অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधार - बायोमेट्रीक उपकरणे

प्रस्तावना

आयरीस कॅमेरे, डोळ्याच्या आयरीसमध्ये काही अंतरावरून यादृच्छिक त-हेने दृष्य असलेल्या नमुन्यांच्या गणिती विश्लेषणांनी व्यक्तीचा परिचय शोधून त्याला ओळखण्याची कामगिरी पार पाडतात. ते संगणकाची दृष्टी, नमुना ओळखणे, संख्याशास्त्रीय अनुमान आणि नजरेचे एकत्रीकरण करतात.

आजमितीला उपलब्ध असलेल्या स्कॅनर्स आणि सर्व बायोमेट्रीक उपकरणांमध्ये, आयरीसची ओळख ही साधारणपणे बरीचशी अचूक समजली जाते. आयरीसची ओळखण्याची स्वयंचलीत पद्धती तुलनेने नवीन असून फक्त १९९४ पासूनच त्याचे व्यापारी हक्क अस्तित्वात आहेत.

साधारणपणे आयरीस कॅमेरे, बाहुलीतील नमुन्याचा एक डिजिटल फोटो घेतात आणि त्या नमुन्याचा एक डिजिटल साचा कोरतात.त्या कोरलेल्या डिजिटल साच्याची पुनर रचना करता येत नाही कींवा कोणत्याही दृष्य प्रतिमा स्वरूपात पुनर्निर्मिती करता येत नाही. म्हणूनच अत्यंत जलदगतीने वाढणा-या आयडेंटिटी थेफ्ट (तोतयेगिरी)विरोधात आयरीसने पटवून दिलेली ओळख ही सर्वोच्च दर्जाचे संरक्षण समजली जाते.

ह्या प्रतिमा प्रक्रियेंमध्ये कोणत्याही लेसरचा वा भडक दिव्यांचा समावेश नसतो तसेच अधिकृतीकरण हे संपर्कविहिनच असावे लागते.आजकालचे व्यावसायिक आयरीस कॅमेरे संबंधित व्यक्तीला इजा किंवा अस्वास्थ्य वाटू न देता इफ्रालाल दिव्यांचा प्रकाश उपयोगात आणतात

आयरीस म्हणजे प्रत्येक माणसाच्या डोळ्याच्या बाहुली भोवतालचे रंगीत वर्तुळ असते आणि एकाद्या बर्फाच्या कपचीप्रमाणे कोणतीही दोन आयरीस समान नसतात.प्रत्येक स्वतःसारखेच व निरनिराळ्या प्रकारचे युटेरोतील यादृच्छिक नमुना साकारत असते, एकमेवाद्वितीय असते.आयरीस हा एक डोळ्याच्या आतमध्ये येणा-या प्रकाशाच्या राशीला नियंत्रित करून बाहुलीच्या आकाराचे नियमन करणारा स्नायू असतो.

आयरीसच्या ओळखण्यात क्वचित चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्समुळे अडथळा येऊ शकतो आणि १०सेंमी पासून काही थोडे मीटर्स दूरवरूनही स्कॅन करता येते.जो पर्यत इजा पोचत नाही तो पर्यंत आयरीस स्थिर रहाते आणि एकदा नोंदवून घेतलेले स्कॅन आयुष्यभरासाठी होते.

काही वैद्यकीय आणि शल्यक्रियेतील प्रक्रिया एखाद्या आयरीसच्या एकूण आकारावर आणि रंगावर परिणाम घडवू शकते पण त्याचा गुळगुळीत पोत अनेक दशकांनंतरही स्थिर रहातो. अगदी अंध व्यक्तीसुद्धा हे स्कॅन तंत्रज्ञान वापरू शकते कारण आयरीसचे ओळखण्याचे तंत्र नमुन्यावर अवलंबून असते आणि दृष्टीवर नाही.

आयरीस स्कॅनिंग ही शारीरचिन्हाधारित स्कॅनिंगने ओळख पटवायची आदर्श पद्धती आहे कारण आयरीस हे आंतरींद्रीय आहे जे कॉर्नियाकडून खराबी आणि झीज विरोधात मोठ्या प्रमाणांत संऱक्षण केले जाते.विशिष्ट प्रकारच्या मानवी श्रमांनंतर ओळखले जाण्यात अडचण येऊ शकणा-या बोठांच्या ठशांच्या पेक्षा हे जास्त आकर्षक असते.

बोठांच्या ठशाचे स्कॅनिंग

फिंगरप्रिंट स्कॅनर हे एक बोटांच्या ठशांच्या नमुन्यांची डिजिटल प्रतिमा पकडण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ह्या स्कॅनवर डिजिटल प्रक्रियेने शारीर चिन्हाधारित साचा तयार करण्यासाठी, जो साठवून ठेवण्यासाठी आणि जुळतात का पहाण्यासाठी वापरता यायची प्रक्रिया केलेला असतो.

फेस कॅमेरा

फेस रेकॉग्निक्शन प्रणालीचा एक भाग म्हणून (किंवा त्यासह) अनेकदा बायोमेट्रीक्समध्ये फेस डिटेक्शन वापरण्यात येते. तसेच ते व्हिडिओ देखरेखीचा भाग म्हणून संगणक संवादमाध्यमात (इंटरफेस) आणि प्रतिमा माहिती व्यवस्थापनात देखील वापरले जाते.फेस कॅमेरा हा २एमपीएक्स वा त्यापेक्षा वरचा वेब कॅमेरा असतो जो चेह-याचा स्पष्ट फोटो घेऊ शकतो. आजकालचे काही डिजिटल कॅमेरे ऑटोफोकससाठी फेस डिटेक्शन वापरतात.तसेच फोटोतील स्वारस्य असलेले स्लाईड शो मधील भाग निवडण्यासाठीही जे पॅन आणि स्केल-- केन बर्न परिणामासाठी वापरतात. एखाद्या प्रतिमेचा विशिष्टभाग गुणधर्मात(वैशिष्ट्यात)रूपांतरीत करायचा असतो ज्या नंतर नमुना चेह-यांचा अभ्यास केलेला वर्गीकरण करणारा तो विशिष्ट प्रतिमाअंश चेह-याचा भाग आहे की नाही हे ठरवतो.

नमुना चेह-यात स्वरूप, आकार,ाणि चेह-याच्या हालचाली ह्यांचा समावेश असतो.चेह-याचे विविध आकार असतात.त्यातले काही सामान्य असतात लांबट,आयत, गोल,चौरसाकृती,हृदयासारखा आणि त्रिकोणी.हालचालीत समावेश होतो पण ते तेवढ्या पुरतेच सीमित असतेसे नाही तर त्यात उघडझाप, चढ्या भुवया, आणि उघडलेले तोंड, फुगलेल्या नाकपुड्या,, आठ्या पडलेलं कपाळ.

चेह-याचा नमुना कोणाच्याही अभिव्यक्तीचा प्रत्यय आणू शकणार नाही.पण तंत्रज्ञान अचूकतेच्या स्वीकारार्ह प्रमाणांत ते करून दाखवते.चेहरे शोधण्यासाठी प्रतिमेवरून ते नमुने सरकवले जातात पण हे तंत्रज्ञान चेहे-याच्या मागावरच अधिक चांगले काम करते एकदा का तो चेहरा ओळखला गेला की नमुना चेह-यावर ठेवून प्रणाली चेह-याच्या हालचालींचा मागोवा घ्यायला समर्थ असतो.

बायोमेट्रीक उपकरण प्रमाणन

परीक्षण प्रमाणन आणि गुणवत्ता प्रमाणन (एसटीक्यूसी)संचलनालयाचे कार्यालय हे भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याच्या(डीआयटी) कार्यालयाचे एक संलग्न कार्यालय असून, भारत सरकार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशभरातील प्रयोगशाळा व केंद्रांच्या जाळ्याद्वारे गुणवत्ता हमीसह खात्रीशीर सेवा पुरवते आणि आधार प्रकल्पात वापरासाठी एसटीक्यूसी कडून सशर्त प्रमाणित केलेली बायोमेट्रीक उपकरणे, ही प्रमाणन योजना असा विश्वास पुरवते की ही प्रमाणित उपकरणे विश्वासनीय, सुरक्षित, संऱक्षित असून आवश्यकता पूर्ण करणारे आहे.

प्रकल्पात वापरासाठी एसटीक्यूसी कडून सशर्त प्रमाणित केलेली बायोमेट्रीक उपकरणे, ही प्रमाणन योजना असा विश्वास पुरवते की ही प्रमाणित उपकरणे विश्वासनीय, सुरक्षित, संऱक्षित असून आवश्यकता पूर्ण करणारे आहे.बायोमेट्रीक उपकरण प्रमाणनासाठी संबंधित दस्तऐवजांच्या मुख्ययादी विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

स्त्रोत : महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate