অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

*९९# प्रक्रिया प्रवाह (प्रोसेस फ्लो)

ओळख

*99# खालील सेवांसह जारी करण्यात आली आहे:

  1. बिगर आर्थिक
  2. आर्थिक
  3. मूल्यवर्धित सेवा

बिगर आर्थिक व्यवहार

  • खात्यातील शिल्लक तपासणे – ग्राहक मोबाइल क्रमांकाशी जोडलेल्या आपल्या बँक खात्यावर उपलब्ध शिल्लक तपासू शकतो.
  • मिनी स्टेटमेंट – ग्राहक मोबाइल क्रमांकाशी जोडलेल्या आपल्या बँक खात्यावर अलीकडच्या काळात झालेल्या मोजक्या व्यवहारांची नोंद मिनी स्टेटमेंट म्हणून जाणून घेऊ शकतो.
  • एमएमआयडी (मोबाइल मनी आयडेंटिफायर - MMID) जाणून घेणे – मोबाइल बँकिंग नोंदणीच्या वेळी मिळालेला एमएमआयडी ग्राहक जाणून घेऊ शकतो.
  • एमपिन तयार करणे  – ग्राहक आपला एमपिन तयार करू शकतो. एमपिन (मोबाइल पिन) हा एक प्रकारचा पासवर्ड असून आर्थिक व्यवहारांच्या प्रमाणीकरणासाठी असतो.
  • एमपिन बदलणे – ग्राहक आपला एमपिन बदलू शकतो. एमपिन एमपिन (मोबाइल पिन) हा एक प्रकारचा पासवर्ड असून आर्थिक व्यवहारांच्या प्रमाणीकरणासाठी असतो.
  • ओटीपी तयार करणे – ग्राहक ओटीपी (One Time Password- OTP) तयार करू शकतो व हा पासवर्ड प्रमाणीकरणाचा द्वितीय घटक म्हणून विविध व्यवहारांत उपयुक्त असतो.

आर्थिक

  • मोबाइल क्रमांक व एमएमआयडी वापरून निधी स्थानांतर करणे – ग्राहक लाभार्थीचा मोबाइल क्रमांक व एमएमआयडी वापरून लाभार्थीला निधी स्थानांतर करू शकतो.
  • आयएफएससी व खाते क्रमांक वापरून निधी स्थानांतर – ग्राहक लाभार्थीचा मोबाइल क्रमांक व आयएफएससी वापरून लाभार्थीला निधी स्थानांतर करू शकतो.
  • आधार क्रमांकाच्या वापराद्वारे निधी स्थानांतर – ग्राहक लाभार्थीचा आधार क्रमांक वापरून लाभार्थीला निधी स्थानांतर करू शकतो.

व्यवहार असे चालतात

खात्यावरील शिल्लक तपासणे

मोबाइल क्रमांकाशी जोडण्यात आलेल्या बँक खात्यातील शिल्लक ग्राहक तपासू शकतो. हा व्यवहार अशा प्रकारे करावा :

  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • शिल्लक तपासण्यासाठी १ डायल करा आणि सबमिट करा.
  • व्यवहार पार पडून पडद्यावर आपल्या खात्यावरील शिल्लक रकमेचा तपशील दिसेल.

मिनी स्टेटमेंट

मोबाइल क्रमांकाशी जोडण्यात आलेल्या आपल्या खात्यावरील अलीकडच्या काळात झालेल्या व्यवहारांचा तपशील ग्राहक तयार करू शकतो. हे मिनी स्टेटमेंट तयार करण्यासाठी व्यवहार खालील टप्प्यांप्रमाणे करावा :

  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • मिनी स्टेंटमेंटची मागणी करण्याकरिता २ डायल करून सबमिट करावे
  • व्यवहार पार पडून पडद्यावर आपल्या खात्याचे मिनी स्टेटमेंट दिसेल.

एमएमआयडी जाणून घेणे

बँकेने मोबाइल बँकिंग नोंदणीच्या वेळी ग्राहकास संमत केलेला एमएमआयडी ग्राहक जाणून घेऊ शकतो. या व्यवहाराचे टप्पे खालीलप्रमाणे :

  • मोबाइल उपकरणावर *99# क्रमांक डायल करावा
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • एमएमआयडी जाणून घेण्यासाठी ६ डायल करून सबमिट करावे
  • पडद्यावर व्यवहार पूर्ण झाल्याचा संदेश येईल आणि तुमच्या बँक खात्याशी संलग्न एमएमआयडी तेथे दिसेल.

एमपिन तयार करणे

ही सेवा वापरून ग्राहक एमपिन तयार करू शकतो. एमपिन तयार करण्यासाठी असलेल्या व्यवहाराचे टप्पे खालीलप्रमाणे :

  • मोबाइल उपकरणावर *99# क्रमांक डायल करावा.
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अंक-अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • एमपिनसाठी ७ डायल करा आणि सबमिट करा
  • एमपिन तयार करणे हा पर्याय निवडा
  • डेबिट कार्डाच्या नंबरचे शेवटचे ६ आकडे टाइप करा. तसेच विचारलेल्या ठिकाणी CVV द्या. हा क्रमांकही डेबिट कार्डावर असतो.
  • नवा एमपिन टाइप करा.
  • एमपिन यशस्वीपणे तयार झाल्याचा संदेश मोबाइलच्या पडद्यावर दिसेल.

एमपिन बदलणे

ही सेवा वापरून ग्राहक आपला एमपिन बदलू शकतात. बँकिंगद्वारे आर्थिक व्यवहार करताना हा आणखी एक पर्याय सुरक्षित व्यवहारासाठी देण्यात आला आहे. एमपिन बदलण्यासंबंधी जे टप्पे अवलंबायचे ते खालीलप्रमाणे आहेत :

  • मोबाइल उपकरणाद्वारे *99# डायल करा
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • एमपिन बदलण्यासाठी ७ टाइप करा आणि सबमिट करा.
  • जुना एमपिन टाइप करा, नवा एमपिनही विहित ठिकाणी द्या आणि व्यवहार करत असल्याचे नक्की करा.
  • व्यवहार यशस्वी पार पडत असल्याचा संदेश मोबाइल पडद्यावर येईल आणि एमपिन बदल यशस्वी झाल्याचे आपल्याला कळेल.

ओटीपी तयार करणे

ग्राहक आपला ओटीपी तयार करू शकतो (One Time Password- OTP) ही संख्या विविध व्यवहार करताना प्रमाणीकरणासाठी द्वितीय घटक म्हणून महत्त्वाचा ठरतो. हा व्यवहार करताना पुढील टप्पे अवलंबायचे असतात :

  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा.
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • ओटीपी तयार करण्यासाठी ८ डायल करा आणि सबमिट करा.
  • एमपिन लिहा.
  • तुमच्या इच्छित बँकिंग व्यवहारासाठी ओटीपी तयार करण्याचे काम पूर्ण व यशस्वी झाल्याचा संदेश  मोबाइलच्या पडद्यावर दिसेल.

निधी स्थानांतर

मोबाइल नंबर व एमएमआयडीच्या वापराने – लाभार्थीचा मोबाइल नंबर व एमएमआयडी यांचा वापर करत उपभोक्ता त्याच्या खात्यावर निधी वळवू शकतो. या व्यवहाराचे टप्पे पुढीलप्रमाणे :

  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा.
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • निधी स्थानांतर करण्यासाठी असलेला ३ आकडा टाइप करून सबमिट करा.
  • त्यानंतर पडद्यावर विहित जागांमध्ये लाभार्थीचा मोबाइल नंबर, एमएमआयडी, रक्कम आणि शेरा (असल्यास) हा तपशील भरावा
  • एमपिन टाइप करा आणि खाते क्रमांकाचे शेवटचे ४ आकडे टाइप करा (ऐच्छिक)
  • काम पूर्ण व यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलच्या पडद्यावर दिसेल.

खाते क्रमांक आणि आयएफएससी वापरून निधी स्थानांतर

लाभार्थीचा आयएफएस संकेत आणि खाते क्रमांक वापरून उपभोक्ता निधी वळवू शकतो. या व्यवहाराचे टप्पे पुढीलप्रमाणे :

  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • विहित आयएफएससी किंवा नामसंक्षेप देऊन झाल्यानंतर सर्व व्यवहारांची यादी दिसेल तसेच बँकेच्या मार्फत देता येणाऱ्या सेवांची यादी दिसेल.
  • खाते क्रमांक व आयएफएससी वापरून निधी वळवण्यासाठी ४ डायल करा व सबमिट करा.
  • त्यानंतर पडद्यावर लाभार्थीचा खाते क्रमांक, आयएफएस संकेत, रक्कम आणि शेरा (वैकल्पिक) द्यावा.
  • एमपिन आणि खाते क्रमांकाचे शेवटचे चार आकडे द्यावेत (वैकल्पिक).
  • काम पूर्ण व यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलच्या पडद्यावर दिसेल.

आधार क्रमांक वापरून निधी स्थानांतर

लाभार्थीचा आधार क्रमांक वापरून उपभोक्ता निधी वळवू शकतो.  आधार क्रमांकाच्या उपयोगाने निधी वळवण्याच्या व्यवहाराचे टप्पे पुढीलप्रमाणे :

  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • आयएफएस संकेत वा नामसंक्षेप देऊन झाल्यानंतर तुमची बँक देऊ शकत असलेल्या विविध सेवांची यादी पडद्यावर दिसेल.
  • लाभार्थीचा आधार क्रमांक वापरून निधी वळवण्यासाठी ५ डायल करा व सबमिट करा.
  • त्यानंतर पडद्यावर लाभार्थीचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी विहित रिकामी जागा दिसेल.
  • लाभार्थीचा आधार क्रमांक वापरून निधी वळवण्यासाठी एमपिन आणि खाते क्रमांकाचे शेवटचे ४ आकडे टाइप करा. (ऐच्छिक)
  • काम पूर्ण व यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलच्या पडद्यावर दिसेल.

स्त्रोत : भारतीय राष्ट्रीय भुगतान महामंडळ

अंतिम सुधारित : 7/26/2020

© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate