অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ई-बॅंकिंग सेवा

इंटरनेट बॅंकिंग सेवा

इंटरनेट बॅंकिंग सेवा साधारण 1999 मध्ये सुरू होऊन ऑनलाइन अकाउंट बघण्यापासून, पासबुक नोंदी, बिल भरणा, चेकबुक मागविणे, फिक्स्डा डिपॉझिट उघडणे, फंड ट्रान्स्फर, दुकानातून ऑनलाइन खरेदी, स्टॉक एक्स्चें जवर शेअरची खरेदी/विक्री, विमान, रेल्वे, एसटीचे आरक्षण अशा वाढतच गेल्या आहेत. सेवा वाढविण्याबरोबर बॅंकांनी सुरक्षित सेवा देण्याच्या व्यवस्थापन पद्धतीत काळजीपूर्वक बदल केले आहेत. एका पासवर्डने मिळणारी इंटरनेट बॅंकिंग सेवा ही फंड ट्रान्स्फर करायचा असल्यास अजून एक प्रोफाइल पासवर्ड विचारते. त्रयस्थाशी आर्थिक व्यवहार करायचा झाल्यास, बॅंकेकडून व्यवहार पूर्ण करण्याआधी, काही बॅंका तुमच्या नोंद केलेल्या मोबाईलवर अजून एक कोड पाठवून तो कोड वापरण्यास अनिवार्य करतात. काही बॅंका तुमच्याकडे असलेल्या एटीएम कार्डवर असलेल्या ग्रीडमधील दिलेली अक्षरे/आकडे दिलेल्या क्रमात टाकल्याशिवाय व्यवहार पूर्ण करत नाही. क्रेडिट कार्डवरील व्यवहार हा क्रेडिट कार्डवरील माहितीव्यतिरिक्त अजून एका पासवर्डशिवाय पूर्ण करता येत नाही. एटीएम कार्डचा पिन चार आकडी असून, मोबाईलवरून व्यवहारासाठी सहा आकडी मोबाईल पीन वापरायचा असतो. ग्राहकांच्या किंवा नेटबॅंकिंग सेवा वापरणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी, व्यवहारापूर्वी चेक, डबल चेक, ट्रिपल चेक केले जातात.

आर टी जी एस सुविधा

कोअर बँकिंगच्या पुढील प्रणाली म्हणजे आर टी जी एसयाचा अर्थ Real Time Gross Settlement! अर्थातRTGS यंत्रणेद्वारे पैसे ट्रान्सफर करणे हे फक्त त्याच बँकांच्या शाखांच्या बाबतीत शक्य आहे की ज्या शाखा कोअर बँकिंग अंतर्गत जोडलेल्या आहेत.बॅँकेतील रक्कम हस्तांतर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ‘आरटीजीएस’ आणि ‘एनईएफटी’ सारख्या अत्याधुनिक सुविधा सध्या केवळ खासगी, राष्ट्रीयीकृत बॅँका यांच्यासह सदस्य बॅँकांनाच वापरता येऊ शकत होत्या; परंतु आता या सुविधा ग्रामीण विभागीय बँका आणि सहकारी बँकांना देखील उपलब्ध होत  असल्यामुळे सगळ्याच बँक ग्राहकांचे निधी हस्तांतराचे काम अतिशय सुलभ होत  आहे. आर टी जी एस द्वारे  काही मिनिटात पैसे कुठूनही कुठेही जमा करण्याची सोय आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून रक्कम सुविधा आणखी लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता विभागीय ग्रामीण बँका तसेच सहकारी बॅँकांना मध्यवर्ती ‘पेमेंट सिस्टिम्स’ समाविष्ट करून घेण्याची परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आता सर्वच बँकांना ‘आरटीजीएस’ आणि ‘एनइएफटी’ या प्रणालीच्या मदतीने  इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रक्कम हस्तांतर करता येऊ शकणार आहे.
अपवाद म्हणून ग्रामीण विभागीय बँकांनाही त्यांच्या प्रायोजित बँकांच्या मदतीने ‘एनईएफटी’ प्रणालीचा उपयोग करता येऊ शकणार आहे. त्याचबरोबर सर्व परवानाधारक बॅँकांना एनइएफटी आणि आरटीजीएस प्रणालीत सहभागी करून घेण्यासाठी उप सदस्यत्व देऊन या सुविधांचा आणखी विस्तार करण्याचा शिखर बॅँकेचा विचार आहे.

ग्राहकांचा फायदा असा

आरटीजीएस व्यवहार शुल्क हे ग्राहकाबरोबर असलेल्या बँकेच्या नातेसंबंधावर अवलंबून असते. हे शुल्क प्रति व्यवहार 50 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत असू शकते. आरटीजीएस प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर तुमच्या खात्यातील रक्कम शून्य दिवसात किंवा डिमांड ड्राफ्ट बँकेला सादर केल्यानंतर त्याच दिवशी तुमच्या खात्यात जातो. सध्या या प्रक्रियेला किमान तीन दिवस लागतात. विशेष म्हणजे डिमांड ड्राफ्ट प्रत्यक्ष हाताळण्याची जोखीमही यामुळे टळते. एनईएफटी प्रणालीमध्ये ग्राहक एखाद्या बँकेच्या शाखेत जाऊन त्याला ज्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करायची आहे, त्या खात्यात रोख रक्कम पाठवू शकतो. विशेष म्हणजे रक्कम पाठवणारी आणि रक्कम स्वीकारणारी व्यक्ती यांचे त्या बँकेत खाते असण्याची गरज नाही. त्यासाठी या प्रणालीमध्ये व्यवहारासाठी सांकेतिक क्रमांक दिला जातो. परंतु, यासाठी बँकेत येणाºया ग्राहकासाठी 50 हजार रुपयांची मर्यादा आहे.

आरटीजीएस म्हणजे काय

-आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) ही अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये एका बँकेतून दुसºया बँकेत विनाविलंब रक्कम हस्तांतर करता येऊ शकते. याद्वारे 2 लाख रुपये हस्तांतरित करता येऊ शकतात.
-एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) च्या माध्यमातून देशातील कोणत्याही बँकेत पैसे हस्तांतर करता येतात. एका वेळी 50,000 रुपये हस्तांतरित होतात.
विशेष म्हणजे तुम्ही जर नेटबँकिंग करत असाल तर बँकेत न जाता आपण आपल्या घरच्या संगणकाद्वारे RTGSऑपशन मध्ये जाऊन ज्या व्यक्तीला तुम्हाला रक्कम द्यावयाची आहे ,त्या व्यक्तीचा खाते क्रमांक द्यावा, काही बँकाIFS Code विचारणा करतात.तेव्हा हा कोड संबंधित बँकेकडून घ्यावा. किंवा  भारतीय रिझर्व्ह  बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळावर आपणास संबधित बँकेचा IFS Code मिळेल. आर्थात असे व्यवहार करतांना तुम्ही बँक अधिकारी यांच्याशी चर्चा करणे आवश्य आहे.

एन ई एफ टी सुविधा

इंटरनेटद्वारे बँकिंग व्यवहार करणे हे आपल्याकडे आता काही नवीन बाब राहिलेली नाही. देशातील बहुराष्ट्रीय व खासगी क्षेत्रातील बँकांनी इंटरनेट बँकिंग आपल्यादेशात सर्वात पहिल्यांदा आणले. आता या स्पर्धेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी उडी घेतली आहे. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, या इंटरनेट बँकिंगव्दारे व्यवहार करताना ही सेवा देणाऱ्या बँकांनी सुरक्षिततेला महत्त्व दिले आहे. सुरुवातीला अनेकांना इंटरनेट बँकिंगच्या सुरक्षिततेबाबत शंका वाटत असता. परंतु ही पध्दती अत्यंत सुरक्षित आहे, असे सर्वात प्रथम नमूद करावेसे वाटते. अशा प्रकारे तुम्ही अत्यंत सुरक्षित पध्दतीने घरबसल्या बँक खात्यातील आपले व्यवहार काय झाले आहेत ते तपासू शकतो. किंवा कोणतेही व्यवहार करु शकतो. त्याच्या जोडीला अनेक मूल्यवर्धीत सेवांचा लाभ आपल्याला इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून घेता येतो.

टी.डी.एस. चौकशी

गेल्या आर्थिक वर्षांत तुमच्या खात्यातून प्राप्ति कर किती कापण्यात आला हे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षांत तुम्हाला किती कर द्यावयाचा आहे तसेच तुम्ही किती कर भरावयाचा आहे हे सर्व व्यवहार तुम्हाला इंटरनेट बँकिंगव्दारे पहाता येतील. तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम १०,००० रुपये झाली की, त्यावर टी.डी.एस. कापला जातो. तुमच्या खात्यातील टी.डी.एस.ची स्थिती तपासण्यासाठी केवळ ३० मिनिटे खर्च करावी लागतील. अशा प्रकारे तुम्हाला कर विषयक नियोजन घरी बसून करता येईल. बँक अधिकाऱ्याच्या सहीने दिलेले टी.डी.एस. प्रमाणपत्र प्राप्तिकर खात्यात सादर करता येईल.

डिमांड ड्राफ्ट मिळविणे


इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या डिमांड ड्राफ्ट मिळणे अतिशय सोपे झाले आहे. बँकेच्या वेबसाईटवर जाऊन डिमांड ड्राफ्टसाठी रक्कम कपात करण्याचा आदेश तुम्ही तुमच्या खात्यात दिला की, तुम्हाला ज्या खात्यात रक्कम पाठवायची असेल तेथे काही क्षणात पोहोचते. त्यानंतर ड्राफ्ट घरपोच पोहोचविणे किंवा त्याची डिलिव्हरी तुम्ही स्वत: बँकेतून जाऊन घेणे असे दोन पर्याय स्वीकारु शकता. अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी १० हजार रुपयापर्यंतच्या ड्राफ्टवरील कमिशन माफ केले आहे. त्यानंतर एक लाख ते पाच लाख रुपयांवरील ड्राफ्टवर १०० रुपये कमिशन आकारले जाते.

बँकअंतर्गत निधी हस्तांतरण


देशातील बँकांमध्ये इलेक्ट्रॉनिक पध्दतीने बँक अंतर्गत निधी हस्तांतरीत करण्यात येतो. यासाठी दोन प्रकारच्या पध्दती अस्तित्वात आहेत. यातील पहिल्या पध्दतीनुसार नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्फर नुसार निधी हस्तांतरीत केला जातो. यात रिझव्‍‌र्ह बँक ही सेवा पुरविते. त्यांच्या मार्फत हे पैसे हस्तांतरीत केले जातात. या सेवेव्दारे किमान कितीही व जास्तीत जास्त पाच लाख रुपयांची रक्कम हस्तांतरीत केला जाते. दुसऱ्या पध्दतीनुसार, एन.ई.एफ.टी. ही सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंत उपलब्ध असते. यात आलेले पैसे रिझव्‍‌र्ह बँकेकडे पाठविले जातात आणि तेथून ती रक्कम संबंधीत खात्यात पाठविली जाते.

ऑनलाईन सुविधा बिलांच्या रकमा भरण्याची सेवा


नव्या काळातील माहिती - तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांवर भर देत बँकेने ऑनलाईन ब-याच सुविधा बिलांच्या रकमा भरण्याची सेवा सुरु करुन सगळ्याच खातेधारकांना देण्यात येणा-या सोयींमध्ये अधिक नावीन्य आणले आहे.आपली बिले आपल्या डेस्कटॉपपर्यंत आणत अनेक बँकांनी सगळीच कार्यपध्दती सोपी आणि सोयिस्कर केली आहे. आपली टेलिफोन, मोबाईल, ईलेक्ट्रीसिटी , इन्शुरन्स आणि इतर बिले ईलेक्ट्रीसिटी अनेक  पध्दतीने  बँकेच्या इंटरनेट बँकींग वेबसाईटवरुन भरता येतात. आता बिले भरण्याच्या रांगेत उभे राहण्याची किंवा वेगवेगळ्या कलेक्शन काऊंटर बॉक्सपर्यंत जाण्याची आवश्यकता नसते. आपली बिले आपण केव्हाही, कुठूनही, अगदी सुट्टीवर असतानाही आपल्याला भरता येईल.

या सेवेचा लाभ कोण घेऊ शकते

नेटबँकिंग सेवा, बरोबर इंटरनेट बँकींग खाते असलेली कोणतीही व्यक्ती या सेवेचा लाभ विनाशुल्क घेऊ शकते.
या सेवेची कार्यपध्दती कशी असते ?
ऑनलाईन ऍक्सेस - कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी, कुठेही. ही सेवा वर्षभर 365 दिवस दिवसभर चोवीस तास उपलब्ध असते. आपल्या बिलांच्या रकमा भरण्यासाठी फक्त आपल्याला इंटरनेटशी ऍक्सेस साधण्याची आवश्यकता असते.
नव्या बँक खात्याची आवश्यकता नसते :
सध्याच्या बँक खात्यांव्दारे आपल्याला बिले भरता येतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी क्रेडीट/डेबिट कार्डची आवश्यकता नसते.
अन्य व्यक्तींची बिले : आपले पती/पत्नी , मुले इत्यादींची बिलेही भरता येतात.
व्यवहारामधील खाजगीपणा : सर्व व्यवहार पूर्णपणे गुप्त असतात.
इंटरनेटवरील व्यवहारांमधील सुरक्षितता : प्रत्येक बँकेची वेबसाईट एसएसएलने सुरक्षित साईट म्हणून प्रमाणित केली आहे आणि ती पासवर्डने संरक्षित आहे.
बिल आणि रकमेचे पेमेंट : बिले देणा-या कंपन्यांच्या अटी आणि नियमांप्रमाणे आपल्याला बिलांच्या रकमा भरता येतील. संबंधित कंपनीच्या बाबतीत काही प्रश्न असेल तर कृपया सध्या जसे आपण करता तसेच त्या कंपनीशी थेट संपर्क साधा.
विशेष लाभ : आपले बिल ऑनलाईन भरा आणि विशेष लाभांचा फायदा घ्या. तपशिलांसाठी कृपया संबंधित बँकांची  वेबसाईट पहा.

 

माहिती संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 2/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate