प्रस्तावना

शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करणे, हा शेतकरी मंडळ स्थापनेमागील मुख्य उद्देश असतो. मंडळात कमीत कमी, दहा (प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश) सदस्य असावेत.

दहाच्यावर मंडळाच्या सदस्यसंख्येवर मर्यादा नाही. ही मंडळे बॅंका, नाबार्ड, शासन आणि गावातील शेतकऱ्यांमधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम करतात. त्यांच्याद्वारे प्रसारित होणारी ध्येयधोरणे, परिपत्रके, शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती इत्यादींविषयी माहिती गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविली जाते; तसेच निरनिराळ्या संस्थांशी समन्वय ठेवण्याचे काम ही मंडळे करतात. याच संकल्पनेतून महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि तंत्र विद्यालये येथे एकूण ४० शेतकरी-शास्त्रज्ञ मंचांची स्थापना केली आहे.

राबविले जाणारे उपक्रम

शेतीविषयक कार्यक्रमांचा वार्षिक कृती आराखडा तयार करणे

उच्च प्रतीचे बियाणे, खते, औषध व्यवस्था करणे

शेती तज्ज्ञांना बोलावून आधुनिक तंत्रज्ञान गावकऱ्यांपर्यंत पोचविणे

शेतीच्या विविध पद्धती, मत्स्योत्पादन, मधमाशीपालन, शेळी-मेंढीपालन, निरनिराळ्या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करणे,

गांडूळखत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचे बियाणे या विषयांवर कार्यशाळा घेणे,

फळपिके, फुलशेती, नवीन तंत्रज्ञानाविषयी कार्यशाळा घेणे,

गावपातळीवर माती परीक्षण; पाण्याचे, खतांचे नियोजन करणे.