Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 09:20:28.613322 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / म्हशींसाठीचे पैदास धोरण
शेअर करा

T3 2019/10/14 09:20:28.618080 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 09:20:28.643562 GMT+0530

म्हशींसाठीचे पैदास धोरण

म्हशींच्या पैदास धोरण गुरे व म्हैस पैदास राष्ट्रीय प्रकल्प (NPCBB) मुद्दयांना अनुसरुन आहे.अनुवांशिक सुधारणा करून म्हशींच्या उत्पादनात वाढ करणे हे उद्दिष्ट आहे.


अनुवांशिक सुधारणांचे लक्ष्य

    म्हशींच्या पैदास धोरण गुरे व म्हैस पैदास राष्ट्रीय प्रकल्प (NPCBB) मुद्दयांना अनुसरुन आहे. अनुवांशिक सुधारणा करून म्हशींच्या उत्पादनात वाढ करणे हे उद्दिष्ट आहे. तथापि, मुळ जातींचे संवर्धन करणे हे देखिल उद्दिष्ट आहे. दूध उत्पादनात स्वयंपूर्णता साध्य करण्यासाठी (राज्यात NPCBB अंतर्गत परिकल्पित प्रकल्पाची विलंबाने अंमलबजावणी झाल्यामुळे वर्ष 2010 ऐवजी) वर्ष 2015 च्या अखेरीस अनुवंशिक सुधारित म्हशींचे संदर्भात 60% पातळी साध्य करण्यासाठी उद्देश आहे आणि पुढील वर्ष 2025 च्या अखेरीस 80% ते सुधारण्याचा मानस आहे. या म्हशींची पैदासीत क्रियाशिल असणा-या सर्व संस्थांनी उदा. राज्य पशुसंवर्धन विभाग, सहकारी दूध सहकारी संघ राज्यात स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था आणि असंघटित कृत्रिम रेतनाचे कार्य करणारे कामगार यांच्या एकत्रित आणि सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून साध्य करणे अपेक्षित आहे.

जर्मप्लाझम

सुरती मु-हा, मेहसना जाफ्राबादी , पंढरपुरी आणि नागपुरी म्हशींचे वीर्य बिगर वर्णनीकृत म्हशींची अनुवांशिक सुधारणा करणे करीता तसेच बिगर वर्णनीकृत म्हशींची-जाती कामगिरी-सुधारणा वापरण्यात येईल.

धोरण व कार्यपध्दती

    वर्णनीकृत म्हशी (उदा. सुरती मु-हा, मेहसना जाफ्राबादी, पंढरपुरी आणि नागपुरी) ह्या केवळ संबंधित जातीच्या वळूंचे वीर्य वापरुन पैदास करणे. बिगर वर्णनीकृत म्हशी मेहसना आणि जाफ्राबादी वगळता इतर कोणत्याही ओळखलेल्या वा अभिज्ञात जातीचे वीर्य वापरुन प्रजनन/पैदास केली पाहिजे. तथापि, त्यानंतरच्या निवडसक्षम प्रजननाचा उद्देश प्रथम निवडलेली जातींची आनुवंशिक पातळी वाढविणे असेल. त्यासाठी संबंधित उच्चतर जातीच्या वंशावळच्या वळूंचे उच्च दर्जाचे वीर्य वापरले जाईल. पंढरपुरी आणि नागपुरी म्हशींचे संवर्धन विशेषतः त्यांच्या मुळस्थान असलेल्या आणि समान भौगोलिक-हवामान असलेल्या इतर भागात अभ्यास केला जाईल. ह्या जाती मालकांच्या मागणीनुसार बिगर वर्णनीकृत म्हशींची आनुवेशिक सुधारणा करण्यासाठी वापरल्या जातील.

म्हशींच्या देशी जातींचे संवर्धन

    पंढरपुरी आणि नागपुरी म्हशींच्या दोन देशी जाती, म्हणून ओळखले गेले आहेत. ज्यांची सुरक्षा आणि प्रचार करणे आवश्यक आहे. जातीच्या ओळखीसाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्यरित्या प्रशिक्षित मनुष्य-बळाचा एक संघ, हरियाणा राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरो (NBAGR), Kaarnal, मदतीने या कामासाठी उपलब्ध करून दिला जाईल. पैदासकार च्या असोसिएशनला फक्त स्थानिक जातींची संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन न देता, मंडळाचा त्याच्या लेखांशी अंतर्गत व्यवस्थापन तत्त्वांवर कार्य करण्याची अनुमती असेल. देशी जातीच्या उच्च दर्जाच्या दूध देणारी जनावरांना ओळखण्यासाठी कळप नोंदणी प्रणाली, योग्य रचना करण्यात आलेली दूग्‍ध स्पर्धा इ.चा समावेश केला जाईल. आणि या ठिकाणी योग्य प्रणाली चा वापर करुन दर्जा प्रजनन वळू मिळण्यासाठी चांगल्या वंशावळीची नर-वासरे परत खरेदी करण्यासाठी त्यांचे संगोपन केले जाईल.

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

2.97872340426
सचिन कांबळे Jan 26, 2017 06:38 AM

सर मला योजनाचा लाभ कसा घेता येईल. मला खुप गरज आहे मी बेरोजगार आहे.माझं शिक्षण चालू आहे b.a

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 09:20:29.404873 GMT+0530

T24 2019/10/14 09:20:29.411456 GMT+0530
Back to top

T12019/10/14 09:20:28.485920 GMT+0530

T612019/10/14 09:20:28.505984 GMT+0530

T622019/10/14 09:20:28.602518 GMT+0530

T632019/10/14 09:20:28.603434 GMT+0530