অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

*99# विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

*99# विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

  1. *99# म्हणजे काय?
  2. यूएसएसडी म्हणजे काय?
  3. *99# सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?
  4. *99# अंतर्गत कोणकोणत्या सेवा उपलब्ध आहेत?
  5. *99# सेवा एखाद्याने कशी वापरावी?
  6. *99# सेवा वापरून विविध प्रकारचे बँकिंग व्यवहार एखादी व्यक्ती कशी करू शकते ?
  7. *99# सेवा घेण्याकरिता ग्राहकाने आपला मोबाइल क्रमांक नोंदवणे गरजेचे आहे का ?
  8. टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या कंपन्या *99# सेवे चा आकार ग्राहकास लावतात का ?
  9. *99# सेवा वापरून किती व्यवहार करावयाचे याबद्दल काही मर्यादा ठरवण्यात आल्या आहेत का ?
  10. *99# सेवा वापरून जर एखाद्यास निधी अदा करावयाचा असेल तर त्या लाभार्थीस मोबइल बँकिंग सेवेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे का ?
  11. किती बँका आणि टेलिकॉम सेवा कंपन्या सध्या *99# सेवा देतात ?
  12. ग्राहकाचा मोबाइल फोन हरवला तर ?
  13. *99# सेवा वापरून सुरू करण्यात आलेले आर्थिक व्यवहार थांबवण्यासाठी / रद्द करण्यासाठी सोय/पर्याय आहे का ?
  14. मोबाइल नंबर बदलल्यास बँकेच्या नोंदीतला क्रमांक बदलला पाहिजे का ?
  15. *99# सेवा वापरून निधी अदा करणे किंवा निधी स्वीकारणे हे व्यवहार करायच्या वेळा कोणत्या ?
  16. एमएमआयडी ( MMID ) म्हणजे काय ?
  17. आयएफएससी – IFSC कोड म्हणजे काय ?
  18. जीएसएम आणि सीडीएमए उपकरणावरही *99# सेवा मिळते का ?
  19. *99# व्यवहारांच्या संदर्भात तक्रारी असल्यास त्या कोठे नोंदवाव्यात ?
  20. *99# सेवा वापरताना कोणत्या अडचणी येतात ?
  21. *99# सेवा वापरण्याबाबत काही टिपा आहेत का ?

*99# म्हणजे काय?

*99# ही एक यूएसएसडी (Unstructured Supplementary Service Data) आहे. ती मोबाइल बँकिंग सेवांवर आधारित आहे. बँका आणि टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसारख्या विविध प्रकारच्या संस्थांना एका उद्दिष्टासाठी एकत्र आणत एनपीसीआयने ती उपलब्ध करून दिली आहे. *99# सेवेच्या उपयोगाने बँक ग्राहक आर्थिक व्यवहार करू शकतो. त्यासाठी त्याचे खाते असलेल्या बँकेत त्याचा मोबाइल क्रमांक नोंदवून संबंधित क्रमांकावरून *99# हे आकडे डायल करणे आवश्यक असते. ज्या टेलिकॉम कंपन्या जीएसएम सेवा देतात, त्या सर्वांद्वारे व जीएसएम मोबाइल उपकरणाद्वारे ही सेवा राबवता येते.

यूएसएसडी म्हणजे काय?

अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्विस डाटा अर्थात  यूएसएसडी म्हणजे जीएसएम (Global System for Mobile Communications- GSM) मोबाइल उपकरणांसाठी देण्यात आलेले अद्वितीय तंत्रज्ञान आहे.  जीएसएम नेटवर्कच्या कार्यरत मार्गांमार्फत माहितीचे प्रक्षेपण करण्याची क्षमता जीएसएम स्टँडर्डमध्ये तयार करण्यात आलेली असते. सत्राधारित संपर्क पुरवून यूएसएसडी विविध प्रकारची कार्ये करण्यास उपयुक्त ठरते. यूएसएसडी तंत्रज्ञान, जे मुळात टेलिकम्युनिकेशनकरिता वापरले जात असे ते आता बँकिंग सेवांकरिता प्रभावीपणे सहाय्यभूत ठरू लागले आहे.

*99# सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?

  • इंटरनेटशिवाय चालते – आवाजाने संपर्काचे तंत्र वापरते
  • सर्व टेलिकॉम सेवांकरिता मोबाइलवर *99# ही संख्या याच सेवेसाठी ठेवण्यात आली आहे.
  • रोमिंगमध्ये ही सेवा वापरण्याकरिता अतिरिक्त आकार पडत नाही.
  • सर्व जीएसएम सेवा पुरवठादारांमध्ये आणि सर्व जीएसएम मोबाइल उपकरणांत ती कार्यरत होते.
  • ग्राहकांना ती दिवसाचे २४ तास उपलब्ध असते.  व सुट्टीच्या दिवशीही ती सुरू असते.
  • ही सेवा घेण्यासाठी मोबाइल उपकरणावर कोणतेही अतिरिक्त अॅप्लिकेशन घेण्याची गरज नाही.
  • या सेवेने बँकिंग सेवांकरिता आणखी एक मार्ग तयार केला असून आर्थिक व्यवहारांत लोकांना सामावून घेण्याची प्रक्रिया यामुळे वेगाने होऊ शकते.

*99# अंतर्गत कोणकोणत्या सेवा उपलब्ध आहेत?

ग्राहक खालील उद्देशांसाठी *99# सेवा उपयोगात आणू शकतात.

a) आर्थिक
b) बिगर आर्थिक
c) मूल्यवर्धित सेवा

सध्या खालील आर्थिक, बिगर आर्थिक आणि मूल्यवर्धित सेवा *99# सेवेमार्फत दिल्या जातात.

आर्थिक सेवा

निधी स्थानांतर (P2P – व्यक्ती ते व्यक्ती)

निधी स्थानांतर (P2A – व्यक्ती ते खाते)

निधी स्थानांतर (P2U – व्यक्ती ते यूआयडीएआय)

बिगर आर्थिक सेवा

एमएमआयडी जाणून घेणे

एमपिन

एमपिन तयार करणे

एमपिन बदलणे

एमपिन बदलणे

ओटीपी तयार करणे

शिल्लक तपासणे

मिनी स्टेटमेंट

मूल्यवर्धित सेवा

QSAM- क्यूएसएम (आधार मॅपरवर चौकशी सेवा) किंवा  *99*99#

आर्थिक सेवा

  • मोबाइल क्रमांक व एमएमआयडी वापरून निधी स्थानांतर करणे – ग्राहक लाभार्थीचा मोबाइल क्रमांक व एमएमआयडी वापरून लाभार्थीला निधी स्थानांतर करू शकतो.
  • आयएफएससी व खाते क्रमांक वापरून निधी स्थानांतर – ग्राहक लाभार्थीचा मोबाइल क्रमांक व आयएफएससी वापरून लाभार्थीला निधी स्थानांतर करू शकतो.
  • आधार क्रमांकाच्या वापराद्वारे निधी स्थानांतर – ग्राहक लाभार्थीचा आधार क्रमांक वापरून लाभार्थीला निधी स्थानांतर करू शकतो.

बिगर आर्थिक सेवा

  • शिल्लक तपासणे - मोबाइल क्रमांकाशी जोडण्यात आलेल्या बँक खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे ते ग्राहक तपासू शकतो.
  • मिनी स्टेटमेंट – ग्राहक मोबाइल क्रमांकाशी जोडलेल्या आपल्या बँक खात्यावर अलीकडच्या काळात झालेल्या मोजक्या व्यवहारांची नोंद मिनी स्टेटमेंट म्हणून जाणून घेऊ शकतो.
  • MMID* (मोबाइल मनी आयडेंटिफायर) जाणून घेणे – मोबाइल बँकिंग नोंदणीच्या वेळी मिळालेला एमएमआयडी ग्राहक जाणून घेऊ शकतो.
  • एमपिन तयार करणे – ग्राहक आपला एमपिन तयार करू शकतो. एमपिन (मोबाइल पिन) हा एक प्रकारचा पासवर्ड असून आर्थिक व्यवहारांच्या प्रमाणीकरणासाठी असतो.
  • एमपिन बदलणे – ग्राहक आपला एमपिन बदलू शकतो. एमपिन एमपिन (मोबाइल पिन) हा एक प्रकारचा पासवर्ड असून आर्थिक व्यवहारांच्या प्रमाणीकरणासाठी असतो.
  • ओटीपी तयार करणे – ग्राहक ओटीपी (One Time Password- OTP) तयार करू शकतो व हा पासवर्ड प्रमाणीकरणाचा द्वितीय घटक म्हणून विविध व्यवहारांत उपयुक्त असतो.

*MMID - मोबाइल मनी आयडेंटिफायर हा ७ आकडी संकेत असून तो ग्राहकास मोबाइल बँकिंगची नोंदणी करण्याच्या वेळी बँकेकडून संमत केला जातो.

मूल्यवर्धित सेवा

कृपया *99*99# सेवा या मथळ्याखालील, ‘वारंवार विचारल्या जाणाऱ्या शंका’  या सदरात संबंधित माहिती पाहा.

*99# सेवा एखाद्याने कशी वापरावी?

ही सेवा कोणत्याही जीएसएम मोबाइल उपकरणावर *99# क्रमांक डायल करून उपलब्ध करून घेता येते.  यासंबंधीच्या पूर्वअटीनुसार ग्राहकाने आपला मोबाइल क्रमांक आपले खाते असलेल्या बँकेत नोंदवून मोबाइल बँकिंग सेवा आपल्याकरिता घेतलेली असली पाहिजे. जे ग्राहक आधीपासून मोबाइल बँकिंग सेवेचा लाभ घेत आहेत त्यांना अन्य कोणत्याही प्रकारची नोंदणी करायची आवश्यकता नसून जीएसएम मोबाइल उपकरणावर फक्त *99# डायल करून ही सेवा मिळवता येईल. ज्या ग्राहकांनी आपले खाते असलेल्या बँकेकडे मोबाइल बँकिंग सेवेची मागणी केलेली नसेल त्यांनी संबंधित बँकेच्या शाखेत संपर्क साधून मोबाइल बँकिंगशी संबंधित चौकशी करावी व त्याप्रमाणे नोंदणीची कार्यवाही करावी.

*99# सेवा वापरून विविध प्रकारचे बँकिंग व्यवहार एखादी व्यक्ती कशी करू शकते ?

बिगर आर्थिक सेवा

शिल्लक तपासणे - मोबाइल क्रमांकाशी जोडण्यात आलेल्या बँक खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे ते ग्राहक तपासू शकतो. व्यवहाराच्या पायऱ्या पुढीलप्रमाणे

  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा.
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • शिल्लक रक्कम तपासण्यासाठी १ टाइप करा आणि सबमिट करा.
  • व्यवहार पूर्ण यशस्वी झाल्याचे दाखवत मोबाइलच्या पडद्यावर बँक खात्यावरील शिल्लक रक्कमही दाखवली जाईल.
मिनी स्टेटमेंट : उपभोक्ता आपल्या मोबाइल क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यावरील व्यवहारांचे मिनी स्टेटमेंट तयार करू शकतो. मिनी स्टेटमेंट मिळवण्याच्या या व्यवहाराचे टप्पे पुढीलप्रमाणे 
  • मोबाइल उपकरणावर *99# डायल करा.
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • मिनी स्टेटमेंटकरिता २ डायल करा व सबमिट करा.
  • मिनी स्टेटमेंट मिळवण्याचे काम पूर्ण व यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलच्या पडद्यावर दिसेल.

एमएमआयडी जाणून घेणे : बँकेने मोबाइल बँकिंग नोंदणीच्या वेळी ग्राहकास संमत केलेला एमएमआयडी ग्राहक जाणून घेऊ शकतो. या व्यवहाराचे टप्पे पुढीलप्रमाणे

  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा.
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • एमएमआयडी जाणून घेण्यासाठी ६ डायल करा आणि सबमिट करा.
  • तुमच्या खात्याशी संलग्न एमएमआयडी जाणून घेण्याचे काम पूर्ण व यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलच्या पडद्यावर दिसेल.

एमपिन बदलणे : ही सेवा वापरून ग्राहक आपला एमपिन बदलू शकतो. बँकिंगद्वारे आर्थिक व्यवहार करताना हा आणखी एक पर्याय सुरक्षित व्यवहारासाठी देण्यात आला आहे. एमपिन बदलण्यासाठीच्या व्यवहाराचे टप्पे पुढीलप्रमाणे :

  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • एमपिन बदलण्यासाठी ७ डायल करा व सबमिट करा.
  • जुना एमपिन टाइप करा, नंतर नवा एमपिन द्या आणि त्याला पुन्हा दुजोरा द्या.
  • एमपिन बदलण्याचे काम पूर्ण व यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलच्या पडद्यावर दिसेल.

ओटीपी तयार करणे : ग्राहक आपला ओटीपी या सेवेद्वारे तयार करू शकतात. हा विविध व्यवहारांकरिता प्रमाणीकरणासाठी द्वितीय घटक म्हणून उपयुक्त ठरतो. ओटीपी तयार करण्याच्या व्यवहाराचे टप्पे पुढीलप्रमाणे :

  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा.
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • ओटीपी तयार करण्यासाठी ८ टाइप करा आणि सबमिट करा
  • एमपिन टाइप करा.
  • ओटीपी तयार करण्याचे काम पूर्ण व यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलच्या पडद्यावर दिसेल.

आर्थिक सेवा :

एमएमआयडी व मोबाइल क्रमांक वापरून निधी स्थानांतर : ग्राहक लाभार्थीचा एमएमआयडी आणि मोबाइल क्रमांक देऊन निधी स्थानांतर करू शकतात. एमएमआयडी आणि मोबाइल क्रमांक देऊन निधी वळवण्याच्या या व्यवहाराचे टप्पे पुढीलप्रमाणे :
  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • एमएमआयडी आणि मोबाइल क्रमांक देऊन निधी स्थानांतर करण्यासाठी ३ डायल करा व सबमिट करा.
  • त्यापाठोपाठ पडद्यावर लाभार्थीचा मोबाइल क्रमांक, एमएमआयडी, रक्कम आणि शेरा (वैकल्पिक) देण्यासाठी विहित जागा दिसू लागेल.
  • एमपिन द्या आणि खाते क्रमांकाचे शेवटचे ४ आकडे टाइप करा. (ऐच्छिक)
  • एमएमआयडी आणि मोबाइल क्रमांक देऊन निधी स्थानांतर करण्याचे काम पूर्ण व यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलच्या पडद्यावर दिसेल.
आयएफएससी आणि खाते क्रमांक वापरून निधी स्थानांतर : लाभार्थीचा खाते क्रमांक आणि आयएफएससी देऊन ग्राहक निधी स्थानांतर करू शकतात. खाते क्रमांक आणि आयएफएससी देऊन निधी वळवण्याच्या व्यवहाराचे टप्पे पुढीलप्रमाणे :
  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • खाते क्रमांक आणि आयएफएससी देऊन निधी स्थानांतर करण्यासाठी ४ डायल करा व सबमिट करा.
  • त्यापाठोपाठ पडद्यावर लाभार्थीचा खाते क्रमांक, आयएफएससी, रक्कम आणि शेरा (असल्यास)     देण्यासाठी विहित जागा दिसू लागेल.
  • एमपिन द्या आणि खाते क्रमांकाचे शेवटचे ४ आकडे टाइप करा. (ऐच्छिक)
  • खाते क्रमांक आणि आयएफएससी देऊन निधी स्थानांतर करण्याचे काम पूर्ण व यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलच्या पडद्यावर दिसेल.
आधार क्रमांक वापरून निधी स्थानांतर : लाभार्थीचा आधार क्रमांक देऊन ग्राहक निधी स्थानांतर करू शकतो. आधार क्रमांक देऊन निधी वळवण्याच्या या व्यवहाराचे टप्पे पुढीलप्रमाणे :
  • मोबाइल उपकरणावर *99# हा क्रमांक डायल करावा
  • पडद्यावर स्वागतसूचना दिसेल आणि आपल्या बँकेचे तीन अक्षरी संक्षिप्त नाव देण्याची किंवा चार अक्षरी आयएफएससी देण्याची विचारणा करण्यात येईल.
  • अधिकृत आयएफएससी किंवा संक्षिप्त नाव देऊन झाल्यावर ग्राहकास उपलब्ध विविध बँक व्यवहारांची यादी समोर दिसेल.
  • लाभार्थीचा आधार क्रमांक देऊन निधी स्थानांतर करण्यासाठी ५ डायल करा व सबमिट करा.
  • त्यापाठोपाठ पडद्यावर लाभार्थीचा आधार क्रमांक देण्यासाठी विहित जागा दिसू लागेल.
  • एमपिन द्या आणि खाते क्रमांकाचे शेवटचे ४ आकडे टाइप करा. (ऐच्छिक)
  • लाभार्थीचा आधार क्रमांक देऊन निधी स्थानांतर करण्याचे काम पूर्ण व यशस्वी झाल्याचा संदेश  मोबाइलच्या पडद्यावर दिसेल.

टीप : उपर्युक्त प्रक्रिया या प्रमाणित प्रक्रिया आहेत. परंतु प्रमाणीकरणासाठी विविध बँका आणखी काही सुरक्षेच्या उपचारांची व्यवस्था करतात. उदाहरणार्थ :

  • आपल्या खाते क्रमांकातील शेवटचे चार आकडे टाइप करा किंवा
  • यूजर आयडी टाइप करा

मूल्यवर्धित सेवा :

  • *99# सेवेसाठीच्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या शंकांबद्दल दिलेली माहिती वाचा

*99# सेवा घेण्याकरिता ग्राहकाने आपला मोबाइल क्रमांक नोंदवणे गरजेचे आहे का ?

हो. * 99# सेवा घेण्याकरिता ग्राहकाने आपला मोबाइल क्रमांक ज्या बँकेमध्ये खाते आहे त्या बँकेकडच्या आपल्या माहितीमध्ये नोंदवणे गरजेचे आहे.

टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या कंपन्या *99# सेवे चा आकार ग्राहकास लावतात का ?

हो. टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या कंपन्या *99# सेवा वापराचा आकार ग्राहकास लावत असतात. *99# सेवा वापरल्याबद्दल आपल्याला टेलिकॉम सेवा देणारी विशिष्ट कंपनी किती आकार लावते, याची चौकशी कृपया त्या कंपनीकडे करावी. मात्र भारतीय टेलिकॉम नियामक प्राधिकरण - ट्राय  (Telecom Regulatory Authority of India- TRAI) ने यासाठी कमाल आकार मर्यादा ठरवून दिलेली आहे.  *99# सेवा वापरासाठी टेलिकॉम कंपन्यांनी लावण्याचा प्रति व्यवहार आकार हा रु. १.५० हून अधिक नसावा.

*99# सेवा वापरून किती व्यवहार करावयाचे याबद्दल काही मर्यादा ठरवण्यात आल्या आहेत का ?

मोबाइल बँकिंगसाठी भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. *99# सेवा वापरून करावयाच्या आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार रु. ५००० ही कमाल मर्यादा आहे.

*99# सेवा वापरून जर एखाद्यास निधी अदा करावयाचा असेल तर त्या लाभार्थीस मोबइल बँकिंग सेवेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे का ?

नाही. लाभार्थीस निधी स्वीकारण्यासाठी खाते क्रमांक/ आधार क्रमांक नोंदवून बँकेचा ग्राहक झालेच पाहिजे असे नाही. असे असले तरी लाभार्थी त्याच्या बँकेचा ग्राहक असला पाहिजे आणि त्याने मोबाइल बँकिंग स्वीकारलेले असेल तर मोबाइल क्रमांक आणि एमएमआयडी वापरून निधी अदा केला जाऊ शकतो.   लाभार्थी ग्राहकाने आपल्या बँकेकडे एमएमआयडीची मागणी करावी.

किती बँका आणि टेलिकॉम सेवा कंपन्या सध्या *99# सेवा देतात ?

एनपीसीआयच्या वेबसाइटवर खालील लिंकवर *99# सेवा देणाऱ्या बँका व टेलिकॉम सेवा कंपन्यांची नावे उपलब्ध आहेत : http://www.npci.org.in/pro_pb.aspx

ग्राहकाचा मोबाइल फोन हरवला तर ?

मोबाइल बँकिंग सेवा अकार्यक्षम करण्याची मागणी ग्राहकाने बँकेकडे करावी. *99# सेवेद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी दोन प्रकारे प्रमाणीकरण (नोंदणीकृत मोबाइल क्रमांक व एमपिन) आवश्यक असले तरी मोबाइल हरवल्याचे बँकेला कळवणे आवश्यक आहे.

*99# सेवा वापरून सुरू करण्यात आलेले आर्थिक व्यवहार थांबवण्यासाठी / रद्द करण्यासाठी सोय/पर्याय आहे का ?

नाही. *99# सेवा ही तात्काळ निधी स्थानांतर करणारी आयएमपीस सेवा वापरत असल्यामुळेएकदा आर्थिक व्यवहार सुरू करण्याचा संदेश देण्यात आल्यावर तो मागे घेणे शक्य नसते.

मोबाइल नंबर बदलल्यास बँकेच्या नोंदीतला क्रमांक बदलला पाहिजे का ?

हो. ग्राहकाने आपला बदललेला मोबाइल क्रमांक, ज्या बँकेतल्या खात्यातील व्यवहार मोबाइल बँकिंगद्वारे होतात, तेथे नोंदवलेल्या माहितीमध्ये योग्य बदल करत नोंदवला पाहिजे.

*99# सेवा वापरून निधी अदा करणे किंवा निधी स्वीकारणे हे व्यवहार करायच्या वेळा कोणत्या ?

निधी स्थानांतर व्यवहार दिवसभरात केव्हाही करता येते. चोवीस तास ही सेवा सुरू असते. सुट्टीच्या दिवशीही ती चालू असते. तसेच निधी स्थानांतर होऊन आलेले पैसे अशाच प्रकारे लाभार्थीही चोवीस तासात केव्ही स्वीकारू शकतो.

एमएमआयडी ( MMID ) म्हणजे काय ?

एमएमआयडी हा मोबाइल मनी आयडेंटिफायरचा संक्षेप आहे. आयएमपीएस उपलब्ध करण्यासाठी  बँकेने ग्राहकाला दिलेला एमएमआयडी हा सात आकडी संकेत आहे. बँकेत ज्या ग्राहकांचा मोबाइल क्रमांक नोंदवलेला आहे अशांनाच केवळ एमएमआयडी दिला जातो. एका मोबाइल क्रमांकास विविध एमएमआयडी जोडता येतात. (एमएमआयडी जारी करण्यासंदर्भात आपल्या बँकेत जा)

आयएफएससी – IFSC कोड म्हणजे काय ?

भारतीय आर्थिक व्यवस्था संकेत (Indian Financial System Code- IFSC) हा ११ आकडी अंक-अक्षरांचा संकेत असतो व तो व्यक्तीची बँकशाखा स्पष्ट करणारा एकमेव असा संकेत असतो. भारताच्या दोन मुख्य निधी फेडण्याच्या व्यवस्थांचा तो भाग असतो. त्या दोन व्यवस्था म्हणजे प्रत्यक्ष वेळी एकूण संपत्ती (Real Time Gross Settlement-RTGS) आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतर (National Electronic Fund Transfer - NEFT). विविध बँक शाखांसाठी असलेले आयएफएस संकेत त्या त्या बँकेच्या वेबसाइटवर व भारतीय रिझर्व बँकेच्या वेबसाइटवर असतात तसेच चेकबुकवरही (हुंडी पुस्तिका) नमूद केलेले असतात.

जीएसएम आणि सीडीएमए उपकरणावरही *99# सेवा मिळते का ?

नाही. *99# सेवा ही केवळ जीएसएम मोबाइल उपकरणावर उपलब्ध आहे.

*99# व्यवहारांच्या संदर्भात तक्रारी असल्यास त्या कोठे नोंदवाव्यात ?

*99# सेवा वापरताना खालील प्रकारच्या तक्रारी द्भवल्यास त्या ग्राहकाने नोंदवाव्यात : नेटवर्कची समस्या असेल तर त्या टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपनीकडे आणि व्यवहारात समस्या आल्यास त्या संबंधित बँकेकडे तक्रार करावी.

*99# सेवा वापरताना कोणत्या अडचणी येतात ?

*99# वर व्यवहार करताना ग्राहकाला खालील अडचणी येऊ शकतात :

  • उपकरण सोयीस्कर असण्याची समस्या : यूएसएसडी आधारित व्यवहार हे सर्व जीएसएम उपकरणांवर केले जात असले तरी काही वेळा विविध कारणांमुळे काही उपकरणे यूएसएसडी सेवेला सोयीची ठरत नाहीत. अशा उपकरणांची संख्या कमी असली तरी वापरणाऱ्याने आपले उपकरण या सेवेसाठी उपयुक्त असल्याची खातरजमा करून घ्यावी. (प्रत्यक्ष व्यवहार करताना अडचण आल्यास)
  • तांत्रिक त्रुटी किंवा ग्राहकाची मागणी नाकारली जाणे : नेटवर्क अभावी व्यवहार पूर्ण झाला नाही तर किंवा बँकेकडून तो पूर्णत्वाला गेला नाही तर तांत्रिक अडचण उद्भवलेली असू शकते.
  • वापरकर्त्याने चुकीची माहिती दिली तर : वापरकर्त्याने आयएफएससी, खाते क्रमांक, एमपिन आदींबाबत चुकीची माहिती दिली तर व्यवहार नाकारला जाऊ शकतो.

*99# सेवा वापरण्याबाबत काही टिपा आहेत का ?

  • आपल्याला मोबाइल बँकिंग सेवा मिळावी म्हणून ग्राहकाने संबंधित बँकेकडे नोंदणी करणे आवश्यक असते.
  • कृपया व्यवहार सुरू करण्याअगोदर लाभार्थीचा मोबाइल क्रमांक, एमएमआयडी, आयएफएससी, खाते क्रमांक, आधार क्रमांक तसेच एमपिन हाताशी ठेवा.
  • कोणताही व्यवहार सुरू करण्याअगोदर मोबाइल उत्तम नेटवर्कमध्ये असल्याची खातरजमा करून घ्या.

 

स्त्रोत : भारतीय राष्ट्रीय भुगतान महामंडळ

अंतिम सुधारित : 6/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate