Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/08/24 01:10:28.451993 GMT+0530
शेअर करा

T3 2019/08/24 01:10:28.457729 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/08/24 01:10:28.488448 GMT+0530

कॅशलेस व्यवहारासाठी 'भीम' मोबाईल अॅप

. आधार कार्डावर आधारित हे 'भीम' अॅप इंटरनेटशिवाय वापरता येणार आहे. हे अॅप यूपीआय (यूनिफाइड पेमेंट इंटरफेस) आणि यूएसएसडी (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंट्री सर्व्हीस डेटा) चे नवे व्हर्जन आहे या अॅपच्या माध्यमातून लोकांना पैसे देता किंवा स्वीकारता येतील.

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दिनांक ३० डिसेंबर २०१६ रोजी डिजिधन संमेलनात ‘भिम’ (भारत इंटरफेस फॉर मनी) अॅप सादर केले. आधार कार्डावर आधारित हे 'भिम' अॅप इंटरनेटशिवाय वापरता येणार आहे. हे अॅप यूपीआय (यूनिफाइड पेमेंट इंटरफेस) आणि यूएसएसडी (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंट्री सर्व्हीस डेटा) चे नवे व्हर्जन आहे या अॅपच्या माध्यमातून लोकांना पैसे देता किंवा स्वीकारता येतील.

 

 

काय आहे भिम अॅप?

 • हे अॅप नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन ऑफ इंडियाने तयार केले आहे
 • हे अॅप सध्या फक्त अँड्रॉइड फोनवरच चालते
 • पैसे पाठवण्यासाठी अॅपवर एकदाच बँक खात्याची नोंदणी करावी लागेल.
 • मोबाइल क्रमांकच आपला अॅड्रेस असेल. प्रत्येक वेळी खाते क्रमांकाची गरज नाही.
 • सध्या इंग्रजी व हिंदीमध्ये आहे व लवकरच प्रादेशिक भाषांमधून सुद्धा हे अॅप उपलब्ध होईल.
 • या अॅपच्या वापराने केलेल्या आर्थिक व्यवहारांवर कुठलाही चार्ज लागणार नाही. मात्र, आयएमपीएस व यूपीआय ट्रान्सफरसाठी बँका काही फीस घेऊ शकतील.
 • सध्या भीम अॅपवर एकच बँक खाते नोंद करता येईल.
 • या अॅपने आपल्या बँकेचा यूपीआय (युनायटेड पेमेंट इंटरफेस) पीन जनरेट केल्यावर हा पीन सेट करता येईल.

वैशिष्टे

 1. ऑनलाइन बँकिग साठी इंटरनेट ची गरज नाही
 2. तुमचा अंगठा बनेल तुमची ओळख
 3. तुमचा अंगठा तुमची बँक
 4. तुमचा अंगठाच तुमचा कारभार

या अॅपद्वारे खालील व्यवहार करता येतील

 • खात्यातील शिल्लक पाहता येईल
 • २४ तासांसाठी १० ते २० हजारांपर्यंतचे व्यवहार करता येतील.
 • एखाद्या कंपनीचा क्यूआर (QR) कोड स्कॅन करूनही एखाद्याला तुम्ही पैसे पाठवू शकता.

भिम अॅपमध्ये पुढील बँकां उपलब्ध आहेत

सध्या एकूण ३१ बँकां भिम अॅपमध्ये उपलब्ध आहेत..  त्यापुढीलप्रमाणे -  अक्सिस बँक, आंध्रा बँक,   बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ कॅनरा , कॅथोलिक सीरियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, डीसीबी बँक, देना बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, आयडीबीआय बँक, आयडीएफसी बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडस्लँड बँक, कर्नाटका बँक, करुर बँक, कोटक महिंद्रा बँक, ओरिएंटल बँक, पंजाब नॅशनल बँक, आरबीएल बँक, साऊथ इंडियन बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिंडीकेट बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, यूनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक.

हे अॅप आपल्या मोबाईलवर कसे सुरु कराल

 1. हे अॅप सध्या फक्त अँड्रॉइड फोनवरच चालते. त्यामुळे आपला फोन हा अँड्रॉइड असेल तरच डाउनलोड करा
 2. आपली बँक भिम अॅपमध्ये उपलब्ध आहे कि नाही याची खात्री करा
 3. डाऊनलोड करा :    तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर एनपिसीआय चे भिम अॅप 'BHIM' प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा. किंवा पुढील लिंकवरून डाऊनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=in.org.npci.upiapp

 

 

भिम अॅप मार्गदर्शक टप्पे

१. भाषा निवडा
अॅप ओपन केल्यानंतर भाषा निवडा. इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा पर्याय या अॅपमध्ये सध्या उपलब्ध आहे.

२.यूपीआय पिन तयार करा
त्यानंतर तुमचं बँक खातं आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा.

३. मोबाईल नंबरची नोंद करा
तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल. अॅप इन्स्टॉल करताना एक मेसेज मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करण्यासाठी पाठवला जातो त्यावरून तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवला जातो.

मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भिम अॅपचा वापर करता येईल.

४. पैशाची देवाण-घेवाण

भिम अॅपद्वारे युझर्स पैसे पाठवू शकतात, किंवा इतरांकडून मोबाईल नंबरवर घेऊही शकतात. एमएमआयडी किंवा आयएफएससी कोडच्या माध्यमातून नॉन-यूपीआय बँकेच्या ग्राहकांनाही पैसे पाठवता येऊ शकतात. यासाठी अॅपमध्ये इंग्रजी भाषेत सेंड किंवा रिसीव्ह मनी असा पर्याय देण्यात आला आहे.

QR क्यूआर कोड कॅशलेस व्यवहारासाठी 'भीम' मोबाईल अॅप
अॅपमध्ये क्यूआर कोड स्कॅनिंगची सुविधा आहे. ज्या द्वारे तुम्हाला झटपट आर्थिक व्यवहार करता येतील. यात यूनिफाइड पेमेंट इंटरफेसच्या सुरक्षित नेटवर्कचा वापर करून पेमेंट केले जाते.या अॅपचा वापर चोवीस तास करता येणार आहे.

अंगठ्याद्वारे चालणार 'भीम' अॅप

कॅशलेस व्यवहारासाठी तयार करण्यात आलेले भीम अॅपसाठी मुख्यत: अंगठ्याचा वापर केला जाणार आहे. आपला आंगठाच आपली बँक, आपला व्यापार आणि आपली ओळख असणार आहे.

 

संदर्भ : NPCI

 

2.97222222222
शंकर जावरे Apr 14, 2017 06:43 PM

भिम ऐप वापरतांना माझे दोन वेळेस 2000+2000 असे 4 हजार रू
अकाऊंट मधून कट झाले आहेत तरी ते कसे परत मिळतील या
विषयी माहिती द्यावी.या संपुर्ण प्रकाराची माहिती मी मेलद्वारे बँक व
भिम ऐप टीम ला दीली आहे परंतु त्यांनी माझी विनंती घेण्यापलीकडे
दुसरा काहीही प्रतिसाद दिलेला नाही.तरी आपण मदत करावी ही नम्र
विनंती.

Vishnu Narayan Morge Jan 06, 2017 09:43 PM

Thanks pm modi I'm proud of you

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Related Languages

T5 2019/08/24 01:10:28.664084 GMT+0530

T24 2019/08/24 01:10:28.669811 GMT+0530
Back to top

T12019/08/24 01:10:28.401093 GMT+0530

T612019/08/24 01:10:28.420864 GMT+0530

T622019/08/24 01:10:28.439913 GMT+0530

T632019/08/24 01:10:28.440722 GMT+0530