय घेते. विमा दावा विवादास्पदरित्या नामंजूर झाला असल्यास अर्जदार या समितीकडे तक्रार दाखल करू शकतात.

आपल्या हितासाठी शेतकरी बांधवांनी या योजनेची माहिती करून घ्यायला हवी. तसेच एखाद्या शेतकऱ्याला अपघातात अपंगत्व आल्यास त्याने किंवा मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाने भरपाईसाठी दावा दाखल करणे आवश्यक आहे. 

लेखक : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी.

स्त्रोत:महान्यूज

 

2.98888888889
Pappu mule Jun 09, 2017 02:56 PM

माझ्या भावाचे स्वत:गाडी चालव ताना अॅपी गाडी पलटी होऊन म्ृत्यू झाला आहे! नमुना फाॅर्म पाठवा

नितिन सुनिल साखरे Apr 24, 2017 11:00 PM

माझ्या वडीलांचा अपघात होऊन 3वषॅ झालेली आसुन त्यांचा एक पाय निकामी झाला आहे या योजनेचा फायदा होईल का?? मो नं 89*****73

करणसिग आसाराम सुलाने Aug 14, 2016 11:01 AM

सर मी गाव. पाचपिरवाडी ता.गगापूर जिल्हा. औरंगाबाद येथील शेतकरी आहे. माझी एक विनंती आहे आमच्या गावा तील एका शेतकरी कुटूंबातील शेतकरी पती व पत्नी चा अपघाती मृत्यू झालेला आहे. तरीही त्यांना आपले कडून त्याचा कुटूंबास सहकार्य व मदतीचा हातभारची अपेक्षा आहे.

रतनराव गुलाबराव कोल्हे,धोडप ,चिखली जि बुलडाणा Jul 23, 2016 12:20 AM

आदरणीय साहेब
गोपीनाथजी मुढे साहेबांच्या नावाने आणि शेतकऱ्याच्या हितासाठी खुपच चांगली योजना असून त्याचा ग्रामपंच्यात ने शेतकऱ्यास माहिती पुरवावी, माझ्या या मुद्यावर जरूर आपण विचार करावा,
1 लग्नाअगोदार कोणताही शेतकरी मूळच्यांनावे लगेचशेती कारीतनाही
2 मुलगा घरातील कर्ता असेल आई वडील थकलेले असतील मुलाचे लग्न झाले असेल आणित्याची पत्नी व अहं मुलगा असेल,
3, कर्त्या मुलाचा मृत्यूझाला , तर त्यास विमाकमिळू नये
4,बापाने/आईने मुलाच्या नावाने शेती केलीच नाही यात त्याच्या पत्नीचा व मुलाचा काय दोष
5,माझ्या मते कर्त्या मुलाच्या पत्नीस विमा मिळावा, अथवा शासनाने विम्या सारखा नियम काढावा, लग्नाअगोदार मुलाच्या बापाने मुलाच्या नावाची शेती करावी, अथवा मुलाचे लग्न करू नये,
आपणास काही शंका असेल तर अवश्य कॉल करा 97*****387 *****@gmail.com

Insurance Advisor Jul 08, 2016 06:29 PM

कोणालाही जर या योजने मध्ये कलैम दाखल करायचं असेल किंवा कलैम मध्ये काही मदत हवी असेल तर आपण मला फोन करू शकता
97*****36, 95*****85,

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 09:49:52.594949 GMT+0530

T24 2019/05/20 09:49:52.601139 GMT+0530
Back to top

T12019/05/20 09:49:52.069015 GMT+0530

T612019/05/20 09:49:52.085643 GMT+0530

T622019/05/20 09:49:52.157643 GMT+0530

T632019/05/20 09:49:52.158409 GMT+0530