Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 11:03:37.742326 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / शेतकरी मंडळ
शेअर करा

T3 2019/06/26 11:03:37.746802 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 11:03:37.770477 GMT+0530

शेतकरी मंडळ

शेतकरी मंडळाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे.

प्रस्तावना

शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करणे, हा शेतकरी मंडळ स्थापनेमागील मुख्य उद्देश असतो. मंडळात कमीत कमी, दहा (प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश) सदस्य असावेत.

दहाच्यावर मंडळाच्या सदस्यसंख्येवर मर्यादा नाही. ही मंडळे बॅंका, नाबार्ड, शासन आणि गावातील शेतकऱ्यांमधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम करतात. त्यांच्याद्वारे प्रसारित होणारी ध्येयधोरणे, परिपत्रके, शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती इत्यादींविषयी माहिती गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविली जाते; तसेच निरनिराळ्या संस्थांशी समन्वय ठेवण्याचे काम ही मंडळे करतात. याच संकल्पनेतून महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि तंत्र विद्यालये येथे एकूण ४० शेतकरी-शास्त्रज्ञ मंचांची स्थापना केली आहे.

राबविले जाणारे उपक्रम

  1. शेतीविषयक कार्यक्रमांचा वार्षिक कृती आराखडा तयार करणे
  2. उच्च प्रतीचे बियाणे, खते, औषध व्यवस्था करणे
  3. शेती तज्ज्ञांना बोलावून आधुनिक तंत्रज्ञान गावकऱ्यांपर्यंत पोचविणे
  4. शेतीच्या विविध पद्धती, मत्स्योत्पादन, मधमाशीपालन, शेळी-मेंढीपालन, निरनिराळ्या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करणे,
  5. गांडूळखत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचे बियाणे या विषयांवर कार्यशाळा घेणे,
  6. फळपिके, फुलशेती, नवीन तंत्रज्ञानाविषयी कार्यशाळा घेणे,
  7. गावपातळीवर माती परीक्षण; पाण्याचे, खतांचे नियोजन करणे.

 

2.92173913043
डॉ प्रविण बुल्हे Oct 12, 2015 07:28 PM

मंडळ स्थापन केले पन कृषि अधिकारी व आत्मा योजनेचे अधीकारी कोनतेही मदत करीत नाही त्यामुळे मंडळ स्थापन कोनीही करु नका कृपया

Prithviraj Gaikwad Sep 02, 2015 10:00 AM

प्रती म्हात्रे साहेब,
तुमच्या गावातील कृषी सेवकाला भेटा , तो तुम्हाला संपूर्ण मदत करेल.

hpmhatre@17gmail.com Sep 01, 2015 01:15 PM

नमस्कार आम्हाला mumbai जिल्हा मध्ये वर्सोवा-vai-madh- Erangal गावात शेतकरी मंडळ स्थापन करायचे आहे तरी कृपया माहिती द्यावी .

bapusaheb jadhav Jun 14, 2015 09:45 PM

नमस्कार आम्हाला सांगली जिल्हा मध्ये जत तालुक्यामध्ये पाच्छापूर गावात शेतकरी मंडळ स्थापन करायचे आहे तरी कृपया माहिती द्यावी .
शेतकरी मंडळ स्थापन करायचं अर्ज असल्यास मेल करावा . *****@gmail.com मोबईल नं ९६३७१९६१४६

नितेश देवकर May 08, 2015 01:26 PM

मई बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील रहिवशि असून कृषि योजना प्राप्त करण्यासाठी सोप्पा मार्ग सांगा

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 11:03:38.162250 GMT+0530

T24 2019/06/26 11:03:38.168112 GMT+0530
Back to top

T12019/06/26 11:03:37.642625 GMT+0530

T612019/06/26 11:03:37.659239 GMT+0530

T622019/06/26 11:03:37.732250 GMT+0530

T632019/06/26 11:03:37.733098 GMT+0530